दारू पिल्यानंतर तुमच्या डोळ्यांना अंधुक का दिसतं? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आधुनिकीकरण जेवढं वाढत चाललं आहे त्यासोबतच लोकांच्या वागणुकी देखील बदलायला लागल्या आहेत. म्हणजे आता विकएंड हा एक नवीन फॅड आला आहे. म्हणजे शनिवार आणि रविवारची सुट्टी असली की ती पार्टी करण्यातच जाते.

आणि पार्टी म्हटली की दारू ही आलीच. तसे मद्यपान करण्याची ही परंपरा पूर्वापारपासून चालत आली आहे.

ह्याचे अनेक वाईट परिणाम देखील आहेत पण तरी देखील मद्यपान करणे ही अनेकांची आवड असते.

 

ranbir alcohol-InMarathi
thequint.com

पण मद्यपान केल्यानंतर डोळ्यांसमोर अंधार हा येतो…?


ह्याचा कधी विचार केला आहे का?

मद्यपानाचा तुमच्या दृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. हा परिणाम काही वेळासाठीही असू शकतो तसेच दीर्घकाळासाठी देखील होऊ शकतो. रोज खूप प्रमाणात मद्यपान केल्याने तुमची दृष्टी नेहमी करिता जाऊ शकते तसेच कधी-कधी मद्यपान केल्याने देखील तुमच्या दृष्टीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

 

alcohol-InMarathi01
huffingtonpost.com

काही काळासाठी होणाऱ्या परिणामांमध्ये अंधुक दिसणे, दुप्पट दिसणे, डोळे सुकणे, डोळे खाजवणे, माइग्रेन इत्यादी समस्या उद्भवतात. हे सर्व परिणाम अल्पकालीन असतात जे काहीच तासांत सामान्य होऊन जातात. त्यामुळे दीर्घकाळासाठी कुठलाही परिणाम होत नाही.

तर खूप मोठ्या प्रमाणात मद्यपान करणे, ह्याचा आपल्या दृष्टीवर खूप वाईट तसेच दीर्घकालीन परिणाम होतो. ह्यामुळे वयासंबंधी मॅक्यूलर डीजनरेशन होण्याची शक्यता वाढून जाते.

पण हे जास्तकरून वृद्ध लोकांमध्ये होते, वृद्ध व्यक्ती जर अति प्रमाणात मद्यपान करत असेल तर तिला ह्या समस्येला सामोरे जावे लागते.

 

alcohol-eyes-effects-inmarathi
menshealth.com

मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याने मोतीबिंदू आणि ऑप्टिक न्युरोपॅथीचा धोका तसेच दृष्टीहीन होण्याचा धोका संभवतो. ह्यामुळे आपण पुरेश्या प्रमाणात जीवनसत्वे शोषून घेऊ शकत नाही, ज्याचा परिणाम तुमच्या दृष्टीवर होतो.

जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे रात्र आंधळेपण, डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा पातळ होत जाणे इत्यादी समस्या संभवू शकतात. एवढचं नाही तर गर्भवती महिला जी मोठ्या प्रमाणात मद्यपान करत असेल तर त्याचा होणाऱ्या बाळाच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.

जे लोक कधी कधी मद्यपान करतात त्यांना देखील अंधुक दृष्टीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

 

man-drinking-inmarathi
indianexpress.com

बघण्याच्या ह्या प्रक्रियेत डोळे आणि मेंदू ह्यांचा संयोग घातला जातो. म्हणजे आपले डोळे जे बघतात त्याचा एक फोटो मेंदूला पाठवला जातो. त्यानंतर मेंदू आपल्याला त्या संबधीचे संकेत पाठवतो. त्यामुळे आपल्या डोळ्यात आणि मेंदूमध्ये हे संतुलन राखणे खूप गरजेचे असते.

तसेच मद्यपानाचा तुमच्या डोळ्यातील बुबुळांच्या स्नायूंवर देखील वाईट परिणाम होतो.

हे स्नायू आपल्या डोळ्यातील लेन्सच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून असतात, ज्यामुळे आपण एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करून शकतो. पण ह्या स्नायूंवर परिणाम झाल्याने आपल्याला एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला अंधुक दिसू लागते.

 

alcohol-eyes-effects-inmarathi0
gazetapaloma.net

मद्यपानाचा निव्वळ आपल्या दृष्टीवरच नाही तर संपूर्ण शरीरावर अतिशय विपरीत असा परिणाम होतो. त्यामुळे मद्यपान न करणे हे कधीही चांगले पण तरी देखील मद्यपान करताना काही मर्यादा ठेवणे देखील तेवढेच गरजेचे आहेत. कारण किती प्रमाणात मद्यपान केल्याने आपल्या शरीरावर किती परिणाम होऊ शकतो हे सांगता येत नाही.

हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते. जसे स्त्रिया ह्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात केलेल्या मद्यपानाचा देखील खूप परिणाम होऊ शकतो. वयानुसार देखील ह्याचे वेगवेगळे परिणाम बघायला मिळतात.

मद्यपानाने येणारे हे संकेत तसे तर तेवढे काही हानिकारक नाहीत पण जर तुम्ही गाडी चालवत असाल तर ह्याचे अतिशय वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात.

कधी काळी मद्यपान करणे हे शरीरासाठी तेवढे नुकसानदायक नसले तरी त्याचे अति सेवन तुमच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे तुमच्या दृष्टीवरच नाही तर शरीराच्या इतर अवयवांवर देखील ह्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मद्यपान न करणे हे कधीही शहाणपणाचे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *