जाणून घ्या इमारतींबाहेर ‘असे’ रस्ते असण्यामागचे कारण!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की बहुतांश इमारतींबाहेर लोखंडी पाईप लावलेले असतात. खासकरून ही गोष्ट तुम्हाला सरकारी कार्यालये, इस्पितळे, शाळा, महाविद्यालये यांच्या इमारतींजवळ आढळून येईल. या लोखंडी पाईपांमध्ये अगदी छोटीशी फट असते. म्हणजे एक प्रकारे लोखंडी पाईपांचा रस्ताच तयार केलेला असतो म्हणा ना, म्हणजे त्यावरून गाडी जाऊ शकेल. पण तुमच्या मनात कधी असा विचार आलंय का की हे लोखंडी पाईप असे भर गेटवर लावायचे कारण काय? त्यांच्या नेमका उद्देश काय असेल?

bars-with-hollow-spaces-marathipizza01

स्रोत

या लोखंडी पाईपच्या सिस्टमला cattle grids किंवा cattle guards असे म्हटले जाते. यांचा उपयोग जनावरे आत येऊन नये यासाठी केला जातो. जनावरांचे पाय अगदी सरळ असतात, त्यामुळे यांवरून जर त्यांनी चालायचा प्रयत्न केला तर चालताना त्यांचे पाय लोखंडी पाईपांच्या फटीमध्ये अडकतात. त्यामुळे जनावरे हा लोखंडी पाईपचा रस्ता पार करू शकत नाही.

याउलट मनुष्याच्या पायाची ठेवण ही वेगळी आहे, ज्यामुळे तो सहज हा लोखंडी पाईपचा रस्ता पार करू शकतो. गाड्यांना देखील गोल चाकांमुळे यावरून जाताना त्रास होत नाही.

भारतात आपल्याला सगळीकडे जनावरे भटकताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांनी इमारतीच्या आवारात सहज प्रवेश करू नये म्हणून ही युक्ती लढवण्यात येते.

bars-with-hollow-spaces-marathipizza02

स्रोत

परदेशात अनेक ठिकाणी एका वेगळ्या पद्धतीचा वापर केला जातो. ज्या रस्त्यावर असे लोखंडी पाईप लावणे शक्य नाही, तेथे जनावरांना भ्रमित करणाऱ्या पट्ट्या आखल्या जातात. त्यामुळे ते स्वत:च त्यापासून दूर राहतात.

bars-with-hollow-spaces-marathipizza03

स्रोत

आता तुमच्या लक्षात आलं असेल की, हे लोखंडी पाईप एकप्रकारे लक्ष्मणरेषेचं काम करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?