जेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

जगभरात असे कित्येक ठिकाण आहेत ज्यांना या निसर्गाचा अनमोल असा वारसा लाभला आहे. कित्येक अशी गावे आहेत जी आपला नैसर्गिक सुंदरतेनेसर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गावाबद्दल सांगणार आहोत त्या गावाची बातच निराळी आहे.

Zalipie Village - Poland02-marathipizza
mymodernmet.com

दुसर्‍या महायुद्धाच्या आगीत होरपळून देखील त्या वेदना विसरणारे हे गाव. दुसऱ्या महायुद्धात या गावाचे अतोनात नुकसान झाले पण या संकटाला मात देत हे गाव पुन्हा उठून उभे राहिले. येथील जनतेने आपले गांव आपल्या कलाकारीने सुंदर बनविले. हे गाव म्हणजे पोलंडमधील झालिपई”. आता जगातील सर्वात सुंदर गाव म्हटल तर ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणारच.


Zalipie Village - Poland06-marathipizza
twitter.com

पोलंडमधील या छोट्याश्या सुंदर गावात घराघरांवरच नाही तर सर्व स्थिर वस्तूंवर कलाकारी केलेली आढळते. म्हणजे पाण्याच्या टाक्या, पूल, विहीरी, कचरा पेट्या, कुत्र्याची छोटी घरे इत्यादी सर्व फुलापानांच्या डिझाईन्सनी रंगविली गेली आहेत. यामुळे हे गांव म्हणजे एखाद्या रंगीबिरंगी फुलांच्या बागेप्रमाणे मनोहारी आणि ताजेतवाने वाटते. आता तर ही कलाकारी इथल्या परंपरेचाचं एक भाग बनली आहे.

 Zalipie-Village-Poland07-marathipizza
travelandleisure.com

घरांवर फुलकारी करण्याची ही परंपरा १०० हून अधिक वर्षांपासून सुरू असल्याचे समजते. म्हणजे त्याकाळी घरे हवेशीर नसत आणि स्वयंपाक काम हे धूर सोडणार्‍या स्टेाव्हवर केले जात असे. त्यामुळे या धुराने घराच्या भिंती काळ्या होत असे. हे काळे डाग लपविण्यासाठी फेलिशिया कर्व्हीलोव्हा या महिलेने एक युक्ती केली. तिने त्या काळ्या डागांवर सुंदर अशी रंगीबिरंगी फुले साकारली. तिची ही कल्पना गावातील अन्य महिलांनाही आवडली. त्यानंतर त्यांनीही आपापली घरे या पद्धतीने फुलापानांनी सजवायला सुरवात केली. कालांतराने ही पेटींग्ज या गावाची ओळख बनली. तर आज फेलिशियाचे घर म्युझियम म्हणून जतन केले गेले आहे.


Zalipie Village - Poland-marathipizza
newsatview.com

दुसर्‍या महायुद्धात या गावाची चांगलीच होरपळ झाली, त्यांना खूप दुखः सहन करावं लागल, पण त्या वेदनांचा विसर पडावा म्हणून १९४८ पासून येथे सर्वात सुंदर कलाकारी असलेले घर अशी स्पर्धा सुरू झाली आणि त्यासाठी बक्षीस देखील दिले जाऊ लागले.

Zalipie Village - Poland08-marathipizza
unusualplaces.org

आजकाल स्वयंपाकघरात त्या चुलींमुळे धूर होत नाही त्यामुळे भिंती काळ्या होण्याचाही प्रश्न नाही. तरी देखील आजही या गावातील महिला दरवर्षी आपली घरे सुंदर कलाकारीने रंगवतात  करतात. सुरवातीला त्यासाठी गाईच्या केसांपासून बनविलेले ब्रश वापरले जात असे आता मात्र आधुनिक ब्रश वापरले जातात.


माणसाचे विचारांनी जर प्रत्यक्ष रूप घेतलं तर तो काय काय साकारू शकतो याची अनेक उदाहरणे आज आपल्या समोर आहेत. पण विपरीत परिस्थितीतून आपण स्वतःला सावरू शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे हे झालिपाई गाव…

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.




One thought on “जेथील कणाकणात सौंदर्य नांदतं असं जगातील सर्वात सुंदर गाव – “झालिपई”!

  • September 19, 2017 at 4:26 pm
    Permalink

    शेती विषयी नवा भाग ठेवा रोज अपडेट करा कारण श्रीमंत शहरी व ग्रामीण शेतकरी याचा फायदा ghetil

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?