' माणूस स्वतःचा नाश कसा ओढवून घेतोय हे दाखवणाऱ्या ७ महाभयंकर जागा – InMarathi

माणूस स्वतःचा नाश कसा ओढवून घेतोय हे दाखवणाऱ्या ७ महाभयंकर जागा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज अख्या पृथ्वीला प्रदूषण नामक महाराक्षसाने घेरले आहेत आणि या प्रदूषणाला दुसरे तिसरे कोणी नाही तर आपण मनुष्यच जबाबदार आहोत. याच प्रदुषणामूळे जगभरात निर्माण झाली आहेत अशी विषारी ठिकाण जी सजीव प्राण्याचा सहज जीव घेऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात विषारी ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जेथे जाणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण आहे. कधीकाळी ही ठिकाणे स्वर्गाप्रमाणे होती. मात्र अगोदर सांगितल्याप्रमाणे मनुष्य प्राण्यानेच ती विषारी बनवली आहेत.

लिनफेन शहर

toxic-places-marathipizza01

चीनचे लिनफेन हे जगातील सर्वात विषारी वायूंचे शहर आहे. त्यास नरक म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. तुम्ही पांढरे कपडे परिधान केले असेल तर ते काही क्षणात लिनफेनमध्‍ये काळी होतात, यावरुन तुम्हाला येथील प्रदूषणाची कल्पना येऊ शकते.

 

ग्रेट पॅसिफिक बेट

toxic-places-marathipizza02

पॅसिफिक महासागरामधील ग्रेट पॅसिफिक बेट जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात विषारी ठिकाण म्हणून ओखळले जाते. या बेटावर भरपूर प्लास्टिक कचरा आहे.  या बेटाचा आकार अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या दुप्पट आहे.

 

अॅमेझॉन नदीच्या आसपास असलेली जमीन

toxic-places-marathipizza03

ब्राझीलच्या रोनडोनियातून वाहणाऱ्या अॅमेझॉन नदीच्या आसपास असलेली हजारो एकर जमीन म्हणजे जगातील तिसरे सर्वात प्रदूषित ठिकाण आहे. एके काळी हे ठिकाण हिरवेगार होते.

 

यमुना नदी

toxic-places-marathipizza04

भारतात आध्‍यामिक दृष्‍ट्या पवित्र समजली जाणारी यमुना नदी आज प्रचंड प्रदूषित झाली आहे. तिचा आज जगातील सर्वात विषारी स्थानात समावेश केला जातो. मात्र सरकार नेहमी यमुनेच्या स्वच्छतेचा दावा आणि आश्‍वासन देत आली आहे. परंतु वास्तव हे आहे, की हजारो मेगा लिटर पर डे प्रमाणावर यमुनेत कचरा टाकला जातो.

 

ओरोया

toxic-places-marathipizza05
पेरुच्या ओरोयामध्‍ये शिसेचे प्रमाण प्रचंड आहे. याचा अंदाज येथील मुलांच्या रक्तात आढळणा-या शिसावरुन येईल. शिसेच्या प्रदूषणाला अमेरिकन कंपनी डू रन जबाबदार आहे.

 

कराचय तलाव

toxic-places-marathipizza06

आण्विक कच-यामुळे रशियाची कराचय तलावातील किरणोत्सर्ग प्रचंड वाढला आहे. तलावाच्या संपर्कात येणा-या कोणत्याही व्यक्तीला काही क्षणात दवाखान्यात घेऊन जावे लागते. या भागातील कामगार सर्वात जास्त कॅन्सरने त्रस्त आहे. तसेच येथे जन्मास येणारी बहुतेक मुले लेकिमियाने त्रस्त असतात.

माणसाने वसंधूरेबरोबरच अंतराळही प्रदूषित केले आहे. जवळजवळ 4 लाख पौंड वजनाचा अंतरराळ कचरा (उपग्रह आणि सर्व अंतराळ यान) अंतराळाला प्रदूषित करत आहे.

toxic-places-marathipizza07

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?