ट्रम्प यांचा हा निर्णय भारतीय महिलांना महागात पडणार आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

अमेरिकेला जगभरामध्ये बलाढ्य राष्ट्र म्हणून ओळखलं जातं. जगातील इतर राष्ट्रांना टक्कर देण्याची धमक अमेरिकेत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिकेचं सर्वकाही सुरळीत चाललं होतं. पण त्यानंतर आलेले आणि सध्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही विधानांनी वाद निर्मण झालेले आहेत.

ट्रम्प हे त्यांच्या वादग्रस्त  विधानांमुळे  नेहमीच चर्चेत असल्याचे आपल्याला दिसून येतात. अशाच एका निर्णयामुळे डोनाल्ड ट्रम्प परत चर्चेत आलेले आहेत आणि त्यांचा हा निर्णय अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय स्त्रियांना अडचणीत आणू शकतो.

 

Donald trump new Decision.Inmarathi
opb.org

अमेरिकेने दुसऱ्या देशांमधील त्या लोकांना तिथे काम करण्याचा अधिकार दिलॆला होता, ज्यांचे पती किंवा पत्नी प्रायमरी व्हिसा वर अमेरिकेमध्ये काम करत आहेत. पण आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ओबामाच्या सरकारने  २०१५ मध्ये घेतलेल्या या निर्णयाला परत मागे घेऊ इच्छित आहेत. जर ट्रम्प यांनी असे केले, तर हजारो भारतीय आणि चीनी स्त्रिया आपल्या नोकऱ्या गमावतील.

हायली स्किल्ड वर्कर

बीबीसीच्या वृत्तनुसार, अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका नेहा महाजन नावाच्या भारतीय स्त्रीने सांगितलं की, त्यांचे पती आणि त्या जवळपास एक दशकाच्या आधी भारतातून अमेरिकेत आले होते. नेहा महाजन यांच्या मुलांसाठी अमेरिका हे त्यांचं एकच घर आहे. त्यांच्या पतीला येथे हायली स्किल्ड वर्कर म्हणजेच कुशल कारागीर म्हणून विझा मिळाला आहे. पत्नी या नात्यामुळे नेहा यांना दोन वर्षपूर्वीच या देशामध्ये काम करण्याचा अधिकार मिळाला होता.

पण आता ट्रम्प यांचे सरकार त्यांच्या या अधिकारालाच संपवू इच्छित आहेत.

 

Donald-trump-new-Decision.Inmarathi1
huffingtonpost.com

नेहाने पुढे सांगितले की,

“मला असे वाटते की मी आता परत एकदा एका सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये कैद होणार आहे. जसे की ते मला सांगू इच्छित आहेत की, माझे कौशल्य आणि गुणवत्तेची या जगामध्ये काहीच कदर नाही. मला एक गृहिणी बनूनच राहावे लागेल आणि समाजाचा एक सदस्य म्हणून माझे काहीच योगदान नाही.”

विरोध प्रदर्शन करण्यात आले

काही दिवसांपूर्वी नेहाबरोबर काही भारतीयांनी वॉशिंग्टनमध्ये विरोध प्रदर्शन केले होते. चीन आणि भारतीय स्त्रियांवर या प्रस्तावित निर्णयाचा सर्वात जास्त प्रभाव पडेल, कारण या दोन्ही देशांमधून येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या खूप जास्त आहे आणि येथे जास्तकरून पुरुषचं प्रायमरी विझा असलेले आहेत.

 

Donald trump new Decision.Inmarathi2
instain.in

न्यूयॉर्कपासून काही अंतरावर वसलेल्या न्यू जर्सी हा एक छोटासा भाग मिनी भारतासारखा आहे. या शहरामध्ये गेल्या कितीतरी दशकांपासून टेक्निकल दक्षता ठेवणारे भारतीय राहत आहेत आणि ते देखील एका अमेरिकेत काम करून भविष्य उज्वल करण्याचे स्वप्न घेऊन. या लोकांना नोकरीवर ठेवणाऱ्या कंपनींना देखील यापासून खूप फायदा झाला आहे, कारण भारतीय लोक येथील कामगारांपेक्षा कमी पगारावर काम करतात.

ओबामा यांनी दिली होती प्रायमरी विझा धारकांच्या पाटनर्सना परवानगी

जेव्हा ओबामा सरकारने प्रायमरी विझावर काम करणाऱ्या लोकांच्या पार्टनर्सना काम करण्याची परवानगी दिली होती, तेव्हा देखील कितीतरी गटांनी त्या निर्णयाला विरोध केला होता. त्यांच्या या निर्णयाला कोर्टामध्ये आव्हान देखील देण्यात आले होते.

 

Donald trump new Decision.Inmarathi3
zimbio.com

सेंटर ऑफ इमिग्रेशन स्टडीजची संचार निर्देशक माग्रेट टेलफोर्ड म्हणते की,

“ते अमेरिकी लोकांना रॊजगार देऊ इच्छित आहेत आणि त्यांचा पगार वाढवू इच्छित आहेत. जर तुम्ही दुसऱ्या देशांमधून कारागीर आणत जाल, तर यामुळे कंपनींला फायदा होईल. त्यांना कमी पैशांमध्ये कारागिरी मिळतील, पण अमेरिकेमध्ये राहणाऱ्या कारागिरांना याचं नुकसान सहन करावं लागेल.”

भारतासारख्या देशांमध्ये स्त्रियांना सामाजिक दबावामुळे कितीतरी वेळा आपली नोकरी सोडण्यासाठी त्यांच्यावर सक्ती केली जाते. पण अमेरिकेसारखा प्रगत देश देखील त्यांच्या काम करण्यावर बंधन घालेल, हे समजणे तेथील स्त्रियांसाठी थोडे कठीण आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या या भारतीय स्त्रिया चिंताग्रस्त असल्याचे दिसून येते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?