भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आयएएसच्या परीक्षेबद्दल तुमच्यातील बहुतेक लोकांना माहिती असेलच. आयएएसची परीक्षा ही खूपच कठीण अशी परीक्षा मानली जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी आयएएस परीक्षेत उत्तीर्ण होतात आणि खूप कमी लोक निवडले जातात. तुम्हाला ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अतिशय हुशार आणि तीक्ष्ण विचारवंत असणे गरजेचे आहे, कारण ही परीक्षा खूपच कठीण असते.

भारतीय प्रशासकीय सेवा मिळवण्यासाठी खरोखरच खूप परिश्रम घेणे गरजेचे आहे. यासाठी कमीत कमी दिवसातून १५ ते २० तास अभ्यास करणे गरजेचे आहे. ही परीक्षा देणारा बुद्धिमान आणि तीक्ष्ण विचारवंत असेल तरच तो आयएएसची मुलाखत पास करू शकतो. या परीक्षेसाठी शिकवणीसाठी पैसे नसूनसुद्धा काही जणांनी ही परीक्षा योग्यप्रकारे उत्तीर्ण केलेली आहे.

ही परीक्षा पास करण्यासाठी अभ्यासाला खूप वेळ द्यावा लागतो आणि त्यासाठी खूप कालावधी खर्च होतो. पण असे असून देखील अन्सार शेख याने अवघ्या २१ व्या वर्षी ही परीक्षा पास केली.

२०१५ मध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नामध्ये ही परीक्षा उत्तीर्ण केली. त्याने या परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून ३६१ वा क्रमांक मिळवला आणि त्याने २२ वर्षामध्ये आयएएस झालेल्या रोमन सैनी याला मागे टाकून सर्वात तरुण आयएएस बनण्याचा मान पटकावला.

Ansar shaikh.marathipizza
4.bp.blogspot.com

अन्सर हा महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील शेगाव गावातील रिक्षाचालक योनीस शेख यांचा मुलगा आहे. त्याची आई शेती करते आणि त्याचा धाकटा भाऊ अनीस याने सातवीनंतर शाळा सोडून दिली होती. अनिसने त्याच्या कुटुंबीयांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या भावाला आयएएस परीक्षेसाठी मदत करण्यासाठी गॅरेजमध्ये काम करण्यास सुरवात केली.

आयएएसचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अन्सरने तीन वर्ष प्रत्येक दिवशी १२ तास अभ्यास केला. अन्सरने आपल्या घरातील परिस्थितीबद्दल सांगताना म्हटले की,

माझ्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कुणीही शिक्षणाला एवढे महत्त्व दिलेले नाही. माझे वडील हे एक रिक्षाचालक आहेत. त्यांना तीन पत्नी आहेत. माझी आई ही त्यांची दुसरी पत्नी.

माझ्या धाकट्या भावाने शाळा सोडली आणि माझ्या दोन बहिणींची लहान वयामध्येच लग्न झाली.

मी त्यांना सांगितले की, मी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे आणि मला आयएएस अधिकारी बनायचे आहे. हे ऐकून माझ्या घरच्यांना धक्का बसला.

सध्या अन्सरची नियुक्ती पश्चिम बंगालमध्ये करण्यात आली आहे.

 

Ansar shaikh.marathipizza1
reliableacademy.com

अन्सरचे कुटुंब मोठे आणि गरीब होते, तरीदेखील त्याच्या शिक्षणाशी त्याच्या कुटुंबीयांनी कधीही तडजोड केली नाही. अन्सरला दहावीच्या बोर्ड परीक्षेला ९१ टक्के गुण मिळाले होते. त्याने फर्ग्युसन महाविद्यालयातून समाजशास्त्राची पदवी घेतली.

अन्सर याने यूपीएससीच्या नागरी सेवांचे शिक्षण घेण्यासाठी खाजगी प्रशिक्षण वर्ग लावले होते. यासाठी त्याच्या कुटुंबियांना खूप खर्च करावा लागला, पण त्यानंतर अन्सरला मिळालेल्या यशामुळे त्यांना खूप आनंद झाला.

त्याला मार्गदर्शन आणि पाठबळ देण्यासाठी त्याने ३० वर्षीय त्याचे शिक्षक राहुल पांडवे यांचे आभार मानले. पांडवे यांनी सुद्धा २००९ मध्ये सिव्हील सर्विसेसची परीक्षा पास केली होती आणि त्यावेळी ते संपूर्ण भारतामधून २०० वे आले होते.

 

Ansar shaikh.marathipizza2
i.ytimg.com

अन्सर हा आपल्या यशाबद्दल बोलताना म्हणाला की,

जेव्हा आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करायची असतात, तेव्हा कठोर परिश्रम घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. माझ्या मित्रांनी माझ्या संघर्षामध्ये मला खूप मानसिक आणि आर्थिक आधार दिला. तर माझ्या घरची परिस्थिती लक्षात घेऊन माझ्या कोचिंग अॅकॅडमीने सुद्धा माझी अर्धी फी माफ केली.

अशाप्रकारे अन्सरने आयएएस बनण्यासाठी परिस्थितीवर मात करून खूप परिश्रम घेऊन आपले स्वप्न पूर्ण केले आणि तरुण पिढीसाठी एक नवीन आदर्श कायम केला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

One thought on “भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा सुपुत्र!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?