अश्या Whiskies होणे नाही – जाणून घ्या जगातील सर्वात महागड्या Whiskies विषयी!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


दारू वगैरेचं नाव काढलं रे काढलं की आसपासच्या लोकांची नाक मुरडलीच बघा! पण मंडळी आपल्यालाही माहित आहे की, सत्य परिस्थिती काय आहे. अगदीच कमी लोक अशी असतील ज्यांनी दारूला कधीच हात लावला नसेल, पण बाकीचे मात्र छुपे रुस्तम असतात. वरकरणी दारूचा विरोध मात्र मैफिलीत तिच्या स्तुतीशिवाय दुसरं काही सुचत नाही यांना! असो, येथे दारू पिण्याऱ्यांच किंवा खुद्द दारूचं समर्थन वगैरे आम्ही काही करत नाही आहोत, पण विषयच तसा आहे म्हटल्यावर गाडी गेलीच की हो त्या दिशेला. तर या दारूमधला सर्वच मद्यप्रेमींचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे व्हिस्की! आता असं का… ते तुम्हाला आम्ही सांगत नाही, नसेल माहित तर तुमच्या जवळच्या एखाद्या मद्यप्रेमीला नक्की विचारा. असो, तर आज आपण जाणून घेतोय जगातील सर्वात महागड्या व्हिस्कींविषयी! या अश्या व्हिस्की आहेत, ज्या ‘एकमेवाद्वितीय’ आहेत! आणि ते सिद्ध करायला त्यांची किंमत देखील पुरेशी आहे. चला तर जाणून घेऊया जगातील सर्वात महागड्या व्हिस्कींमध्ये एवढं काय खास आहे ते!

Dalmore 62 Single Highland Malt Scotch Matheson – 37,16,930 रुपये

best-whiskey-marathipizza01
mensxp.com

1942 मध्ये 12 बॉटल व्हिस्की तयार करण्यात आली होती. यातील प्रत्येक बॉटलला वेगवेगळे नाव देण्यात आले होते. परंतु, सर्व नावांमध्ये Dalmore Estate चा उल्लेख होता. यातील सर्वांत महागडी Matheson व्हिस्की होती. या कंपनीचे मालक अॅलेक्झांडर मॅथेसन यांच्या नावावर तिचे नाव ठेवण्यात आले होते.

 

Macallan 1926 – 48,06,275 रुपये

best-whiskey-marathipizza02
luxurylaunches.com

Macallan च्या जुन्या आणि दुर्मिळ व्हिस्कीचे मोठे कलेक्शन आहे. 1926 मध्ये ही व्हिस्की तयार करण्यात आली होती. 1986 मध्ये केवळ 40 बॉटलमध्ये भरण्यात आली. ही व्हिस्की घेताना पाणी टाकावे लागत नाही.


 

Chivas Regal Royal Salute 50-Year-Old – 6,40,850 रुपये

best-whiskey-marathipizza03
luxurylaunches.com

2002 मध्ये राणी एलिझाबेथ द्वितिय यांची गोल्डन ज्युबिली साजरी करण्यासाठी Chivas Regal ने Chivas Regal Royal Salut नावाची व्हिस्की सादर केली. ही व्हिस्की 1952 मध्ये तयार करण्यात आली होती. तेव्हापासून ती जपून ठेवली होती. अखेर गोल्डन ज्युबिली कार्यक्रमात हीचा आस्वाद घेण्यात आला.

 

Glenfiddich 1937 – 12,81,700 रुपये

best-whiskey-marathipizza04
whiskyintelligence.com

स्कॉटलंडमध्ये 1937 मध्ये हिची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर ती तशीच बॅरलमध्ये भरून ठेवण्यात आली. 2001 मध्ये हे बॅरल उघडण्यात आले. त्यातून 61 बॉटल व्हिस्की भरण्यात आली.

 

Macallan 1946 – 2,94,79,100 रुपये

best-whiskey-marathipizza05
whisky-onlineauctions.com

2010 मध्ये या व्हिस्कीची एक बॉटल लिलाव आयोजित करुन विकण्यात आली. समाजसेवेसाठी निधी गोळा करणे हा या लिलावामागचा उद्देश होता. दुसऱ्या महायुद्धामुळे कोळशाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. त्यावेळी peated malt वर ही व्हिस्की तयार करण्यात आली होती

 

Dalmore 50-Year-Old – 7,04,935 रुपये

best-whiskey-marathipizza06
multivu.com

50 वर्षांपूर्वी तयार केलेली आणि सर्वांत जास्त मागणीत राहिलेली ही व्हिस्की आहे. 1920 मध्ये हिची निर्मिती करण्यात आली. 1978 मध्ये केवळ 60 बॉटलमध्ये ही भरण्यात आली. यासाठी बॉटलला खुप आकर्षक बनवण्यात आले होते.

 


Glenfiddich Janet Sheed Roberts Reserve 1955 – 60,23,990 रुपये

best-whiskey-marathipizza07
i.pinimg.com

Glenfiddich कंपनीकडे स्कॉच व्हिस्कीचे 1955 च्या बनावटीचे एक बॅरल होते. Glenfiddich चे संस्थापक विल्यम ग्रांट यांची मोठी मुलगी जानेट शिड रॉबर्ट यांचे 110 व्या वर्षी निधन झाले. त्यावेळी या कंपनीने या बॅरलपासून 15 बॉटल व्हिस्की बाहेर काढली. त्यातील चार बॉटल रॉबर्ट कुंटुबाला देण्यात आल्या तर उर्वरित बॉटलची विक्री करण्यात आली. एका व्हिस्कीप्रेमीने याची एक बॉटल अटलांटा येथून ६०,२३,९९० रुपयांना विकत घेतली होती.

 

Macallan 55-Year-Old – 8,01,062 रुपये

best-whiskey-marathipizza09
wine-searcher1.freetls.fastly.net

गेल्या 55 वर्षांपूर्वी शेरी ओक बॅरलमध्ये हिची निर्मिती करण्यात आली. रिनी लॅलिकी यांनी तयार केलेल्या Lalique Crystal Decanter मध्ये ती भरण्यात आली. 1910 मध्ये त्यांनी अशाच एक सुगंधाच्या बॉटलची निर्मिती केली होती.

अश्या या सर्वात महागड्या व्हिस्की मार्केटमध्ये काही उपलब्ध होत नाहीत. त्या एकदाच बनवल्या गेल्या आणि एकदाच त्यांची विक्री केली गेली, आता या व्हिस्की कोण्यातरी गर्भश्रीमंतांच्या कलेक्शनमध्ये थाटात विराजमान असतील!

 


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?