' येत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का? – InMarathi

येत्या ८ तारखेला रात्री ९ वाजता ‘झी न्यूज’ संपूर्ण देशासमोर मागणार आहे माफी……पण का?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मीडिया… एके काळी हा मीडिया म्हणजेच आपले वर्तमानपत्र, न्यूज चॅनेल इत्यादी आपल्याला जगभरात घडणाऱ्या घटनांची माहिती देणारे एक माध्यम होते… जे आजही आहे… पण आताच्या मीडियाचं स्वरूप आणि त्याची काम करण्याची पद्धती यात आमूलाग्र बदल झाले आहेत… आता हा मीडिया केवळ बातमीच आपल्या पर्यंत पोहोचवत नाही तर त्या घटनेमागील तथ्य, कारण आणि त्याचे समाजावर होणारे परिमाण यांसर्वांचा तपशील आपल्या समोर मांडतो… आताच्या युगात जसजसे या मीडियाचे महत्व वाढत चालले आहे तसतशी त्यांच्यातील स्पर्धाही वाढत चालली आहे. याच स्पर्धेत सर्वात समोर राहण्यासाठी प्रत्येक मिडीया काही ना काही वेगळं करत असतो आणि यातच तो आपलं संतुलन गमावून त्यांच्या अस्तित्वाचा मूळ उद्देश विसरून बसतो. या स्पर्धेत आघाडीवर राहण्यासाठी आजकाल सर्वच न्यूज चॅनेलवर बातमीला मोडून-तोडून दाखवले जाते. असच काहीस झालं आहे Zee News बरोबर…

प्रसिद्ध शायर गौहर रजा यांना देशद्रोही म्हणणं Zee News च्या चांगलचं अंगलट आलं आहे…

zeenews02-marathipizza
thewire.in

न्यूज़ ब्रॉडकास्टर्स एसोसिएशनच्या युनिट NBA ने Zee News ला मार्च २०१६ ला चॅनेलवर दाखविण्यात आलेल्या चुकीच्या रिपोर्टसाठी एक लाख रुपयाचा दंड ठोठावला असून या चुकीसाठी त्यांना चॅनेलवर माफी मागण्यास सांगितले आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, मार्च २०१६ ला Zee Newsने एक बातमी चालवली होती, ज्यामध्ये त्यांनी प्रसिद्ध शायर आणि वैज्ञानिक गौहर रजा यांची एका मुशायरादरम्यान वाचलेल्या एका नज्म साठी त्यांना ‘अफ़जल प्रेमी’, देशद्रोही आणि अफ़जल गुरु समर्थक संबोधले होते.

zeenews01-marathipizza
YouTube

या प्रकरणाबाबत NBA ने  Zee News ला ८ सप्टेंबर ला रात्री ९ वाजता एक प्रोग्रॅम चालविण्यास सांगितले आहे ज्यात त्यांना प्राईम टाइम दरम्यान लाईव्ह माफी  मागायची आहे. या प्रकरणाची तक्रार खुद्द गौहर रजा यांनी एप्रिल २०१६ मध्ये केली होती. गौहर यांच्या या तक्रारीला शर्मिला टागोर, गायिका शुभ मुदगल,कवी अशोक वाजपेयी आणि लेखक सैय्यद हमीद यांनी NBSA प्रमुख जस्टीस आर.व्ही. रवींद्रन यांच्याकडे लेखी तक्रार करून समर्थन केले होते.

एकीकडे या प्रकरणाबाबत Zee News चे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी संडे एक्स्प्रेस ला दिलेल्या इंटरव्हूमध्ये सांगितले की,

आम्हाला NBA कडून नोटीस ३१ ऑगस्ट ला मिळाली. या बाबत आम्ही देखील NBA कडे आमचा पक्ष ठेवलाय आणि सांगितलं की आमच्या कंपनीने कुठल्याही रिपोर्टच्या प्रसारणात NBA च्या कुठल्याही गाईडलाईनचे उल्लंघन केलेले नाही. तर NBA च्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी आम्ही कायदेशीर बाबींचा देखील विचार करीत आहोत.

zeenews03-marathipizza
thewire.in

तर  NBA ने आपला निर्णय देताना सांगितले की,

झी न्यूजच्या त्या बातमीचा उद्देश सनसनीखेज विधान करून लोकांमध्ये चुकीचा विचार पसरवण्याचा होता असे आमच्या निदर्शनास आले आहे आणि त्यावर कहर म्हणजे झी न्यूजने खऱ्या बातमीसोबत छेडछाड देखील केली आहे.

या निर्णयावर गौहर रजा संतुष्ट असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की,

या रिपोर्टने Zee News ने आपल्या संस्कृती आणि सभ्यतेवर निशाणा साधला आहे. जर मी देखील शांत राहिलो असतो तर हे आपल्या देशासाठी घातक ठरले असते.

असो… या घटनेवरून इतर न्यूज चॅनेलने धडा घेऊन यापुढे तरी अशा चुका करणं टाळावं…

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?