विज्ञान-अभियांत्रिकी क्षेत्रात महिला कमी असण्याच्या या कारणांची तुम्ही कल्पनाही केली नसेल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

टेक्निकल फिल्ड्स हे कधीही मुलींपेक्षा मुलांनी भरलेले आढळतात. १९९१ पूर्वी इंजिनीअर मुलगी ही कन्सेप्ट भारतात दुर्मिळ वाटत असे. १९९१ नंतर जसे संगणक युग सुरु झाले तसे मुली देखील संगणक अभियंता म्हणून कंपनी मध्ये काम करताना दिसू लागल्या.

तरीही आज इंजिनिअरिंगची अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे मुलींचे प्रमाण नगण्य असते किंवा काहीच नसते. सिव्हील इंजिनिअरिंग असेल, ऑटोमोबाईल असेल, मेकॅनिकल असेल अशा क्षेत्रात मुली कमी पाहायला मिळतात.

बऱ्याचदा इंजिनीअर लोकांचे जोक्स सोशल मीडियावर पसरवले जातात ज्यांची भाषा फक्त इंजिनीअर ला कळते. यातील बहुसंख्य जोक मुलींना इंजिनीअरिंग कशी कळत नाही यावर केलेले असतात.

 

girls-engeneer-inmarathi
qph.fs.quoracdn.net

खुद्द IIT ने आता स्वत:च्या शिक्षण संस्थेत मुलींचा कोटा वाढवण्यासाठी पावले उचलली आहेत. २०१८ साली आपल्या संस्थेत प्रवेश देताना IIT ला विशेष आनंद झाला होता कारण एकूण प्रवेशाच्या जवळजवळ १६% प्रवेश हे मुलींचे होते. मुलीबाबत चा असा भेदभाव संपवण्यासाठी IIT ने स्वत:च्या कोटा पद्धती मध्ये आता बदल केला आहे.


त्यासाठी त्यांनी एका नवीन कोट्याची सुरुवात केली आहे ज्याचे नाव आहे super numerory quota. या कोट्या अंतर्गत मुलींसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येतील.

अर्थात ही एक थोड्या काळासाठी केली गेलेली सोय आहे. समजा उद्या मुलींचे प्रमाण वाढले तर IIT हा कोटा काढून टाकेल. IIT दिल्लीने तर ज्या मुली प्रवेश परीक्षा पास होतात त्या दिल्लीला इंटरव्ह्यू देण्यासाठी येवू शकत नसतील तर त्यांच्यासाठी फोन किंवा इमेल द्वारे इंटरव्ह्यूची सोय करण्याचे पाऊल उचलले आहे.

अजून पुढे जावून ज्या मुलींना शिक्षणासाठी घारापासून दूर राहायचे नसेल अशा मुली आपल्या घराच्या किंवा आसपास च्या IIT ला प्रवेश घेवू शकतात अशी सूट देखील देण्यात आलेली आहे.

IIT ही देशातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी चे शिक्षण देणारी संस्था समजली जाते. भारतात अशा एकूण २३ IIT आहेत जिथे सगळे मिळून किमान १२,०७१ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यांच्यापैकी १०,२१९ मुळे असतात आणि केवळ १,८५२ मुली असतात. याउलट डॉक्टर च्या प्रवेश परीक्षेमध्ये पास होवून प्रवेश घेण्याचे मुला मुलींचे प्रमाण ५०-५१ % असे आहे.

 

girls-scientist-inmarathi
news.unl.edu

म्हणजे डॉक्टर बनण्याकडे मुलींचा जास्त ओढा असतो पण अभियांत्रिकीकडे मुली जास्त वळत नाहीत असा निष्कर्ष यातून कोणीही सहज काढू शकेल. याच्यावरून देखील मग मुलींना गणित कळत नाही त्यामुळे त्या सायन्सला biology चा विकल्प निवडतात. मुलींना तांत्रिक बाबी कळत नाहीत अशा शक्यतेवर whats app वर विनोदाचे महापूर वाहत असतात. पण खरी परिस्थिती काय आहे ?

एक तर मुलींना आजही घरात शिक्षण घेण्यासाठी दुय्यम स्थान दिले जाते. जर घरात मुलगा असेल तर मुलाला शिकण्यासाठी जास्त उत्तेजन दिले जाते तितके उत्तेजन मुलीला दिले जात नाही.

जर आई वडिलांची शिकवण्याची परिस्थिती नसेल तर त्यावेळी मुलीला सांगितले जाते की तुला तडजोड करावी लागेल. मुलाचा शिक्षणाचा हट्ट पुरवला जातो. त्याला महागडी कोचिंग लावली जाते, त्याला शिक्षणासाठी कर्ज काढून दूर पाठवलं जातं, त्याच्या शैक्षणिक गरजा भागवण्याकडे लक्ष दिलं जातं पण हीच भूमिका मुलीबद्दल नसते.

त्यामुळे अनेक वेळा मुलींना घरात नमते घ्यावे लागते. स्वत:ची इच्छा आणि आवड मारून शिकावे लागते किंवा शिक्षण बंद करावे लागते.

अभियांत्रिकी साठी जी प्रवेश परीक्षा घेतली जाते तिच्या परीक्षेला ही फार कमी मुली बसतात. २०१८ मध्ये तर केवळ ६% मुलीनी JEEE ची प्रवेश परीक्षा दिली होती.

 

iit-girls-inmarathi
itbbs.ac.in

कारण अशा परीक्षांचे कोचिंग देणे मुलींच्या घरच्यांना परवडत नाही. मुलींना अभियांत्रिकी क्षेत्रात कामे देण्यास देखील कंपन्यांचा विरोध असतो. मुलींची लग्ने होतात, त्यांच्या बाळंतपणाच्या सुट्या वाढवून द्याव्या लागतात. मुलींना साईटवर पाठवता येत नाही अशी मानसिकता इंडस्ट्री मध्ये भरून राहिलेली असते त्यामुळे सुद्धा अभियांत्रिकी क्षेत्रात मुलींचे प्रमाण कमी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *