काम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं? समजून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

टीव्ही बघत असलो आणि चॅनेल बदलायच्या वेळी अचानक टीव्हीचा हा रिमोट काम करणेच बंद करतो.

मग आपण सर्व बटना दाबून बघतो तेरी देखील तो काम करत नाही, त्यानंतर त्रस्त होऊन आपण त्याला दोन तीनदा आपटतो आणि मग तो रिमोट काम करू लागतो.

हे आपल्या प्रत्येकाच्या घरात रोजच होत असतं.

पण दोन-तीनदा रिमोट आपटल्यावरच का तो काम करू लागतो ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

आज आपण ह्याचेच उत्तर जाणून घेणार आहोत.

 

TV-Remote-inmarathi01
scienceabc.com

रिमोटमध्ये लावण्यात येणाऱ्या बॅटऱ्या ह्या खूप वेळासाठी रिमोटमधेच असतात. कधीकधी वर्षभर देखील ह्या बॅटीरिज त्या रिमोटमध्ये असतात, ते आपण रिमोट किती वापरतो ह्यावर अवलंबून असते.

खूप काळ ह्या बॅटरी रिमोटमध्ये राहिल्याने त्यांच्या टर्मिनल्स आणि बॅटरी मध्ये एक ऑक्सिडेशन लेयर तयार होते.

ऑक्साईड लेयर मुळे हाय रेझिस्टीविटी तयार होते जी करंट वाहून नेण्यास अडथळा निर्माण होतो.

ज्यामुळे व्होल्टेज कमी होतो आणि रिमोट व्यवस्थितपणे काम करत नाही.

ऑक्साईड लेयरमुळे करंट वाहून नेण्यात अडथळा येत असल्याने हा आपला रिमोट कधी कधी काम करत नाही. तसेच टीव्हीचा रिमोट हा खूप कमी उर्जा वापरतो.

म्हणजे जेव्हा आपण रिमोटची बटण दाबतो तेव्हा एक लाल लाईट लागतो. तेवढीच उर्जा रिमोट वापरतो.

 

TV-Remote-inmarathi
scienceabc.com

एवढ्या कमी उर्जेच्या दाबाचा ऑक्साईड लेयरवर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे कधी कधी आपला रिमोट हा व्यवस्थितपणे काम करत नाही.

टीव्ही रिमोटमध्ये खूप कमी करंटचा वापर होतो त्यामुळे ऑक्साईड लेयरच्या रेझिस्टन्सवर ह्याचा काहीही परिणाम होत नाही.

तेच कॅमेरामध्ये ज्या बॅटीरिज लागतात त्यातील करंट हा जास्त असतो त्यामुळे कॅमेऱ्यात ऑक्साईड लेयर जास्त काळ टिकू शकत नाही.

रिमोट आपटल्याने रिमोटच्या आतील पार्ट्स हलतात. अश्याप्रकारे रिमोट आपटन्याला एक नाव देखील आहे- Percussive Maintenance.

Percussive Maintenance म्हणजे काय?

तर ह्याचा साधा सरळ अर्थ असा की Percussive Maintenance ह्या शब्दाचा वापर ‘एखाद्या मशीनला खूप वेळा आपटून त्याने त्या मशीनमध्ये काही सुधार येतो का हे बघण्यासाठी केलेली क्रिया’ ह्यासाठी होतो.

Percussive Maintenance ह्याचा वापर फक्त रिमोटच नाही तर टोस्टर, कार बॅटीरिज आणि एवढचं नाही तर टीव्हीह्यासारख्या मशीन्ससाठी देखील केला जातो.

 

TV-Remote-inmarathi02
google.com

अचानकपणे रिमोट आपटल्याने तुम्ही बॅटीरिज आणि टर्मिनल्समधील जो तुटलेला संपर्क आहे तो पुन्हा जोडला जातो त्यामुळे आपटल्यानंतर रिमोट पुन्हा काम करू लागतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “काम न करणारा टीव्ही रिमोट दोनतीनदा आपटला की काम करू लागतो. असं का होतं? समजून घ्या

  • September 9, 2018 at 10:43 pm
    Permalink

    ठीक

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?