भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

सामान्य माणूस असो की तो श्रीमंत माणूस असो प्रत्येकाचं एक लहानपणापासून स्वप्न असतं की खूप कमवायचं आणि मस्त अशी कार घ्यायची. लहानपणापासून भरपूर चारचाकी गाड्यासोबत खेळलेलो असतो.

InMarathi Android App

काहींना मारूती ,नँनो सारखी छोटी गाडी आवडत असते तर काहींना बी.एम.ड्ब्यू ,फरारी अशा कार्स आवडत असतात.

काहींना तर ट्रक, टमटम,मोठेमोठे कन्टेंनर आवडतात. असं सगळ्यांनाच गाड्यांच्या दुनियेत जगायला आवडतं.

सध्या तर तरूणाईमध्ये चारचाकी गाड्यांची भलतीच क्रेझ आली आहे. मुलींमध्ये देखील ही क्रेझ निर्माण होऊ लागली आहे. चारचाकी गाडी म्हटली की काहींच ते स्वप्न असतं तर काहींच उपजीविकेचे वाहन असतं तर काहीचं फिरण्यासाठीचं स्पेशल वाहन असतं.

एकूणच काय तर कार्स हा सर्वांच्या जीवनातील एक अविभाज्य भागच बनला आहे असे म्हणता येईल .

 

drive-inmarathi
mylescar.com

आता नवीन कार खरेदी करायला गेल्यावर कोणत्या रंगाच्या कारची चलती आहे हे आपण आधी पाहतो. एवढे कारचे रंग आहेत की नेमकी कोणती बेस्ट आहे हेच आपल्याला कळत नाही.

त्यामुळे त्यातल्यात्यात सध्या इन असणाऱ्या कारचा रंग आपण निवडतो.

हे तुम्हाला माहीती आहे का की, आपल्या भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री केली जाते? हे वाचून आश्चर्य वाटले असेल आणि प्रश्न पण निर्माण झाले असतील ना?

पण हे खरं आहे की आपल्या भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री केली जाते.

 

cars-inmarathi
Carwow.com

पण पांढऱ्याचं रंगाच्या कार्स का जास्त घेत असतील ते आपण पाहूयात…

जे.डी.पाँवरच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येत २ कारमागे एका कारचा रंग पांढरा आहे. भारतीय लोक भडक रंगाऐवजी हलक्या रंगाला पसंती देत असल्याचे या सर्व्हेत म्हटले आहे.

देशातील एक चतृतांश विक्री झालेल्या कार या सिल्वर किंवा ग्रे रंगाच्या होत्या. तर उत्तर भारतातील लोक दक्षिण भारतापेक्षा जास्त पांढऱ्या रंगाला पसंती देत आहेत.

दक्षिण भारतातील लोक ३४% पांढऱ्या कार वापरतात तर उत्तर भारतातील लोक ६६% कार वापरतात.

२०१३च्या कारच्या विक्रीमध्ये ११% रंगाच्या कारची विक्री झाली आहे तर ४% काळ्या रंगाच्या कारची विक्री झाली आहे. मध्यंतरी तरूणाईमध्ये अशा भडक रंगाच्या कारची जास्त क्रेझ दिसून येत होती पण आता हलक्या रंगाला भारतीय लोकांची जास्त पसंती मिळाली आहे.

 

Used-Cars-inmarathi
moneymax.ph

एवढेच नाहीतर पेंट क्षेत्रातील दिग्गज कंपनी BASF च्या अहवालानुसार, २०१८ मध्ये ४३ टक्के भारतीयांनी पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली. भारतीयांची सर्वाधिक पसंती पांढऱ्या रंगाच्या छोट्या कारला असते असं याही अहवालातून दिसतयं.

भारतातील उष्णता हे यामागील कारण असू शकतं. पांढरा रंग लवकर गरम होत नाही त्यामुळे भारतीयांचा कल पांढऱ्या रंगाकडे असू शकतो’ असं बीएएसएफचे अधिकारी चिहारु मतसुहारा यांनी सांगितलं होतं.

या अहवालानुसार इतर रंगाची पसंती देखील जाणून घेऊयात. भारतीयांची दुसऱ्या क्रमांकाची पसंती ग्रे रंगाला आहे. तर तिसरा क्रमांकावर सिल्व्हर कलर आहे.

याशिवाय लाल रंगाच्या कार ९ टक्के जणांना, निळ्या रंगाच्या कार ७ टक्के तर काळ्या रंगाच्या कारला केवळ तीन टक्के लाोकांना आवडतात.

 

red-car-inmarathi
india.com

भारतातील लोक पांढऱ्या रंगावरच का फिदा झाले असतील बरं…यामागची कारणे पाहूयात…

१) आपल्या भारतातील वातावरणात उष्णता आणि गरमीचे प्रमाण अधिक आहे.तसं पाहिलं तर बाराही महिन्यात एकच समस्या आपल्याला भेडसावते ती म्हणजे उष्णता.

भडक रंगाची कार घेतली तर ती लवकर तापू शकते.त्यामुळे पांढरा रंग लोकांनी अधिक पसंत केला असावा.

२) पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक आहे.

नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग आहे.नवीन गाडी केल्यावर एक सुख अनुभवता याव म्हणून देखील पांढरा रंग निवडतात.

३) गाडी धुतल्यावर स्वच्छ चकाचक अशी एकाच रंगाची गाडी पाहायला मिळते .ती म्हणजे पांढऱ्या. स्वच्छतेचे प्रतिक असल्याने पसंतीस पडत असावी.

 

car-trip-inmarathi05
blog.via.com

४) सध्या पारंपरिक पध्दती असो की कोणतेही गोष्ट असो नव्याने तरूणाईमध्ये पारंपरिक गोष्टीची क्रेझ पाहायला मिळत आहे.पूर्वी सर्व चारचाकी गाड्या या शुभ्र पांढऱ्या रंगात असायच्या त्यामुळे ते देखील लोक ट्रेड म्हणून फाँलो करत असावी.

५) पांढरा रंगाची गाडी ही इतर रंगाच्या गाड्यांपेक्षा अधिक उठून दिसते.

६)उन्हाळ्यात काळ्या रंगाची कार गरम होते व लवकर खराब होते, असाही भारतीय लोकांचा समज आहे. पांढरा रंग पाहण्यासाठी चांगला आहे. तसेच तो शुभ मानला जातो.

यामुळेच भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री झाली असावी. सध्या दिवसेंदिवस चारचाकी वाहने मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहेत.

प्रत्येकाच्या घरात एक तरी चारचाकी गाडी असते नाहीतर स्वप्न तरी पक्क असतं. त्यामुळे यंदाच्या वर्षे पण २०१९ मध्ये पांढऱ्या रंगाच्या गाड्यासोबत इतर रंगाची गाडी घ्यायला हरकत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतात पांढऱ्या रंगाच्या कार्सचीच सर्वात जास्त विक्री का होते? जाणून घ्या..

  • January 27, 2019 at 2:45 pm
    Permalink

    अजुन एक महत्वाचे कारण म्हणजे पहाटे तसेच सायंकाळच्या संधी प्रकाशात जेव्हा गाडीच्या हेड लाईटचा प्रकाश रस्त्यावर कमी परिणामकारक असतो तेव्हा पांढऱ्या रंगाची गाडी लांबूनही लक्षात येते. त्या मूळे आपल्या सेफ्टीचा विचार करता समोरून येणाऱ्या वाहनास आपल्या अस्तित्वाची लांबूनच जाणीव करून देणारा पांढरा रंगच सुरक्षित होय!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *