ऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात?! अज्ञात रंजक इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

ऑलिम्पिक, क्रिकेट विश्व चषक, फिफा वर्ल्ड कप हे आणि अशा इतर काही सामन्यांचा प्रेक्षकवर्ग जगभर मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. त्या-त्या खेळाचे चाहते अतिशय आतुरतेने ह्या सामन्यांची प्रतीक्षा करत असतात. पण त्यासाठी त्यांना ४ वर्ष वाट बघावी लागते.

ऑलिम्पिक असो वा फिफा वर्ल्ड कप, जगातील जवळपास सर्वच विश्वचषक सामने हे ४-४ वर्षांनंतर आयोजित केले जातात.

पण हे सामने ४ वर्षांनीच का आयोजित केले जात असतील, म्हणजे ते २-२ वर्षांनी किंवा दरवर्षी आयोजित का केले जात नाहीत? हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. आज तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर आम्ही शोधून काढलं आहे.

 

fifa-inmarathi01
dnaindia.com

त्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून बघावे लागेल. इ.स. ७७६ पूर्व काळात फावल्या वेळेत सैनिकांमध्ये खेळाचे सामने लढवले जायचे. हे सामने त्यांच्या प्रशिक्षणाचा एक भाग असायचे. काही काळाने हे सामने नियमितपणे आयोजित केले जाऊ लागले.

 

olympics-inmarathi01
manchesterhistorian.com

हळूहळू सैनिकांचे हे खेळाचे सामने लोकप्रिय होऊ लागले आणि त्यात सामान्य खेळाडूंना देखील सहभागी करून घेतले जाऊ लागले. यानंतर सैनिकांजवळील मर्यादित वेळ आणि त्यांची तयारी बघता हे सामने ४ वर्षांच्या कालावधी नंतर आयोजित केले जाऊ लागले. ह्या ४ वर्षांच्या कालावधीला ‘ऑलंपियाड’ असे म्हटले जाऊ लागले.

हा शब्द ‘ऑलंपिया’ ह्या पर्वताच्या नावावरून आला. येथेच ह्या खेळांच्या सामन्यांचे आयोजन करण्यात येत होते.

 

fifa-inmarathi
comicbook.com

१८९६ साली जेव्हा ग्रीस म्हणजेच तेव्हाचे एथेंस येथे ऑलिम्पिक खेळांची सुरवात करण्यात आली. तेव्हा देखील ४ वर्षांच्या कालावधीनंतर ह्या खेळांचे आयोजन करण्याची प्रथा निभावली गेली. इतर खेळांच्या सामन्यांच्या आयोजनात देखील ह्याचं परंपरेच अनुकरण करण्यात आले.

 

wc-inmarathi
navyugsandesh.com

फुटबॉलमध्ये फिफा आणि क्रिकेटमध्ये आयसीसी ह्या आपल्या खेळाडूंवर खूप लक्ष देते त्यांची फिटनेस आणि खेळ ह्यासाठी त्यांना पुरेपूर वेळ मिळावा ह्याचीही काळजी घेते.

त्यांच्याकरिता वर्षभर अनेक सामन्यांचे आयोजन देखील केल्या जाते. पण वर्ल्ड कप सारख्या महत्वाच्या आणि  मोठ्या सामन्याच्या आयोजनांसाठी ४ वर्षांचा वेळ घेतला जातो.

 

olympics-inmarathi
outsports.com

ऑलिम्पिकची सुरवात ६ एप्रिल १८९६ साली ग्रीस येथे झाली. ज्यामध्ये १४ देशांतील २०० एथलिट्सनी ४३ सामन्यांत सहभाग घेतला होता. तेव्हापासून ऑलिम्पिकचे सामने हे दर ४ वर्षांनी आयोजित केले जातात. तर फिफा वर्ल्ड कप आणि क्रिकेट वर्ल्ड कप देखील ४ वर्षांनीच आयोजित केल जातो.

तसेच कुठल्या आपत्कालीन स्थितीत हे आयोजन थांबविले देखील जाऊ शकतात. जसे दुसऱ्या विश्वयुद्धा दरम्यान झाले होते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “ऑलिम्पिक स्पर्धा, क्रिकेट/फुटबॉल इ वर्ल्डकप ४ वर्षांनीच का होतात?! अज्ञात रंजक इतिहास!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?