जगातील सर्वात “विषारी” गार्डन !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

निसर्ग ही मनुष्यासाठी नेहमीच एक रहस्यमय गोष्ट बनून राहिली आहे. आजही जगातील कित्येक नैसर्गिक आश्चर्ये उलगडण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हाला माहित असलेचं की जगात असंख्य जातीची-रंगाची फुल-फळ-झाडं आढळतात. पण आपल्याला फक्त आपल्याकडेच आढळणाऱ्या फुल-फळ आणि झाडांबद्दल माहिती आहे बाकी त्यांच्या इतर प्रकारांबद्दल मात्र आपल्याला तसूभरही कल्पना नाही. विशेषकरून विषारी जातींबद्दल तर आपण केवळ ऐकूनच असू! पण खरंच जर तुम्हाला फुल-फळ आणि झाडांबद्दल जास्त माहिती नसेल तर चुकूनही त्यांच्या वाटेला जाऊ नका, कारण एखादे फुल-फळ आणि झाडं विषारी निघाले तर त्यामुळे जीवाला देखील धोका पोहचू शकतो.

InMarathi Android App

पण समजा ही सगळ्या जातीची विषारी प्रकरण तुम्हाला एकाच गार्डनमध्ये बघायला मिळाली तर तुम्ही त्याला भेट द्याल का? जर तुमचे उत्तर हो असेल तर जगातील सर्वात विषारी गार्डनला आवर्जून भेट द्या!

worlds-most-dangerous-garden-marathipizza01

 

स्रोत

 इंग्लडच्या नॉथमबेरलँड राज्यात ऐलनविक शहरात ‘ऐलनविक पॉइजन गार्डन’ (Alnwick Poison Garden नामक हे विषारी गार्डन स्थित आहे.

worlds-most-dangerous-garden-marathipizza02

स्रोत

या गार्डनला जगातील सगळ्यात विषारी गार्डन यासाठी म्हणतात कारण येथे तब्बल १०० जातीची विषारी फुल-फळ आणि झाडं आहेत.

worlds-most-dangerous-garden-marathipizza03

स्रोत

१९९५ मध्ये या जागेचा ताबा जेन पर्सी या नॉथमबेरलँडच्या राणीच्या हातात आला होता. तेव्हा काहीतरी हटके करावं या हेतूने तिने इथे वेगळ्या प्रकारचं गार्डन उभारण्याचा निर्णय घेतला.

worlds-most-dangerous-garden-marathipizza04

स्रोत

सर्वप्रथम हे गार्डन तिने वैयक्तिक वापरासाठीच बनवले होते, परंतु गार्डनची वाढती प्रसिद्धी लक्षात घेऊन हे गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्याचा निर्णय तिने काही वर्षांपूर्वी घेतला होता. या गार्डनमधील प्रत्येक झाडं आणि रोपट काळ्या रंगाच्या गेटने बंदिस्त आहे. त्यामुळे या गेटच्या अलीकडूनच या विषारी जगाची सफर करावी लागते. मात्र कोणत्याही झाडाला हात लावण्यास आणि  खासकरून कोणत्याही फुलाचा सुगंध घेण्यास  मनाई आहे.

worlds-most-dangerous-garden-marathipizza05

स्रोत

हे गार्डन १४ एकर मध्ये पसरलेलं असून वर्षाला जवळपास ६००,००० पर्यटक या गार्डनला भेट देतात.

worlds-most-dangerous-garden-marathipizza06

स्रोत

संधी मिळाली तर ही भेट अजिबात चुकवू नका!!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *