दारू पिल्याने स्वतःवर नियंत्रण का राहत नाही ? जाणून घ्या शास्त्रीय कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मद्यपान हे शरीरासाठी हानिकारक. पण तरी लोक मद्यपान करतात. मद्यपान करून डोक्यातील सर्व टेन्शन दूर होतात असं त्यांना वाटतं. अनेकदा मद्यपान केल्यानंतर लोक जास्त अग्रेसिव्ह होतात. त्यांचे त्यांच्या भावनांवर नियंत्रण राहत नाही.

त्यांच्या भावना अनावर होतात, ते काय करत आहेत काय बोलत आहे हे त्यांचं त्यांनाच कळतं नाही. पण दारूत असं काय असतं ज्यामुळे हे सर्व होतं, ज्यामुळे माणसं स्वतःवरील नियंत्रण गमावून बसतात? का होत असेलं असं?

 

alcohol-InMarathi01
huffingtonpost.com

ह्याचचं उत्तर जाणून घेण्यासाठी University Of New South Wales, Australia येथील वैज्ञानिकांनी एक रिसर्च केली. ह्या रिसर्चमध्ये असे दिसून आले की, २ पेग वोडका घेतल्यानंतर व्यक्तीच्या डोक्यात काही बदल होतात. ते व्यक्तीच्या रागाशी निगडीत आहेत. दारू घेतल्यानंतर लोकांची वागणूक का बदलते आणि ते अधिक हिंसक का होऊन जातात हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी MRI स्कॅन चा उपयोग केला.

 

 alcohol-InMarathi03
dailymail.co.uk

ह्या रिसर्चमध्ये भाग घेतलेल्या लोकांना दोन गटांत विभागले गेले. ह्यापैकी एका गटाला वोडकाचे दोन-दोन पेग देण्यात आले आणि दुसऱ्या गटाला नॉर्मल ड्रिंक्स देण्यात आल्या. ह्या रिसर्चचे विद्यापीठाचे प्रोफेसर थॉमस डेनसन ह्यांनी नेतृत्व केलं. ह्या रिसर्च मध्ये असे दिसून आले की, अल्कोहोल युक्त पेयाचे सेवन करणाऱ्या लोकांच्या मेंदूत प्रीफ्रंटल कॉर्टेक्सच्या सक्रीयतेत कमतरता येते, ज्यामुळे व्यक्तीच्या बोलण्याच्या पद्धतीत बदल होतो.

 

alcohol-InMarathi04
floridaalcoholaddictionhelpline.com

ह्यातून हा निष्कर्ष समोर आला की, मद्यपान केल्यानंतर व्यक्तीच्या व्यवहारात हिंसकता वाढते. म्हणून ते त्यांच्या गोष्टीला बरोबर सिद्ध करण्यासाठी वारंवार बोलतात. आणि म्हणून मद्यपान केल्यावर लोक जास्त हिंसक किंवा रागीट वागतात. त्यांना नेहेमीपेक्षा जास्त राग येतो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?