“कामसूत्र थ्रीडी” अन “टेम्प्टेशन बिटविन लेग्ज” : राहुल गांधींवर चित्रपट बनवणाऱ्याचा रंगीत इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


सध्या जिकडेतिकडे बायोपिक बनवण्याचे पेव फुटले आहे. खेळाडूंच्या जीवनावर “भाग मिल्खा भाग”, “सचिन”,”एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी” ,”मेरी कोम” असे चित्रपट आल्यानंतर आता नेतेमंडळींवर चित्रपट येऊ लागले आहेत.

नुकताच येऊन गेलेल्या “द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर”, “ठाकरे”,ह्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित चित्रपट येणार आहे.

ह्यापूर्वी भगतसिंग ,राजगुरू सुखदेव ह्यांच्यावर चित्रपट येऊन गेले, नेताजी सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी ,लोकमान्य टिळक, वीर सावरकर इतकेच नव्हे तर झाशीची राणी लक्ष्मीबाई ह्यांच्या जीवनावर सुद्धा चित्रपट तयार झाले.

 

biopic-inmarathi
freepressjournal.in

लोकांना वास्तववादी चित्रपट आवडतात म्हणून भूतकाळात घडून गेलेल्या महत्वपूर्ण घटनांवर आधारित चित्रपट सुद्धा अधून मधून येत असतात.

“गाझी अटॅक “,”उरी-द सर्जिकल स्ट्राईक”, “पलटन” आणि अणुचाचणीवर आधारित “परमाणू” असेही चित्रपट येऊन गेले.

सध्या “वास्तववादी” चित्रपटांचा अन बायोपिकचा ट्रेंड आला आहे आणि आता तर चक्क राहुल गांधींवर सुद्धा चित्रपट येतोय.

नुकतेच ह्या बायोपिकचे टिझर प्रदर्शित झाले आणि लोकांनी ह्याला संमिश्र प्रतिसाद दिला. “माय नेम इस रागा” असे ह्या चित्रपटाचे नाव आहे. ह्या चित्रपटात राहुल गांधी ह्यांच्या खाजगी जीवनावर व राजकीय प्रवासावर प्रकाश टाकला जाणार असे.

 

 

हा चित्रपट रुपेश पॉल ह्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केला आहे. ह्या चित्रपटात राहुल गांधी ह्यांची भूमिका अश्विनी कुमार ह्या अभिनेत्याने साकारली आहे.


नरेंद्र मोदी ह्यांची भूमिका हेमंत कपाडिया ह्या अभिनेत्याने वठवली आहे तर मनमोहन सिंग ह्यांच्या भूमिकेत राजू खेर आहेत.

कुठलाही चित्रपट चांगला होण्यासाठी चित्रपटाचे कथानक, पटकथा, संवाद ,त्यातले अभिनेते चांगले असणे आवश्यक असतेच, पण सर्वात महत्वाचे असते चित्रपटाचे दिग्दर्शन! चित्रपटाच्या दिग्दर्शकावर चित्रपट चांगला अथवा वाईट तयार होणे अवलंबून असते.

चांगला दिग्दर्शक आपल्या कल्पनाशक्तीने सामान्य कथा सुद्धा उत्तम प्रकारे सादर करू शकतो आणि सुमार दर्जाचे दिग्दर्शन एखाद्या उत्तम कथानकाचे सुद्धा मातेरं करू शकतं हे सत्य आहे.

 

raga-inmarathi
Way2Barak.com

आता बोलूया : माय नेम इज रागा” ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाविषयी! हा चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला आहे ते रुपेश पॉल ह्यांनी ह्या आधी सेंट ड्रॅक्युला थ्रीडी, कामसूत्र थ्रीडी असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

आणि चार वर्षांची विश्रांती घेतल्यानंतर आता ते “माय नेम इज रागा” ह्या चित्रपटाद्वारे परत चित्रपटसृष्टीकडे वळले आहेत.

ज्या रसिक प्रेक्षकांनी त्यांचे हे आधीचे मास्टरपीसेस बघितले असतील त्यांना ह्या दिग्दर्शकांचे काम चांगलेच ठाऊक असेल.

