जाणून घ्या संरक्षण खात्यातील अधिकारी वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट का करतात?
आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
ही गोष्ट तुमच्यापैकी किती जणांच्या नजरेत आली असेल माहित नाही, पण नीट पाहिलं तर लक्षात येतं की भारतीय सेना, वायुसेना आणि नौसेनेचे अधिकारी जो सॅल्युट करतात, तो वेगवगेळ्या प्रकारचा असतो. खात्री करून घ्यायची असेल तर प्रजासत्ताक दिनाची वगैरे परेड पहा, त्यात तुम्हाला हा फरक नक्की दिसून येईल. चला आज जाणून घेऊया वेगवेगळ्या प्रकारे सॅल्युट करण्यामागचं कारण काय आहे.
सगळ्यात प्रथम जाणून घेऊया भारतीय सेना अधिकाऱ्यांच्या सॅल्युटबद्दल :

भारतीय सेनेचे अधिकारी सॅल्युट करताना, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला हाताचा पंजा सरळ दिसेल अश्याप्रकारे हाताची पोझीशन ठेवतात.
भारतीय सेना अधिकारी हाताची पोझिशन वरील प्रकारे ठेवून असे दर्शवतात की आम्ही निशस्त्र आहोत आणि तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता.
आता जाणून घेऊया भारतीय वायूसेना अधिकाऱ्यांच्या सॅल्युटबद्दल :

भारतीय वायू सेनेचे अधिकारी सॅल्युट करताना, आपला हात जमिनीपासून ४५ अंशाच्या कोनात राहील अश्या पोझिशनमध्ये ठेवतात.
भारतीय वायू सेना अधिकारी हाताची पोझिशन वरील प्रकारे ठेवून असे दर्शवतात की आम्ही आकाशाकडे झेप घेत आहोत, असा सॅल्युट करून अधिकारी भारतीय वायूसेनेच्या आकाशाला गवसणी घालण्याच्या ध्येयाची आठवण करून देतात.
आता सगळ्यात शेवटी जाणून घेऊया भारतीय नौसेना अधिकाऱ्यांच्या सॅल्युटबद्दल :

भारतीय सेनेचे अधिकारी सॅल्युट करताना, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला हाताचा पंजा दिसणार नाही, अश्याप्रकारे हाताची पोझिशन खालच्या बाजूस ठेवतात.
याचे कारण म्हणजे जहाजावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे हात ऑईल वा ग्रीसमुळे खराब होतात आणि सॅल्युट करताना समोरील व्यक्तीला त्या खराब हाताने सॅल्युट करणे उचित नाही असे मत मांडण्यात आले, म्हणून नौसेनेचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी वरीलप्रमाणे सॅल्युट करतात.
काय आहे कि नाही अति रंजक आणि महत्त्वाची माहिती?!
—
लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page