Z या इंग्रजी अक्षराचा उच्चार ‘झी’ असा का केला जातो?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मराठी शाळेमध्ये जशी अ, आ, इ शिकवतात तसे इंग्रजी माध्यमात सुरुवात ABCD पासून होते. पुढे मराठी माध्यमातून शिकलेली मुले देखील इंग्रजी शाळांचा आधार न घेता मस्तपैकी इंग्रजी बोलायला शिकतात, पण आपल्या मराठी माध्यमातून शिकलेल्यांमध्ये आणि इंग्रजी माध्यमातून शिकलेल्यांच्या बोलण्यामध्ये एक फरक मात्र प्रकर्षाने जाणवतो, तो म्हणजे Z या अक्षराचा वेगवेगळा उच्चार!

इंग्रजी माध्यमातून शिकलेले Z चा उच्चार ‘झी’ असा करतात, तर उर्वरित सगळे आपण त्याच Z चा उच्चार ‘झेड’ असा करतो.

आता इथे प्रश्न उद्भवतो चूक कोण? आणि बरोबर कोण? कारण आपले मराठी शाळेतील शिक्षक  ‘झेड’  म्हणायला शिकवतात आणि इंग्रजी माध्यमाचे शिक्षक ‘झी’ म्हणायला शिकवतात. म्हणजे यात चूक कोण्या एका शिक्षकांची आहे का? चला जाणून घेऊया काय आहे हे बुचकळ्यात टाकणारं प्रकरण!

z-marathipizza01
i.ytimg.com

खरतरं ब्रिटीश इंग्रजी आणि कॉमनवेल्थ इंग्रजी (जसे ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण अफ्रिका इत्यादी देश) मध्ये Z चा उच्चार झेड होतो. फक्त ब्रिटिशच नाहीत, तर जगातील बहुतेक देशातील लोकांमध्ये Z चा उच्चार झेडच आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे इंग्रजी अल्फाबेट Z ची उत्पत्ती ग्रीक शब्द  ‘Zeta’ मधून झाली आहे असे मानले जाते. त्यापासून प्राचीन फ्रेंच ‘zede’ चा उदय झाला आणि त्याच्या परिणामाच्या स्वरुपात १५ व्या शतकाच्या जवळपास इंग्रजी मधील शेवटचा झेड हा शब्द समोर आला.

असे सांगितले जाते की, अल्फाबेट Z आणि Y हे असे दोन इंग्रजी शब्द आहेत, ज्यांचा समावेश थेट ग्रीक भाषेतून लॅटीनमध्ये करण्यात आला आहे. मात्र Z चा ‘झी’ रुपात उच्चार अमेरिकन इंग्रजी आणि न्यू फाऊंडलँडच्या इंग्रजी मध्ये केला जातो. तर दुसरीकडे स्कॉटिश इंग्रजी मध्ये Z चा उच्चार ‘Izzard’ असा केला जातो.

z-marathipizza02
i.ytimg.com

अमेरिकेत जवळपास सगळीकडेच मुद्दाम Z चा उच्चार हा झी म्हणून केला जातो. तेथील शाळेतील मुलांना Z चा उच्चार ‘झी’ असाच शिकवला जातो. अमेरिकन इंग्रजी शो आणि चित्रपट, यूएस शिफ्टमध्ये काम करणारे कॉलसेंटरचे कर्मचारी आणि अमेरिकेशी संबंधित काम करणारे लोक  देखील ‘झी’ चा उच्चार करतात.

पण काही देशांमध्ये लोक ‘झी’ चा अर्थ Z  या इंग्रजीच्या अक्षराचा उच्चार म्हणून नाही तर एखाद्या वस्तूच्या उच्चारासाठी करतात. म्हणजेच हे दोन्ही उच्चार आपआपल्या जागेवर अगदी बरोबर आहेत, फक्त भाषेनुसार यांमध्ये बदल होतो.

इंग्रजी भाषेच्या तज्ज्ञांमध्ये ‘झी’ कि ‘झेड’ यावर अजूनही एकमत झालेले नाही. आपल्या भारतात Z चा उच्चार ‘झेड’ असा बरोबर आहे, पण बहुधा इंग्रजी भाषेतील शाळांमध्ये अमेरिकन जीवनशैलीचा वाढता प्रभाव लक्षात घेता तेथील शिक्षक हे मुलांना Z चा उच्चार ‘झी’ असा करण्यास सांगत असावेत.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?