जोडीदार ‘हॅंडसम’ नाही अशा स्त्रिया अधिक सुखी असतात – असं का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुमचा जोडीदार निवडायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, आणि तो कसा असला पाहिजे आणि कसा नाही याचे निकष सुद्धा ज्याने त्याने आपआपले ठरवायचे असतात!

प्रत्येकाच्या त्याच्या जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात, काहींना त्यांचा जोडीदार हा उच्च शिक्षित पाहिजे असतो, तर काहींना तो गर्भश्रीमंत हवा असतो, काहींना फक्त त्याचा स्वभाव आणि बोलणं चालणं इतकंच महत्वाचं वाटतं!

त्यामुळे या निकषात बसवून घेणारा जोडीदार निवडणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो!

 

indian couple inmarathi

 

आणि स्त्रिया तर त्यांच्या जोडीदाराच्या बाबतीत फारच चोखंदळ असतात, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे!

आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये स्वतःचा जोडीदार हा नेहमीच उजवा दिसला पाहिजे यासाठी कित्येक स्त्रिया खटाटोप करत असतात! आणि जर एखादीचा जोडीदार हॅण्डसम असेल तर मग काही विचारूच नका!

आजकालच्या प्रत्येक मुलींचे त्यांना चांगला आणि आकर्षक दिसणारा जोडीदार मिळावा, असे स्वप्न असते. आपल्या जोडीदाराविषयी त्यांनी एक चित्र आपल्या मनामध्ये तयार केले असते. मुलींच्या विचारसारणीत आलेला हा बदल काहीसा चित्रपटांमधून आलेला आहे.

 

srk & kajol inmarathi

 

चित्रपटांमध्ये दाखवलेले हिरो जसे चार्मिंग, हॅन्डसम, सिक्स पॅक बॉडी आणि स्टायलिश असतात. त्याप्रमाणे आपला जोडीदार देखील असावा असे त्यांचे स्वप्न असते.

प्रत्यक्षात ते सगळं सत्यात उतरतच असं नाही, कारण कितीही म्हंटलं तरी सिनेमा आणि वास्तव यामध्ये प्रचंड फरक असतो!

 

shikaara inmarathi

 

DDLJ मधल्या काजोल सारख्या बऱ्याच मुलींना वाटत असतं, असाच त्यांच्या स्वप्नातला एखादा देखणा राजकुमार त्यांच्या आयुष्यात येईल पण तो सिनेमा आहे, आणि सत्यात हे असे घडेलच याची काहीच खात्री नाही!

यामध्ये सध्या मुलं देखील मागे नाहीत, मुलांना सुद्धा मुलींना इम्प्रेस करायच्या नवीन नवीन युक्त्या शोधून काढत असतात!

त्यामुळे आजकालचे तरुण देखील मुलींचे मन जिंकण्यासाठी स्टायलिश राहण्याचा प्रयत्न करतात!

पण तुम्हाला माहित आहे का – एका संशोधनातून हे लक्षात आले आहे की, ज्या मुलींचे जोडीदार कमी आकर्षक असतात, त्या मुली आकर्षक जोडीदार असलेल्या मुलींपेक्षा जास्त आनंदी असतात…!

 

boney kapoor sridevi inmarathi

 

फ्लोरिडा स्टेट विद्यापीठाने एक स्टडी केली, या स्टडीमध्ये असा निष्कर्ष आला की, स्त्रिया त्यांच्यापेक्षा कमी आकर्षक असलेल्या पुरुषांबरोबर जास्त आनंदी असतात.

या स्टडीसाठी फ्लोरिडा स्टेट विद्यापीठ आणि साउथर्न मेथोडिस्ट विद्यापीठाने एकत्र येऊन रेटिंग देण्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांनी एका प्रश्नावलीमध्ये त्यांना फिट आणि आकर्षक दिसण्याबद्दल त्यांचे म्हणणे काय आहे ? हे स्पष्ट करायचे होते.

 

rab ne bana di jodi inmarathi

 

या स्टडीमध्ये ११३ नवविवाहित जोडप्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व जोडप्यांच्या लग्नाला ४ महिन्यांपेक्षा कमी वेळ झालेला होता.

या स्टडीमधून असे दिसून आले की, शारीरिकदृष्ट्या आकर्षक पती असलेल्या स्त्रियांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. विशेषतः जर त्यांच्या बायका आकर्षक नसतील, तर हे होण्याची संभावना जास्त आहे.

 

bhumi pednkear inmarathi

 

त्यामुळे अशा स्त्रियांमध्ये नैराश्य, चिंता यांसारख्या समस्या उद्भवतात. आपल्या जोडीदाराला साजेसे आपण दिसावे, यासाठी त्या जिमला जाऊन किंवा इतर काही उपाय करून वजन कमी करण्याचा आणि फिट राहण्याचा राहण्याचा प्रयत्न करतात.

पण असे न झाल्यास त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते, यामुळे ते आपल्या जोडीदारापासून दूर जाण्याची शक्यता देखील वाढते.

 

huma qureshi inmarathi

 

याउलट ज्या स्त्रियांचे पती हे त्यांच्यापेक्षा कमी आकर्षक असतात, त्या स्त्रियांना अशा कोणत्याही समस्येमधून जाण्याची गरज भासत नाही. कारण त्यांच्या जोडीदाराला त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा नसतात.

अशा स्त्रियांचे जोडीदार हे वचनबद्ध आणि आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक असतात. असे असल्याने, स्त्रियांना त्यांच्याबरोबर राहण्यात आनंद मिळतो.

या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या आधारावरून हे समजते की, आकर्षक पुरुषांपेक्षा आपल्यापेक्षा कमी आकर्षक पुरुषांबरोबर स्त्रिया जास्त आनंदी आणि सुखी राहतात. पण त्यासाठी देखील एकमेकांविषयी आदर आणि समजूतदारपणा असणे गरजेचे आहे.

स्त्रोत : wroops

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?