जगातील ५ अद्भुत आणि बुचकळ्यात टाकणारी ठिकाणे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

निसर्गाची जादूगिरी म्हटल्यावर लगेच डोक्यात ग्रँड कॅनयन आणि व्हिक्टोरिया धबधबा यांसारखी नावं येतात. ही ठिकाणं लोकांना आकर्षित करतात. या व्यतिरिक्त जगात अशी अनेक ठिकाणं आहे, जे तुम्हाला आचंबित करु शकतात. या ठिकाणांविषयी जाणून घेऊनही यावर विश्‍वास बसणार नाही… चला तर मग जाणून घेऊया अश्याच बुचकळ्यात टाकणाऱ्या काही ठिकाणांबद्दल…

१) मोविल केव, रोमानिया

amazing-places-marathipizza01
romaniajournal.ro

ह्या गुहेच्या आत आहे सल्फर आणि हीच ह्या गुहेची विशेषता आहे. रोमानियाच्या या गुहेत ५५ लाख वर्ष प्रकाशाचे एक किरणही पोहोचलेले नाही. या गुहेतील वातावरण पृथ्‍वीच्या तुलनेत फार वेगळे आहे. आत दुर्गंध येणारे तलाव आहे. या तलावाचे पाणी सल्फ्युरिक युक्त आहे. गुहेची हवा विषारी असून यात पूर्णपणे हायड्रोजन सल्फाईड आहे. ज्यात कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण खूप आहे.

 

२) माराकॅबो, व्हेनेझुएला

amazing-places-marathipizza02
i.ytimg.com

येथे रात्री रोज १० तास विजांचा कडकडाट होतो. व्हेनेझुएलामध्‍ये काटाटुंबा नदीवर रात्री विजे कडकडणे बंद होतच नाही. रोज संध्‍याकाळी ७ वाजल्यापासून प्रत्येक रात्री पाण्‍याच्यावर जवळजवळ १० तासांपर्यंत वीजांचा कडकडाट होतो. वर्षांत २६० रात्रींमध्‍ये हे दृश्‍य दिसते. मात्र यामागील नेमके कारण स्पष्‍ट नाही.

 

३) नारेसबॉरो, नॉर्थ यॉर्कशायर, इंग्लंड

amazing-places-marathipizza03
divyamarathi.bhaskar.com

येथे पाण्‍याच्या खाली कोणतीही वस्तू ठेवल्यास दगड बनते. येथे एका पर्वतावरुन जे पाणी खाली पडते, त्याच्या खाली जी वस्तू येईल त्यांचे दगडात रुपांतर होते. मात्र ही प्रक्रिया पूर्ण होण्‍यासाठी तीन ते पाच महिने लागतात. लोक यामागे भूत असल्याचे मानत होते. वैज्ञानिकांनुसार, या पाण्‍यात घटकद्रव्यांचे प्रमाण खूप असल्याने असे घडत आहे.

 

४) गूनर समुद्र, ऑस्ट्रिया

amazing-places-marathipizza04
wikimedia.org

वसंत ऋतूत येथील पार्क पाण्‍यात बुडते. ऑस्ट्रियाच्या या पार्कमध्‍ये जर तुम्हाला जॉगिंग करायचे असेल तर शरद ऋतूत यावे लागेल. वसंत ऋतू येताच येथील दृश्‍य बदलून जाते. हे पूर्ण पार्क पाण्‍यात बुडून जाते. हे पार्क ज्या हॉच्सक्वाब पर्वताजवळ आहे तो थंडीत बर्फाने झाकला जातो.
जेव्हा बर्फ वितळू लागतो तेव्हा पार्कमधील तलावाचा आकार दुप्पटीने वाढतो व पार्क पाण्‍यात बुडतो.

 

५) शनय-तिम्पिश्‍का नदी, अॅमेझॉन

amazing-places-marathipizza05
treehugger.com

या नदीचे पाणी ९१ डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम आहे. अॅमेझॉनच्या जंगलांमध्‍ये ४ मैल आत या नदीसारख्‍या दिसणाऱ्या जमिनीवर कदाचित एखादी नदी असेल. शनय-तिम्पिश्‍का नदीचे पाणी इतके गरम आहे, की जर यात एखादा प्राणी पडला तर जिवंत राहणार नाही. या नदीचे पाणी ९१ डिग्री सेल्सिअस गरम आहे आणि शास्त्रज्ञही यामागील कारण शोधू शकलेले नाही. साधारणत: ज्वालामुखीमुळे आसपासच्या नद्यांचे पाणी गरम होते. मात्र ही नदी ज्वालामुखीपासून ७०० किमी लांब आहे.

ह्या ठिकाणांमागचे कोडे मात्र अजूनही न उलगडलेलेचं आहे!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?