अयोध्येतील “त्या” धर्मस्थळाला ‘मशीद’ म्हणणं हा मुळात इस्लामचा अपमान…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : तन्मय केळकर 

===

भाग १ : बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास

===

भाविक हिंदू जेव्हा देवळात जातात तेव्हा देवळातील प्राणप्रतिष्ठा केलेल्या मूर्तीमध्ये देवता/ परमेश्वर निवास करतो अशी त्यांची श्रद्धा असते. मंदिर हे त्या देवतेचं निवासस्थान आहे असं त्या हिंदूचं श्रद्धाळू मत असतं. याच श्रद्धाळू, भाबड्या हिंदूला लहानपणापासून असं शिकवलं जातं की सर्व धर्म सर्व बाबतीत समान असतात.

त्यामुळे जसा हिंदूंचे देव देवळात निवास करतात त्याचप्रमाणे मशिदीमध्ये मुस्लिमांचा श्रद्धेय परमेश्वर म्हणजेच अल्लाह निवास करतो असं त्याला वाटतं.

अनेक इस्लामनिष्ठ मोमीनसुद्धा काफिरांच्या संगतीत राहून याच गैरसमजाचे बळी झालेले दिसतात. पण हा अल्लाह व इस्लामबद्दलचा फारच चुकीचा समज आहे.

 

islam-marathipizza01
fthmb.tqn.com

इस्लामनुसार अल्लाह हा सर्वश्रेष्ठ (अकबर) सर्वशक्तिमान (अझीम), अनंत (वसी), निर्गुण, निराकार आहे. चार भिंती व एक छप्पर असलेल्या मशिद नावाच्या बांधकाम केलेल्या वास्तूमध्ये अल्लाह असतो असे म्हणणे हे अल्लाहच्या स्वरूपाला अपमानित करण्यासारखे आहे. इस्लामनुसार मशीद हे फक्त एकत्र जमण्याचे ठिकाण आहे.

नमाज पडण्यासाठी मशीद अनिवार्य नाही. ऑफिसमध्ये, घरांमध्ये, रस्त्यात, कुठेही नमाज अदा करता येते (पवित्रता व स्वच्छतेचे बाकी काही ठरलेले नियम पाळून).

याच कारणामुळे इस्लामी देशांमध्ये रस्त्याचे बांधकाम, एखाद्या इमारतीचे बांधकाम किंवा अन्य तत्सम कारणांमुळे मशीद पाडणे ही सामान्य गोष्ट आहे.

(याचा अर्थ हिंदू काफिरांना बाबरी पाडण्याचा अधिकार आहे असं मला म्हणायचं आहे असा होत नाही.) हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर राखत, भूतकालीन धर्मांध मुस्लिम राज्यकर्त्यांचे सर्व धर्मद्वेष्टे अपराध मान्य करत मुस्लिमांनी स्वतः बाबरीची जागा दान करून धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावेत.

बुतपरस्त वास्तूला मशीद म्हणणं दीन ए इस्लामच्या खि़लाफच आहे हे विसरू नये. अयोध्येतील त्या धर्मस्थळाला मशीद म्हणणं हा इस्लामचा अपमान आहे.

 

babri-masjid-demolition-marathipizza
india.com

ज्या वास्तूला पाडल्याबद्दल विवाद सुरू आहे ती वास्तू मुळात मशीद म्हणायच्या योग्यतेची नव्हतीच. बाबरने तेथील राम जन्मस्थान असलेलं मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असा दावा आहे. मधल्या अनेक वर्षांमध्ये तिथे नमाज अथवा अन्य कोणतीही इस्लामी इबादत सुरू नव्हती.

पण १९४७ पासून तिथे पुन्हा एकदा राम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्ती ठेवून त्यांची पूजाअर्चा सुरू केली गेली होती. पुढे त्या वास्तूच्या मालकीसंबंधी विवाद सुरू झाल्यानंतर वास्तूला टाळं ठोकलं गेलं.

१९८६ साली न्यायालयाच्या आदेशावरून टाळं उघडलं गेलं. त्या ठिकाणी पुन्हा एकदा मूर्तिपूजा सुरू झाली होती जी इस्लामला सर्वाधिक हराम आहे.

अशा काफ़िरांना पूजनीय झालेल्या बुतपरस्त वास्तूला मस्जिद म्हणणं ही इस्लामची तौहीन (अपमान) आहे. त्यामुळे सच्च्या इमानवाल्यांनी दीन ए इस्लाम के खातीर ती तौहीन करू नये.

===

लेखमालेतील तिसरा, शेवटचा भाग : बाबरी मशीद प्रकरण आणि जगभरात वाढत चाललेला इस्लामद्वेष

===

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अयोध्येतील “त्या” धर्मस्थळाला ‘मशीद’ म्हणणं हा मुळात इस्लामचा अपमान…!

  • November 3, 2018 at 9:30 am
    Permalink

    छान

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?