ह्या महिलांनी एकत्र येऊन शेतकरी आत्महत्यांवर तोडगा काढलाय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

‘शेतकरी आत्महत्या’ हा केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय बनलेला आहे. दरवर्षी कित्येक शेतकरी गरिबीपोटी आत्महत्या करतात. त्या शेतकऱ्यांच्या अत्म्हत्येने त्याचं संपूर्ण कुटुंब उघड्यावर येतं. सरकार बदलली, राजकारणी बदलले, कामाच्या पद्धतीही बदलल्या. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आज देशाने खूप प्रगती केली. तरी अनेक प्रयत्न करून देखील आपली सरकार या समस्येवर तोडगा काढू शकत नाही, शेतकरी आत्महत्या रोखू शकत नाही हे खरच दुर्दैव आहे. पण आपला अन्नदाता शेतकरी अश्याही परिस्थितीत आपल्या पोटापाण्याची सोय करतो, आज त्याच्याचमुळे आपल्या घरात अन्न शिजत.

 

no suicide zone-inmarathi03
newindianexpress.com

अन्नदाता म्हटंल तरी त्याला त्याचाही संसार आहे, त्याच्या आत्महत्या केल्याने त्याचे पोरं पोरके होतात. कदाचित याचाच धसका घेत शेतकरी महिलांनी त्यांचं गाव आत्महत्या मुक्त करण्याचं धोरणं हाती घेतलं आहे.

महाराष्ट्राच्या हिंगलाजवाडी येथील शेतकरी महिलांनी या गावाला ‘नो सुसाईड झोन’ बनविण्याचा निश्चय केला आहे. त्यांना हे गाव पूर्णपणे आत्महत्या मुक्त करायचे आहे. त्यांच्या या संक्लपामुळे आज हे गाव प्रगतीच्या मर्गावर आहे.

 

no suicide zone-inmarathi
indiatimes.com

चला तर मग जाणून घेऊ काय आहे या गावाची आणि या ‘नो सुसाईड झोन’ ची कहाणी…

हिंगलाजवाडी या गावाची लोकसंख्या ३ हजाराच्या घरात आहे. जर तुम्ही इथे कधी गेलात तर तुम्हाला इतर गावांपेक्षा अगदी विपरीत परिस्थिती इथे दिसेल. इथे दुपारच्यावेळी गावातील महिला शेतात राबताना दिसतील तर पुरुषमंडळी ही चक्क घरातील काम करताना दिसतील. त्यांनी स्वतः आपापसात आपापल्या भूमिका बदलून घेतल्या आहेत, ज्यामुळे ते परिस्थितीत काही सुधारणा करू शकतील. ‘सेल्फ हेल्प’ ग्रुपच्या या महिला आपल्याभूमिकेवर ठाम आहेत आणि गावात त्यांचा खूप दबदबा आहे.

 

no suicide zone-inmarathi01
nagpurtoday.in

या गावातील महिला बाजार आणि बाहेरील सर्व कामे सांभाळतात तर पुरुषांची भूमिका ही केवळ घरापुरतीच आहे. हा निश्चय केल्यावर या महिला रोज शेतीत काही ना काही प्रयोग करत असतात. येथील आर्थिक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी नवीन पद्धतीवर काम केल्या जात आहे.

शेतकरी महिला रेखा शिंदे म्हणतात की,

‘सर्वात मोठी समस्या ही कमी पर्जन्यमान आणि कोरड्या क्षेत्राची आहे. हवे तेवढ्या प्रमाणात पिक होत नसल्या कारणाने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले होते. याचा विचार करत आम्ही असा निश्चय केला की, आता पुढे अस नाही होऊ द्यायचं. आम्ही स्वतःच जबाबदारी घेऊन या परिस्थितीत परिवर्तन आणू.

 

no suicide zone-inmarathi02
oddnaari.in

यासोबतच या महिला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांची देखील मदत करत आहेत ज्यांनी कधी खराब आर्थिक परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती. ‘सेल्फ हेल्प ग्रुप’च्या मदतीने या महिला कुक्कुटपालन, दुध व्यवसाय, कपड्याची दुकानं यासोबतच अनेक व्यवसाय गावात चालवत आहेत.

प्रत्येक गोष्टीचं खापर सरकारवर फोडत बसण्यापेक्षा स्वतः परिस्थिती बदलण्यासाठी काहीतरी करायला हवं, असा संदेश या महिलांच्या मार्फत संपूर्ण देशात पसरत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?