हे वाचल्यावर तुम्ही कधीही लघवी थांबवून ठेवणार नाही..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्या शरीराची पचनक्रिया योग्यप्रकारे होण्यासाठी आपल्या शरीरातील मलमूत्र योग्य त्या वेळी शरीरातून बाहेर पडणे आवश्यक असते. नाहीतर, त्यामुळे आपल्याला शरीराच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. कितीतरी लोक कामात व्यस्त असताना जाणूनबुजून लघवी थांबवण्याची मोठी चूक करतात. जर तुम्ही १० मिनिटांपेक्षा जास्त लघवी थांबवलीत, तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कितीतरी वेगवेगळ्या आजारांचा जन्म होऊ शकतो आणि हे खूपवेळा तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. त्यामुळे जर तुम्ही देखील लघवी थांबवण्याची चूक करत असाल, तर तुम्हाला देखील आताच सावध होण्याची गरज आहे.

InMarathi Android App

 

Side effect of holding urine.Inmarathi
amazonaws.com

मूत्रमार्गामध्ये संसर्ग होतो

जर तुम्ही दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ लघवी थांबवण्याची चूक करत असाल, तर त्यामुळे तुमच्या मूत्रमार्गामध्ये संसर्गाची  समस्या निर्माण  होऊ शकते.

असे का होते ?

खरेतर, जशी आपल्याला लघवीला लागते, तसेच आपला मेंदू आपल्यापर्यंत ही माहिती पुरवतो. मूत्रामध्ये देखील कितीतरी दूषित पदार्थ असतात. जर या पदार्थांना खूप वेळेपर्यंत एकाच जागेवर अडकवून ठेवले, तर हे पदार्थ इन्फेक्शनचे कारण बनू शकतात. हे पदार्थ एवढे धोकादायक असतात की, यांच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन देखील करावे लागू शकते.

 

Side effect of holding urine.Inmarathi1
cloudfront.net

मूत्रपिंडामध्ये दगड होण्याची भीती

जर तुम्ही जास्त वेळ लघवी तशीच थांबवून ठेवलात, तर तुमच्या मूत्रपिंडावर म्हणजेच किडनीवर साहजिकपणे त्याचा प्रभाव पडतो. हे किडनीमध्ये दगड देखील तयार करू शकते.

असे का होते ?

मूत्राशयामध्ये जेव्हा सर्व गोष्टी वेगवेगळ्या करून जेव्हा लघवी तयार होते, तेव्हा आपला मेंदू आपल्याला ही माहिती पोहोचवतो की, तयार झालेली लघवी बाहेर टाका. या लघवीला जर दहा मिनिटांच्या आतमध्ये बाहेर टाकले गेले नाही, तर ती परत बॅकअप होण्यास सुरुवात होते. हे सारखे अशाप्रकारे चालू राहिले, तर तुमच्या मूत्रपिंडामध्ये म्हणजेच किडनीमध्ये दगड तयार होतो.

 

Side effect of holding urine.Inmarathi2
powerfm.bg

मूत्राशयाला सुज येणे

आपली लघवी मूत्राशयात एकत्रित होते. या लघवीमध्ये असे कितीतरी पदार्थ असतात, जे आपल्या शरीराला खूप नुकसानकारक ठरू शकतात. फक्त हेच एक कारण आहे की, हे तुमच्या मूत्राशयाच्या लेयरला एकप्रकारचे रिएक्शन करतात आणि यामुळे हे आपल्या मूत्राशयाला सूज येण्याचे प्रमुख कारण ठरतात.

किडनी म्हणजेच मूत्रपिंड खराब होणे

कधी – कधी इमर्जन्सीमध्ये लघवी थांबवणे, आपण एखादेवेळी समजू शकतो. पण तुम्ही आळसामुळे जर नियमितपणे लाघवी थांबवत असाल, तर तुमच्यासाठी हे धोकादायक ठरू शकते. लघवी सारखी थांबवली तर, हे लघवीमधील पदार्थ सारखे तुमच्या किडनीच्या आसपास येत असतात आणि यामुळे तुमच्या मूत्रपिंडाला म्हणजेच किडनीला खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो. या कारणामुळे, तुमची किडनी खराब होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे.

 

Side effect of holding urine.Inmarathi3
lybrate.com

लघवीच्या रंगामध्ये बदल

जर तुम्ही गरज नसतानाही सारसारखी लघवी थांबवत असाल आणि तिच्या ठरलेल्या काळामध्ये तिला बाहेर काढत नसाल. तर यामुळे तुमच्या लघवीचा रंग बदलू शकतो. हे होणारे परिवर्तन लघवीला सल्जम, हिरवा, पिवळा आणि अजूनही कितीतरी रंगामध्ये बदलू शकते.

मूत्राशयाच्या मांसपेशी कमकुवत होतात

आपल्या लघवीमधील विषारी घटक मूत्राशयाच्या मांसपेशींचे नुकसान करण्यामध्ये कोणत्याही परकारची कमतरता ठेवत नाही. यामुळे तुमच्या शरीरामध्ये एक मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

 

Side effect of holding urine.Inmarathi4
lifeberrys.com

जर तुम्ही देखील रोज – रोज लघवी थांबवत असाल, तर तुम्हाला देखील याच समस्यांमधून जावे लागू शकते. यामुळे लघवी करताना तुमचे लिंग दुखू शकते. त्यामुळे लघवी थांबवण्याच्या आधी नेहमी त्याच्यामुळे होणाऱ्या समस्यांचा नक्की विचार करा, नाहीतर ते तुमच्या जीवावर बेतू शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *