लिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागचं कारण काय? जाणून घ्या..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आधुनिकीकरण होत असताना जगात औद्योगिक क्रांती होत गेली. तसेच आर्थिक आणि सामाजिक क्रांती सुद्धा घडली. लोकांच्या गरजा वाढू लागल्या. त्यासोबतच आभाळाला साद घालणार्या इमारती तयार होऊ लागल्या.
पुर्वीच्या इमारती लहान असल्यामुळे त्यांना लिफ्ट नव्हत्या. पण उंच इमारतींना लिफ्टशिवाय पर्यायच नव्हता.
आता तर लहान इमारतींना सुद्धा लिफ्ट्स आहेत. इतकेच काय तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुद्धा लिफ्ट्स लावण्यात आलेल्या आहेत.
आजचा माणूस इतका सुखवस्तू झालेला आहे.

आपल्यापैकी अनेक लोक आता पायर्यांनी चढ उतार करण्याऐवजी लिफ्टनेच जाणे पसंत करतात. तुम्ही जेव्हा जेव्हा लिफ्टमधून जाता तेव्हा कधी विचार केला आहे का की लिफ्टमध्ये आरसे का बसवलेले असतात? असं कोणतं कारण असावं?
तुम्ही पाहिलं असेलंच, लिफ्टमध्ये गेल्यावर तुम्हाला समोर आरसा दिसतो. लोक आरश्यात पाहून केस विंचरत असतात, आपला चेहरा न्याहाळत असतात, कधी कधी तर आरश्यात इतरांचाही चेहरा न्याहाळता येतो.
पण आरसे लावण्यामागचं कारण तांत्रिक आहे? सामाजिक आहे? की मानसिक आहे?

ज्यावेळी इमारतींमध्ये सुरुवातीला लिफ्ट्स लावण्यात आल्या तेव्हा लोकांच्या अनेक तक्रारी होत्या. अनेकदा उंच इमारतींमध्ये लिफ्टमधून जाताना खुप वेळ लागायचा. कधी कधी तर लिफ्ट मध्येच बंद पडायची. यामुळे लोक अक्षरशः वैतागायचे.
त्यांना वाटायचं की लिफ्टमुळे आपला वेळ वाया जात आहे. इतकंच नाही तर काही लोकांना लिफ्टमध्ये जायला सुद्धा भिती वाटायची.
पण दुसरा पर्याय नसल्यामुळे लिफ्टचाच वापर करावा लागत असे.
सर्वांची एक सामान्य तक्रार अशी होती की लिफ्ट खुपच धीम्या गतीने चालते. लोकांच्या या तक्रारीमुळे इंजिनियर्स मात्र त्रस्त होते. लिफ्ट जर धीम्या गतीने चालत असेल तर तिला वेगवान कसं करायचं? हा प्रश्न इंजिनियर्सना सतावत होता.
मग इंजिनियर्सनी लिफ्टचा वेग वाढवण्याचा विचार केला. पण त्याकाळी मोठ्या मोटर्सचा वापर करुन लिफ्टची गती लाढवायची म्हटलं तर खर्च खुप होता. हा खर्च अवाक्याबाहेरचा असल्यामुळे वेगळ्या मार्गानेच विचार करावा लागणार होता. पण मार्ग काही सापडला नाही.

आता इंजिनियर्स समोर प्रश्न होता की ही समस्या कशी सोडवायची. मग एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी विचार करुन पाहिला. खरोखर लिफ्ट हळू चालते का? की लोकांना नुसतं असं वाटतंय? लोकांना या बाबतीत विचारलं असताना त्यांनी आपल्या तक्रारी सांगितल्या.
तेव्हा इंजिनियर्सच्या असं लक्षात आलं की लिफ्टमधून जाताना लोकांना दुसरं काही करण्यासारखंच नव्हतं.
ते लिफ्टच्या भिंतीकडे बघत बसायचे किंवा एकमेकांच्या तोंडाकडे पाहत बसायचे. दुसरं करणार तरी काय? त्यांना विरंगुळाच नव्हता.
आता इंजिनियर्स अगदीच वेगळ्या पद्धतीने विचार करु लागले होते. लिफ्टचा वेग वाढवण्यापेक्षा लोकांना काहीतरी विरंगुळा द्यायचा होता. अनेक बाबींचा विचार करुन त्यांनी लिफ्टमध्ये आरसे बसवण्याचे ठारवले. लिफ्टमध्ये आरसा बसवण्यात आला.
आता त्यांनी पुन्हा लोकांना विचारलं की लिफ्टचा वेग वाढला आहे की पूर्वीसारखाच आहे. तर लोकांनी लिफ्टचा वेग वाढला असल्याचे सांगितले.

म्हणजे लिफ्टमध्ये आरसे बसवण्यामागचं कारण तिचे सुशोभीकरण किंवा आणखी काही नसून मानसशास्त्रीय आहे. लोकांच्या मानसिकतेला विचारात घेऊन लिफ्टमध्ये आरसे बसवण्यात आले आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
छान माहिती मिळाली खरचं खूप छान
nice
चुकीची माहिती आहे. खूप लोकांना clastrophobia हा मानसिक आजार असतो ज्यात बंद जागेत एकट्याने असणे याची त्यांना प्राणांतिक भीती वाटते. तर अश्या लोकांसाठी लिफ्ट मध्ये आरसा बसवतात ज्यायोगे त्यांना आभासी compny मिळते (स्वतः च्या प्रतिबिंबाची) व त्यांची भीती बरीचशी कमी होते