वेगवान टायपिंग करणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला कुतूहल का असते? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

ज्या लोकांचा टायपिंग स्पीड कमी असतो त्यांना नेहमी इतरांचा टायपिंग स्पीड बघून हेवा वाटतो. हळू टायपिंग करणारे नेहमीच हा विचार करत असतात की जर आम्ही देखील एवढ्या वेगाने टायपिंग करू शकलो असतो तर…

जे खूप वेगाने टायपिंग करतात त्यांंच्याकडे लोक आकर्षले जातात.

 

FastTyping-inmarathi
monster.com

ऑनलाईन गेमिंगचे दिवाने असणाऱ्या लोकांचा टायपिंगचा स्पीड सर्वात जास्त असल्याचे मानले जाते. फिनलंडच्या ऑल्टो आणि ब्रिटनच्या कॅम्ब्रिज विद्यापीठाने जगभरात १ लाख ६८ हजार लोकांच्या टायपिंग करण्याच्या पद्धतीवर रिसर्च केला. ह्यात असे दिसून आले की, ऑनलाईन गेम खेळणारे लोक हे नेहेमी ‘रोलओव्हर टायपिंग’ करत असतात. म्हणजे असे लोक आधीची बटण सोडण्याआधीच पुढच्या अक्षराचे बटण दाबतात.

रोलओव्हर टायपिंग काय असते?

 

FastTyping-inmarathi02
pctechmag.com

गेम खेळणारे लोक जास्तकरून डाव्या हाताने कीबोर्ड कंट्रोल करतात आणि उजव्या हाताने माउस चालवतात. असे लोक टायपिंग करत असताना आपल्या खेळातील खेळाडूंना एकाच हाताने खूप वेगाने पळवतात किंवा कमांड देतात. वेगाने टायपिंग करण्यासाठी पुढील बटण दाबण्याआधीच बटण सोडणे खूप गरजेचे असते नाहीतर चुकीची कमांड दिली जाते.

फिनलंडच्या ऑल्टो विद्यापीठाच्या रिसर्चर एंती ओलसविर्ता सांगतात की, रोलओव्हर टायपिंग ही नैसर्गिक असते. ही कुठेही शिकवली जात नाही, शिकू शकत नाही. कदाचित तुम्ही देखील टायपिंग करताना रोलओव्हर टायपिंग करत असाल पण ते तुम्हाला कळत नाही.

 

FastTyping-inmarathi01
gitisystem.ir

एंती ओलसविर्ता ह्यांच्या मते प्रत्येक टायपिंग करणारी व्यक्ती आपल्या हिशोबाने टाईप करत असते. ह्या रिसर्च नुसार आपण ज्या बोटाने जे बटण दाबतो त्याच बोटाने ते बटण नेहेमी दाबायला हवे. पण सर्वात वेगवान टायपिंगचा खिताब जिंकलेले शॉन व्रोना ह्याचं ह्यावर वेगळेच मत आहे.

त्यांच्या मते प्रत्येक शब्दासोबत बटणा दाबण्याच्या पद्धतीत देखिल बदल होत जातो. शॉन हे १० वर्षांच्या वयातच एका मिनिटात १०८ शब्द टाईप करू शकत असत. ते सांगतात की, साधारणपणे जे बटण तुमच्या ज्या बोटाजवळ असते त्या बोटाने तुम्ही ते बटण दाबता.

शॉन ह्यांच्या मते टायपिंग हा एक असा गुण आहे जो खूप कामी येऊ शकतो. खूप कमी लोक आहेत जे आपल्या विचारांना लवकरात लवकर टाईप करू शकतात. आज लोकांनी ३०-४० शब्द प्रती मिनिटांच्या वेगावरून ६०-८० शब्द प्रती मिनिटेपर्यंत आपला टायपिंग स्पीड वाढवायला हवा. कारण आपल्या डोक्यात येणारे विचार हे त्याच वेगाने उतरवणे गरजेचे असते.

पण सध्या वेगाने टायपिंग करण्याची खरंच गरज उरली आहे का?

 

FastTyping-inmarathi04
businessworld.in

कदाचित पुढे चालून वेगाने टायपिंग करण्याची गरजच संपून जाईल. ह्याबाबत सांगताना डिजिटल एक्स्पर्ट बेन वूड म्हणतात की, २०२२ पर्यंत लोक आवाजाने कमांड देऊ लागतील. त्यामुळे टायपिंग ही कमी होऊन आवाजाने कमांड देऊन कुठलीही गोष्ट सर्च केली जाईल, किंवा कुठलेही काम केले जाईल. ह्याचा अर्थ हा नाही की टायपिंगची गरज उरणारच नाही पण काही अंशी कमी नक्की होईल.

तर जर कुणाला वेगाने टायपिंग करताना बघून तुम्हाला हेवा वाटत असेल तर तुम्ही तुमचं काम वॉईस कमाांड देऊन त्याहीपेक्षा वेगाने करू शकता, पण वेगाने टायपिंग करणे ही खरंच एक कला आहे हे विसरायला नको…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?