हिंदी YouTube सिरीज ज्या भारतीय तरुणाई represent करतात

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

लेडीज & जेन्टलमन…accept it…टीव्हीचं अस्तित्व संपुष्टात येतंय. किमान आपल्या generationसाठी तरी टीव्ही नावापुरताच उरला आहे. आणि हे केवळ टीव्हीच्या ढळत्या TRPs वरून कळत नाहीये. भारतीय तारुण्याने भारावलेल्या काही वेब-व्हिडीओ-सिरीज सध्या YouTubeवर गाजत आहेत. You must watch them!

1 – TVF Pitchers

9 hours a day – 5 days a week : ह्या चक्रात अडकलेल्या आणि त्यातून बाहेर पडण्याची स्वप्न बघणाऱ्या सर्वांसाठी ही कथा आहे! ऑफिसला वैतागलेले 4 तरुण एकत्र येऊन एक start-up उभी करण्याची धडपड करताना ह्यात दाखवले आहेत. मजबूत कथानक, strong डायलॉग्ज आणि रोजच्या जीवनातले subtle विनोद – असं कॉम्बिनेशन म्हणजे TVF Pitchers. The Viral Fever – ह्या YouTube channel ची ही निर्मिती आहे.

 

 

2 – Permanent Roommates

The Viral Fever ची ड्रामा सिरीज. एका मुलीचा प्रेमात सर-से-पांव-तक बुडालेला प्रियकर आणि ‘ह्याच्यासोबत लग्न करू की नको’ ह्या विवंचनेत अडकलेली त्याची प्रेयसी. साधी सरळ स्टोरी लाईन असलेली ही सिरीज, असे अनपेक्षित वळणं घेत जाते की आपल्याला लागोपाठ सगळे एपिसोड्स बघण्याचा मोह होतो.

 

 

3 – Baked

ScoopWhoop ची स्टुडंट लाईफ कॉमेडी. 2 सिनिअर्स सोबत राहणारा 1 जुनिअर – आणि ह्या तिघांचे धम्माल अनुभव!

 

 

4 – Pretentious Movie Reviews by Kanan Gil

Not a series, actually. हे 2 IITiansनी जुन्या हिंदी फिल्म्सचे घेतलेले reviews आहेत. हिंदी फिल्म्समध्ये जे जे विचित्र आणि idiotic आहे, ते सर्व हे दोघं मिळून बाहेर काढत असतात. उदाहरण म्हणून  the legendary “Dilwale Dulhaniya Le Jayenge”ची ह्या दोघांनी केलेली चिरफाड बघा!

 

 

5 – Man’s World

कधीकधी स्त्री-मुक्तीवाल्यांचा राग येतो का तुम्हाला? असं वाटतं का की Feminismचा अतिरेक होतोय? स्त्रियांना आरक्षित सीट्स – पुरुषांसाठी काहीच खास नाही, आईच्याच प्रेमाचं कौतुक – बापाचं काहीच विशेष नाही — असं काही वाटतं? तसं असेल – तर YFilms ची ही सिरीज तुम्ही बघायलाच हवी.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?