' नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील? – एक दीर्घ analysis – InMarathi

नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील? – एक दीर्घ analysis

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

नरेंद्र मोदी 2019 ला पुन्हा एकदा PM बनू शकतील का – ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी नेमका हा प्रश्न कशामुळे पडतोय ते पाहूयात.

 

modi-bjp

 

प्रामुख्याने हा प्रश्न पडायला सुरुवात झाली ते बिहार election मधील BJP च्या पराभवामुळे.

जेव्हा Anti-BJP Front तयार केला गेला – ज्यामध्ये वैरी मित्र झाले — कारण ध्येय होते मोदींना हरवण्याचे, अस्तित्व आणि सत्ता टिकवण्याचे.
प्रश्न हा सुद्धा पडला कि – Modi चांगली कामे करत असतानासुद्धा बिहार च्या जनतेने त्यांना का निवडून दिलं नाही ?
उत्तर आहे ते अंकगणितात.

बिहार election मध्ये BJP ला पडलेली मते (vote share) हि 2014 च्या election मध्ये होती तेवढीच आहेत, फरक एवढाच कि 2015 च्या बिहार election मध्ये नितीश कुमार (JDU), लालू प्रसाद यादव (RJD) आणि राहुल गांधी (Congress) यांनी केलेली युती ज्याला नाव देण्यात आले “महागठबंधन”. अर्थातच 2014 च्या election मध्ये महागठबंधनचा combined vote share हा BJP च्या vote share पेक्षा जास्त होता. आता अंकगणिताच्या जगन्नाथ रथाला Modi वादळ कसा थांबू शकले असते तुम्हीच विचार करा. खुळाच विचार म्हणावा लागेल.

महागठबंधन. किती शक्यता आहे महागठबंधन हा BJP आणि त्यांचे Superman मोदी ह्यांचा Kryptonite बनण्याची ?

चला पाहूयात अंकगणिताच्या मदतीने.

कल्पना करा – 2019 च्या election मध्ये महागठबंधन कसं दिसेल.

कदाचित असं:
Congress + JDU + RJD + TMC + Communist Block + BSP + SP + JD(S) + DMK + INLD + J&K NC + J&K PDP + AIUDF + Muslim League + AIMIM + AAP + NCP.

थोडं विचित्र वाटेल, हसू सुधा येईल : – ममता बनेर्जी (TMC) आणि Communists सोबत…! किंवा फारूक अब्दुल्ला (J&K NC) आणि मेहबूबा मुफ्ती (J&K PDP) एकत्र…! पण जेव्हा प्रश्न अस्तित्वाचा आहे तेंव्हा we believe anything can happen…!

Assume करूयात शिवसेना, शिरोमणी अकाली दल (SAD) आणि तेलगु देसम पार्टी (TDP) ह्या 2019 मध्ये NDA चा घटक म्हणून लढतील जश्या 2014 लढल्या.

जयललिथा (AIDMK), नवीन पटनाईक (BJD) आणि K. C. Rao (TRS) हे स्वतंत्रपणे निवडणुकीत लढवतील.

थोडीशी अजून वाजवी assumptions करूयात :

१) 2019 पर्यंत भारताची आर्थिक आणि सामाजिक प्रगती बर्यापेक्की झालेली असेल.
२) महागाई election च्या 1-2 वर्षा आधी म्हणजे 2018 – 2019 मध्ये स्थिरावलेली असेल.
३) कुठलेही 2G, CWG, आदर्श , Coal-Scam सारखे घोटाळे Modi मंत्रिमंडळात झलेले नसतील.
४) आरक्षण धोरणामध्ये कुठलेही बदल झलेला नसेल.

Basically ज्या लोकांनी Modi आणि BJP ला 2014 ला मते दिली ते मतदार संतुष्ट असतील. म्हणजे BJP चा २०१४ चा vote share थोड्याबहुत फरकाने जश्यास तसा असेल.

खाली दिलेल्या Table कडे जर बारकाईने बघा. सगळे आकडे 2014 च्या election चे आहेत.

modi pm 01 marathipizza

परिस्थिती 1 : BJP / NDA – स्वबळावर

आपण table मध्ये पाहू शकतो किती मतदारसंघामध्ये BJP ला 50% पेक्ष्या जास्ते मते मिळाली. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ह्या अशा सर्व मतदारसंघामध्ये अंकगणित BJP च्या बाजूने काम करेल कारण BJP जर 50% पेक्ष्या जास्त मते मिळवत असेल तर महागठबंधनाने कितीही प्रयत्न केले तरी अश्या मतदारसंघामध्ये BJP ला हरवणे अशक्य आहे.