त्यांनी ह्या दोन चित्रपटांसह “माय मदर्स लॅपटॉप” हा एक मल्याळम चित्रपट, तसेच “यु कान्ट स्टेप ट्वाईस इनटू द सेम रिव्हर”, म्रिगम”, व्हॉट द एफ”, “द टेम्प्टेशन बिटवीन माय लेग्स” आणि “डॅडी, यू बास्टर्ड” नावाचे काही चित्रपट दिग्दर्शित केले आहेत.

 

paul-inmarathi
Pinterest

अशी ही “दैदिप्यमान” कारकीर्द असलेल्या ह्या दिग्दर्शक साहेबांनी आता राहुल गांधी ह्यांच्यावर चित्रपट बनवून एकतर राहुल गांधी ह्यांचा कुठल्या तरी जन्माचा बदला घेतला आहे किंवा ते खरंच रागांचे डाय हार्ड फॅन दिसतात.

मूळचे केरळचे असलेले रुपेश पॉल हे एक कंप्यूटर इंजिनियर आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना कविता लिहिण्याचा छन्द होता.

त्यांच्या कवितासंग्रहासाठी त्यांना १९८८ साली पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांनी मल्याळी मनोरम आणि इंडिया टुडे मध्ये उपसंपादक आणि पत्रकार म्हणून काम केले आहे.

२००८ साली त्यांनी त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्म्स बनवल्या. त्यांच्या “द टेम्प्टेशन बिटवीन माय लेग्स” ह्या शॉर्ट फिल्मला सेन्सॉर बोर्डाने सर्टिफिकेट देण्याचे नाकारले.

 


rupeshpaul-inmarathi
rupeshpaul.com

पण “वन कॅननॉट स्टेप इनटू द सेम रिव्हर ट्वाईस” हा चित्रपट कान्स आणि फ्लोरेन्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर त्यांनी लॅपटॉप हा मल्याळी चित्रपट दिग्दर्शित केला.

त्यानंतर २०१२ साली त्यांनी रुपेश पॉल प्रोडक्शन्स नावाची स्वतःची फिल्म ट्रेलर प्रोडक्शन कंपनी काढली.

ह्याच कंपनीतुन त्यांनी “कामसूत्र थ्रीडी” ह्या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. आता पुढे विमान बेपत्ता होण्याची कथा ते “द व्हॅनिशिंग ऍक्ट” नावाच्या चित्रपटातून दाखवणार आहेत. हा चित्रपट अजून निर्माण व्हायचा आहे.

“माय नेम इज रागा” ह्या चित्रपटाबद्दल बोलताना रुपेश पॉल म्हणाले की “ह्या चित्रपटातून मला राहुल गांधी ह्यांना महान दाखवण्याचा उद्देश नाही किंवा त्यांच्यावर चिखलफेक करण्याचाही उद्देश नाही.

एखाद्या माणसावर सतत टीका होत असताना देखील तो कसा नव्या जोमाने त्यातून परत उठून उभा राहतो हे ह्या चित्रपटात दाखवले आहे. ज्याने आयुष्यात अपयश जवळून बघितले असेल त्याला ही चित्रपटाची कथा मनापासून आवडेल.

 

म्हणूनच ह्या चित्रपटाला मी बायोपिक म्हणू इच्छित नाही. ही अश्या माणसाची कथा आहे की संकटांनी युक्त असे आयुष्य असताना देखील तो माणूस त्यातून मार्ग काढून विजयाकडे जातो.”

ह्या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले आणि अनेकांनी त्यावर ही एक “पॅरोडी” आहे असे मत व्यक्त केले. आता दिग्दर्शक साहेबांचा चित्रपटाचा इतिहास बघितल्यास हा चित्रपट किती “खास” असेल ह्याचा अंदाज आपल्याला नक्कीच लावता येईल.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on ““कामसूत्र थ्रीडी” अन “टेम्प्टेशन बिटविन लेग्ज” : राहुल गांधींवर चित्रपट बनवणाऱ्याचा रंगीत इतिहास

 • February 12, 2019 at 12:06 am
  Permalink

  राहुल गांधी हे नावच मुळी विनोदाला पर्यायवाची झालयं. त्यामूळे मूव्ही किती विनोदी असेल याची ऊत्सूकता जरूर आहे.पण त्यासाठी पैसे खर्च करणं अशक्य आहे.भंगार व्यक्तीवर काढलेला सिनेमा पाहायला पैसे खर्च करणं म्हणजे वेळेचा अन पैशाचा अपव्यय आहे.

  Reply
 • February 12, 2019 at 10:15 am
  Permalink

  काँग्रेस

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?