ह्या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देईल १५३ किमी प्रतीलिटर इतके एव्हरेज

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

उत्तर प्रदेशच्या एका तरुणाने एक अशी टेक्निक शोधून काढली आहे ज्याच्याने आता बाईक १ लिटर पेट्रोलमध्ये १५३ किलोमीटरचे एवरेज… हो तुम्ही बरोबर वाचलं, १५३ किलोमीटर पर लिटर! म्हणजे कुठल्याही नॉर्मल बाईकच्या एव्हरेजच्या दुप्पट.

InMarathi Android App

 

vivek-bike average-inmarathi03
youtube

आता आपल्याला नक्कीच असं वाटत असणार की, बाईक एवढा एव्हरेज देऊच कशी शकते? तर एका तरुणाने हे करून दाखवले आहे. आणि त्याच्या या टेक्निकला उत्तर प्रदेशच्या कौन्सिल फॉर सायन्स अंड टेक्नोलॉजी तसेच एला राष्ट्रीय इन्स्टिट्यूटने देखील प्रमाणित केले आहे. आणि ही टेक्निक एवढी स्वस्त आहे की, अवघ्या काहीशे रुपयांत एक छोटासा बदल करून बाईकचे एव्हरेज १५३ किलोमीटर प्रतिलिटर पर्यंत वाढवता येते.

 

vivek-bike average-inmarathi
samacharplus.com

हे शक्य करून दाखविणारा तरुण म्हणजेच विवेक कुमार पटेल. हा उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील गुदडी ह्या गावात राहतो. बाईक इंजिनवर तो अनेक वर्षांपासून काम करत होता.

 

vivek-bike average-inmarathi05
youtube

बाईकच्या इंजिनमध्ये एक छोटासा बदल करून त्याने बाईकचे एव्हरेज १५३ किलोमीटर प्रती लिटर करण्याचा चमत्कार करून दाखवला आहे. विवेक कुठल्याही बाईकमध्ये आपल्या टेक्निकचा वापर करून तो त्याचे एव्हरेज ३०-३५ किलोमीटरने वाढवू शकतो.

विवेकने केलेला हा बदल केवळ एक बदल नसून ती एक टेक्निक आहे. कारण त्याला उत्तरप्रदेशच्या कौन्सिल ऑफ सायंस अंड टेक्नॉलॉजी आणि अलाहाबाद च्या मोतीलाल नेहेरू नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी ने प्रमाणित केले आहे.

 

vivek-bike average-inmarathi02
wikimedia.org

रिपोर्ट्स नुसार, उत्तरप्रदेश कौन्सिलने विवेकच्या ह्या प्रयोगाला इनोव्हेटिव्ह टेक्निक म्हणून प्रमाणित करण्यासाठी मोतीलाल नेहेरू नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या मॅकेनिकल डिपार्टमेंटकडून ह्याचे परीक्षण करवले. आणि त्यात ही टेक्निक बरोबर असल्याचं समोर आलं.

ह्याबाबत सांगताना विवेक म्हणतो की,

“मी ह्या टेक्निकच्या माध्यमातून बाईक, जनरेटर तसेच इतरही काही वाहनांचे एव्हरेज वाढविण्याचा प्रयोग करत होतो. हे काम करण्यासाठी मला २ वर्ष लागले.”

 

vivek-bike-average-inmarathi01
navbharattimes.indiatimes.com

ह्या टेक्निकमध्ये केवळ बाईकच्या कार्बोरेटरला बदलावे लागते. विवेक बाईकमध्ये लागलेला कार्बोरेटर काढून त्याने बनवलेले कार्बोरेटर लावतो. त्यानंतर बाईकचे एव्हरेज वाढते. यात साधारण ५०० रुपयांचा खर्च येतो.

 

vivek-bike average-inmarathi06
indiatimes.com

युपीसीएसटीने ह्या आयडियाच्या पेटेंट रजिस्ट्रेशनसाठी देखील अप्लाय केले आहे. पेटेंट मिळाल्यानंतर ह्या टेक्निकचा कमर्शियल वापर होऊ शकेल. पेटेंट मिळाल्यानंतर बाईक बनविणाऱ्या कंपनी ह्याला विकत देखील घेऊ शकतात. ह्याचा वापर करून अधिक एव्हरेज देणाऱ्या बाईक तयार केल्या जाऊ शकतात. त्यामुळे कंपनीचा सेल आणि नफा वाढू शकतो. तर दुसरीकडे याने पेट्रोलचा वापर देखील कमी होईल.

कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या टेक्नोलॉजी बिझनेस इंक्युबेशन सेंटरने विवेक च्या ह्या नव्या टेक्निकला स्टार्टअप म्हणून रजिस्टर केले आहे. ह्या स्टार्टअप प्रोजेक्टकरिता सेंटरकडून मदत म्हणून ७५ लाख रुपये स्वीकृत केले गेले आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

5 thoughts on “ह्या तरुणाच्या एका प्रयोगाने आता बाईक देईल १५३ किमी प्रतीलिटर इतके एव्हरेज

 • March 9, 2018 at 10:13 am
  Permalink

  ya deshala ashach turunachi jast garaj Aahe

  Reply
 • March 9, 2018 at 11:03 am
  Permalink

  सरस्वतीचे वरदान लाभलेल्या प्रयत्नवादी तरुणांना लक्ष्मी प्राप्ती झाली तर पाण्यावर यंत्र चालविण्याची धमक भारतीय तरुणाईत आहे.

  Reply
 • March 9, 2018 at 4:13 pm
  Permalink

  खूप छान टेक्नॉलॉजी आहे भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *