कॉम्प्यूटरच्या Local Disk चं नाव A, B ने सुरु न होता C पासूनच का सुरु होतं?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजवर अनेकांना हा प्रश्न पडला असेल, काहींनी ही शंका हसण्यावारीही नेली असेल. आता देखील हा प्रश्न वाचून बरेच जण म्हणत असतील, “हा काय प्रश्न आहे का?” तर हो.. खरंच हा एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे आणि त्यामागचं उत्तर देखील जाणून घेण्यासारखं आहे आणि अजूनही बऱ्याच लोकांना त्या मागचं उत्तर माहित नाही. तुम्हालाही नसेल माहित तर आज जाणून घ्या.

windows-marathipizza
http://it-n-careerz.blogspot.in

जेव्हा कॉम्प्यूटर पहिल्यांदा जगासमोर सादर केला तेव्हा त्यात अगदी काहीच KB (kilobytes) ची स्पेस होती. ज्यामध्ये फारच कमी डेटा स्टोअर करता यायचा आणि कधी कधी महत्वाचा डेटा स्टोअर करायची गरज भासली की लोकांची पंचायत व्हायची.

यावर उपाय म्हणून तेव्हा लोक स्टोरेज वाढवण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा वापर करायचे. वर्ष २००० उलटल्यानंतर या फ्लॉपी डिस्कचा वापर पूर्णत: बंद झाला आहे. आता अगदी क्वचितच फ्लॉपी डिस्क पाहायला मिळेल.

floopy-disks-marathipizza
http://www.geek.com

आताची तुमच्याकडे जी एक्सटर्नल हार्ड ड्राइव आहे ते फ्लॉपी डिस्कचे सुधारित रूप म्हणता येईल. जेव्हा हार्ड डिस्कअस्तित्वात आली, तेव्हा तिचे स्वरूप आजच्या हार्ड डिस्क पेक्षा फार वेगळे होते. मुख्य म्हणजे हार्ड डिस्कची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळे सामान्य सुशिक्षित माणसाला ज्याला कॉम्प्यूटर वापरता यायचा, त्याला काही ती परवडण्यासारखी नव्हती. त्यामुळे फ्लॉपी डिस्क त्याकाळी बरीच प्रसिद्ध झाली होती, अर्थातच तिची किंमत कमी होती.

याच काही कारणांमुळे त्या काळी कॉम्प्यूटर मध्ये हार्ड ड्राईव ऐवजी दोन फ्लॉपी ड्राईव आढळायचे. या दोन ड्राईव्हसना अनुक्रमे  A ड्राइव आणि B ड्राइव असे नाव दिले गेले होते. तेव्हाचे मदरबोर्ड्स दोन पेक्षा जास्त फ्लॉपी ड्राइव्हसना सपोर्ट करायचे नाहीत. काही जणांकडे फ्लॉपी डिस्क सोबत हार्ड डिस्क देखील असायची. या हार्ड डिस्कच्या पहिल्या ड्राईवला C ड्राईव म्हटले जायचे आणि हेच नाव पुढे प्रचलित झाले.

floopy-disks-marathipizza01
ww.howtogeek.com

म्हणूनच आता तुमच्या कॉम्प्युटरमध्ये जी हार्ड डिस्क आहे त्याचं जे पहिलं ड्राईव आहे ते C पासून सुरु होतं. जर तुम्हाला कुठे फ्लॉपी डिस्क असणारा कॉम्प्यूटर आढळून आला तर त्याच्या पहिल्या दोन ड्राईवची नावं ही A आणि B असल्याचे तुम्हाला दिसेल.

आहे की नाही या विचित्र प्रश्नामागे अर्थपूर्ण कारण!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?