रोज अंघोळ करण्याची सवय ठरू शकते धोकादायक

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===


हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. तसा तर हिवाळा हा ऋतू सर्वांच्याच आवडीचा असतो, पण या थंडीच्या दिवसांत एक गोष्ट देखील जी कोणालाच आवडत नाही. अंघोळ करणे…! थंडीच्या दिवसांत आपल्याला त्या मऊ गोदडीत बाहेर निघायची देखील इच्छा नसते. तिथे मग कोण एवढ्या थंडीत अंघोळ करणार… बरोबर ना. आपण सर्वेच हा विचार करतो. पण तरी आपण रोज अंघोळ करतो.

 

ranbeer kapoor inmarathi

 

तसेही आपल्याला रोज अंघोळ करायची सवय झालेली असते. लहानपणी पासूनच आपल्याला रोज अंघोळ करण्याची सवय आपल्या घरच्यांकडून लावली जाते आणि आजही जर आपण एक दिवस अंघोळ नाही केली तर आपण आळशी लोकांमध्ये गणण्यात येतो.

पण आज आम्ही तुमच्यासाठी एक अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्यामुळे यानंतर तुमच्याकडे अंघोळ नं करण्याचं एक फुल प्रुफ निमित्त मिळेल…

 

thegujjugyan.com

 

जगभरातील डॉक्टरांच्या मते रोज अंघोळ केल्याने आपल्या त्वचेवर खूप गंभीर परिणाम होतात. त्यांच्यामते आपण “आवश्यकतेपेक्षा जास्त” अंघोळ करतो. तसेच हिवाळ्यात रोज अंघोळ करणे आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असू शकते…

दि टाईम्स ऑफ इंडिया च्या एका रिपोर्ट नुसार त्वचा वैज्ञानिक डॉ. रनेला हिर्श या सांगतात की, आजकाल, लोक रोज शरीर घाण होतं आणि ती घाण काढून टाकणायसाठी म्हणून नाही, तर सामाजिक नियमांमुळे अंघोळ करतात. परंतु रिसर्चनुसार आपल्या त्वचेला स्वच्छ करण्यासाठी आपल्या शरीरात अश्या अनेक यंत्रणा आहेत ज्या स्वतः शरीराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात.

या साठी तुम्हाला नेहेमी नेहेमी अंघोळ करण्याच गरज नाही…!

 

 

जर थंडीच्या दिवसात तुम्ही केवळ यासाठी गरम पाण्याने अंघोळ करत असाल की, यामुळे तुमच्या शरीराला गर्मी आणि आराम मिळेल, तर जाणून घ्या – यामुळे तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते. गरम पाणी आपल्या त्वचेवरील नैसर्गिक तेलाला नष्ट करतो त्यामुळे आपली त्वचा ड्राय होऊन जाते. रोज गरम पाण्याने अंघोळ केल्याने आपली नखे देखील खराब होऊ शकतात.


खरं वाटणार  नाही – आपली नखे पाणी शोषतात. गरम पाण्याने ते त्यांच्यातील नैसर्गिक ओलावा आणि तेल नष्ट होतो, त्यामुळे ते ड्राय आणि निर्जीव होऊन जातात.

 

 

शिवाय हिवाळ्याच्या मोसमात जर तुम्ही रोज अंघोळ करत असाल आणि त्यानंतर लगेच गारठा लागला वा केस ओले रहाणे किंवा शरीर व्यवस्थित पुसल्या नं जाणे अश्या गोष्टी होत राहिल्या तर तुमच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होऊ शकतात.


पण रोज अंघोळ करायचीच असेल – अगदी हिवाळ्यातसुद्धा तर किमान पुढील खबरदारी बाळगा –

१) कितीही बरं वाटलं तरी अगदी कढत, गरम पाण्याने अंघोळ करू नका. कोमट, आवश्यक तेवढंच गरम पाणी वापरा.

२) शाम्पू-साबण आवश्यक तेवढीच आणि तेव्हाच वापर करा.

३) डोक्यावरून अंघोळ टाळा – केस ओले करू नका. ड्राय शॅम्पूचा पर्याय वापरून पहा.

४) अंघोळीनंतर लगेच थंडीत बाहेर पडू नका. अंग व्यवस्थित पुसून, शरीर काहीवेळ उबदार ठेवून मगच घराबाहेर पडा.

असो – हे वाचून अंघोळीसाठी कंटाळा करणाऱ्या प्रत्येकाला नक्कीच आनंद झाला असेल. म्हणजे आता यानंतर अंघोळ न करण्याची कुठलीही वायफळ करणे देण्यापेक्षा आता तुमच्याकडे एक वैज्ञानिक कारण आहे ना…!

तर रोज अंघोळ करणे टाळा आणि निरोगी राहा… 😉


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.
One thought on “रोज अंघोळ करण्याची सवय ठरू शकते धोकादायक

  • May 11, 2019 at 6:35 am
    Permalink

    thankx bhau i got a reason to show my parents.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?