BJP अश्या एकून 136 मतदारसंघामध्ये आणि NDA एकूण १५२ मतदारसंघामध्ये जिंकेल.

modi pm 02 marathipizza

परिस्थिती 2 : BJP / NDA – अपक्षांच्या मदतीते

BJP/NDA ला ज्या मतदारसंघामध्ये ४५% पेक्ष्या जास्त पण ५०% पेक्ष्या कमी मते मिळाली तिथे जिंकणे अवघड ठरू शकेल – पण अशक्य मुळीच नाही. अश्या मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार २-४% मते मिळवून महागठबंधन ला ५०% vote share मिळू देणार नाहीत. अंकगणित अपक्षांच्या रुपात BJP/NDA च्या अप्रत्यक्षरित्या मदतीला येईल.

BJP अश्या एकून 190 मतदारसंघामध्ये आणि NDA एकूण 220 मतदारसंघामध्ये जिंकू शकेल.

modi pm 03 marathipizza

परिस्थिती 3 : BJP / NDA – 2019 च्या पहिल्यांदाच वोट करणार्यांचा सोबतीने

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा वोट करणाऱ्यांची संख्या होती जवळपास 12 करोड. BJP ला मिळालेल्या मतांचा आकडा पहिला तर हे सिद्ध होते कि १२ करोड मधील बहुतांश मतदारांनी Modi Magic ला वोट दिले. 2014 मध्ये BJP ला अख्या भारतामधून एकूण 17.1 करोड मते मिळाली (2009 मध्ये हाच आकडा फक्त 7.8 करोड इतका होता) तर Congress ला 2014 मध्ये 10.7 करोड मते मिळाली (2009 मध्ये जेन्ह्वा Congress जिंकली तेव्हा तिला 11.9 करोड मते मिळाली होती).

Assuming 2019 मध्ये पहिल्यांदा वोट करणारे सुद्धा परत Modi Magic ला मत देतील, अश्या मतदारसंघामध्ये जिथे BJP/NDA चा vote share 40-45% मध्ये आहे ते मतदारसंघ BJP/NDA पुन्हा जिंकू शकेल. तशा परिस्थितीत BJP एकून 238 मतदारसंघामध्ये आणि NDA 273 ह्या बहुमताच्या मंतरलेल्या आकड्या जवळ पोहोचू शकेल.

modi pm 04 marathipizza

परिस्थिती 4 : BJP / NDA – बहुमतापासून दूर

जयललिथा (AIDMK), नवीन पटनाईक (BJD) आणि K. C. Rao (TRS) ह्यांना महागठबंधन पासून दूर ठेवणे BJP/NDA ला फायद्याचे ठरेल जर BJP/NDA बहुमतापासून कमी पडली तर.

हुश्य…! Enough assumptions.

प्रत्यक्षात पहिलं तर महागठबंधन मध्ये PM चा उमेदवार बनण्यासाठीसाठी नक्कीच रुसवे, तंटे होतील – ज्याचा फायदा मोदी उचलतील. बरं हे तंटे avoid करायला महागठबंधनाने PM चा उमेदवार declare च केला नाही तर Modi ना तो ही benefit मिळेल.

महत्वाचे म्हणजे महागठबंधनाच्या नावाखाली जी Anti-Modi किंवा Anti-BJP युती तयार होईल त्यामुळे निर्णायक ध्रुवीकरण होऊ शकते, against BJP and for BJP.

अशा महागठबंधनाला Anti-National front म्हणायला BJP ला नक्कीच आवडेल 😉

कुठल्याही स्थितीत – २०१४ ला ज्यांनी मोदी/BJP ला मत दिलं होतं, त्यांच्यातील बहुतांश लोकांनी जर विश्वास कायम ठेवला – तर भाजपचे चांगले दिवस संपणार नाहीत, हे निश्चित.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Anup Kumbharikar

Author @ मराठी pizza

anup has 4 posts and counting.See all posts by anup

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?