रोज ठरलेल्या वेळी चहा-कॉफीची तल्लफ का येते? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

बहुतेकांना चहा आणि कॉफी सारखी पिण्याची सवय असते. दिवसातून ते कितीतरी वेळा चहा किंवा कॉफी पितातच. चहा किंवा कॉफी पिल्याशिवाय जणू या लोकांना त्यांचा दिवस पूर्णच झालेला नाही असे वाटते. त्यामुळे त्या लोकांना याची जणू सवयच लागते.

आपल्या प्रत्येकाचीच चहा पिण्याची एक वेळ नेहमीच ठरलेली असते आणि त्याच वेळेवर बरोबर चहा पिण्याची तल्लफ येते. पण असे का होते, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. आज आपण याच्याबद्दलच जाणून घेणार आहोत.

 

Brain becomes addicted to caffeine.Inmarathi
diversifiedhealth.ca

चहामधील कॅफेन हे एक प्रकारच्या ड्रग्ज सारखे काम करते. तुम्ही औषधे जरी यावर घेतलीत, तरीदेखील ते काही काळ काम करते आणि २४ तासांच्या आतमध्ये याची लक्षणे परत एकदा दिसायला सुरुवात होते. सुरुवातीला याची लक्षणे खूप कमी प्रमाणात असतात.

पहिल्यांदा तुम्हाला मानिसकदृष्ट्या अस्वस्थ वाटते. तुमचे स्नायू तुम्हाला थकल्यासारखे वाटतात. त्यामुळे तुम्हीं कठोर स्वभावाचे नसलात, तरीदेखील तुमची उगाचच लहानसहान गोष्टींमुळे चिडचिड होते.

कालांतराने तुम्हाला अस्पष्ट अशा डोकेदुखीची जाणीव यामधून होते. त्यामुळे तुम्हाला कशातही लक्ष केंद्रित करणे कठीण होते. हे ड्रग्ज अति प्रमाणात सेवन केल्यामुळे स्नायूंच्या मंद वेदना, मळमळ आणि इतर फ्लू लक्षणे तुम्हाला जाणवू शकतात.


 

Brain becomes addicted to caffeine.Inmarathi1
theconversation.com

एफडीएनने असे म्हटले आहे की, ८० टक्के अमेरिकन हे कॅफेनचे सेवन दररोज मोठ्या प्रमाणावर करतात. हे कॅफेन सेवन करण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. याचे जास्त सेवन केल्यास ते आपल्या मेंदूवर परिमाण करते.

त्यामुळे आपण गोष्टी विसरायला लागतो, जसे कारमध्ये काही वस्तू विसरणे, ऑफिसच्या मिटिंगमध्ये केलेली तयारी विसरणे. अशा कितीतरी गोष्टी आपण विसरायला लागतो.

इतर ड्रग्जप्रमाणेच कॅफेन हे रासायनिकदृष्ट्या व्यसनी बनवणारे आहे. शास्त्रज्ञांनी हे १९९४ मध्ये सांगितले होते.

गेल्या मे महिन्यामध्ये डायग्नोस्टीक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मॅन्टल डिसऑर्डर (डीएसएम) च्या प्रकाशनामध्ये हे सांगितले की, कॅफेन हे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिमाण करते.

 

Brain-becomes-addicted-to-caffeine.Inmarathi2
theconversation.com

आपण कॅफेनचे सेवन केल्यावर लगेचच आपले छोटे आतडे ते शोषून घेते आणि रक्तवाहिन्यांत ते पसरले जात. हे रसायन पाण्यात आणि पाण्याची मात्रा असलेल्या पदार्थात विरघळणारे असते.

अर्थातच त्यामुळे कॅफेन हे आपल्या मेंदूच्या पेशींच्या रिसेप्टरमध्ये योग्यप्रकारे बसू शकते. त्यामुळे अॅडिनोसिन हे प्रभावीपणे काम करायचे बंद करते आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

स्टीफन आर. ब्रॉन असे म्हणतात की, कॅफेन आणि अल्कोहोलचे विज्ञान आणि काम करण्याची पद्धत काही प्रमाणात सारखीच आहे.

कॅफेन हा पदार्थ हा नैसर्गिकदृष्ट्या उत्तेजक असतो. लोक या प्रकियेचा चहा, कॉफी, सोडा किंवा ऊर्जा देणारी पेय यांच्यामधून दैनंदिन आधारवर लाभ घेतात. परिणामी मस्तिष्काची रासायनिक आणि प्रत्यक्ष लक्षणे ही कालांतराने बदलतात.

त्यामुळे हे स्पष्ट होते की, चहा आणि कॉफी यांच्यामध्ये असलेल्या कॅफेनच्या अति सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीची कमतरता निर्माण होते.

 

Brain becomes addicted to caffeine.Inmarathi3
pinterest.co.uk

चहा आणि कॉफी यांच्यामधील कॅफेन सरळ आपल्या मेंदूवर परिणाम करत असल्याने त्याची आपल्याला सवय होऊन जाते. त्यामुळे जसे दारू पिणाऱ्या लोकांना दारू सारखी प्याल्यामुळे त्याचे व्यसन जडते.

तसेच, या धकाधकीच्या जीवनामध्ये खूप तणावग्रस्त परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि चहा आणि कॉफीमुळे उत्तेजना मिळत असल्याने लोक त्याचे सेवन मोठ्या प्रमाणावर करतात.

आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो, त्यामुळे दररोज त्या वेळी आपल्याला चहा पिण्याची तल्लफ येते आणि एकप्रकारचे आपल्याला त्याचे व्यसन जडते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *