मूर्ती पूजा नं मानणाऱ्या धर्मातील दगडाच्या खांबाला सैतान समजून दगड मारण्याची “अशीही” लोकप्रिय प्रथा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

हजयात्रा… ही अशी यात्रा आहे ज्या यात्रेला जगभरातील सर्व मुस्लीम बांधव जाण्याची इच्छा बाळगुन असतात. मुस्लिमांसाठी ही यात्रा म्हणजे आपली तीर्थयात्राच. दरवर्षी लाखो मुस्लीम बांधव मोठ्या श्रद्धेने ह्या हज यात्रेला जातात. ‘हज’ हे सौदी अरेबिया येथील मक्का शहरात आहे आहे.

पण असं काय आहे तिथे, की सर्व मुस्लीम बांधव आपल्या जीवनात एकदा तरी तिथे जाण्याची महत्वाकांक्षा बाळगतात?

 

aamir khan at hajj inmarathi

 

आणि ते तिथे जाऊन काय करत असतील? असे अनेक प्रश्न या हाजयात्रेबद्दल आपल्याला पडले असतील. आज आपण याच हज यात्रेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जेव्हा कुणी हज साठी जातो तेव्हा तो आपल्या सर्व नातेवाईकांना भेटतो आणि आपल्या चुकांची क्षमा मागतो.

हजला जाणे हे प्रत्येक मुसलमानासाठी गरजेचं आहे कारण हे इस्लामच्या फाईव्ह पिलरपैकी एक आहे, जसे की कलमा वाचणे, नमाज पठन, रोजा ठेवणे, जकात देणे आणि हजला जाणे. कलमा, नमाज आणि रोजा हे सर्व मुसलमानांसाठी अनिवार्य आहे.

 

haj yatra inmarathi

 

 

पण जकात आणि हज हे अनिवार्य नाही. हे तेच लोक करतात जे त्यासाठी सक्षम असतात. म्हणजे ज्याच्याकडे एवढा पैसा असेल की तो दान करू शकतो आणि हज यात्रेला जाऊ शकतो, त्याला ही दोन्ही कामे करावीच लागतात.

हज यात्रा सौदी अरब येथील मक्का शहरात होते, कारण इथे काबा आहे. याच इअमरतिकदे मुख करून जगभरातील मुसलमान नमाज पठन करतात. काबाला अल्लाहचे घर मानले जाते. त्यामुळे हे ठिकाण मुसलमानांचे तीर्थस्थान आहे.

प्रत्येक मुसलमानाने आपल्या जीवनात एकदा येथे जाणे आवश्यक असल्याचे सांगितले गेले आहे.

 

haj-yatra-inmarathi

 

हज हे इस्लामिक दिनदर्शिकेच्या १२ व्या महिन्यात जिल हिज्जाहच्या ८ तारखेपासून ते १२ तारखेपर्यंत असते.

१२ तारखेला ज्या दिवशी हज पूर्ण होते तो दिवस ईद-उल-अजहा चा असतो, म्हणजेच बकरी ईद.

हज यात्रेव्यतिरिक्त देखील आणखी एक यात्रा असते ज्याला “उमारह” असे म्हटले जाते. दोन्ही यात्रांच्या विधी सारख्याच असतात पण हज यात्रा ही केवळ बकरी ईदच्या वेळीच केळी जाते, तर उमराह ही वर्षभरात कधीही केली जाऊ शकते.

हज हा ७व्या शतकापासून इस्लामी पैगंबर मुहम्मद ह्यांच्या जीवनाशी निगडीत आहे. पण मुसलमान असे मानतात की, मक्काच्या ह्या तीर्थयात्रेची ही पद्धत अल्लाहचे नबी इब्राहीम ह्यांच्या जमान्यापासून चालत आली आहे. सुरुवातीला आपण हज यात्रेतल्या कर्मकांडाविषयी थोडक्यात माहिती घेऊ..

१. इहराम बांधणे :

 

haj-yatra-inmarathi01

 

ही हज किंवा उमराह करण्याची पहिली पायरी असते. ह्यादरम्यान एक विशिष्ट प्रकारचा पोशाख परिधान केला जातो. ह्या पोशाखात दोन चादरी असतात, त्या शरीराला गुंडाळल्या जातात, आणि मग इबादतला सुरवात केली जाते. यानंतर अनेक गोष्टीं वर्ज्य केल्या जातात.

जसे की शरीराच्या कुठल्याही भागातून केस काढणे, अत्तर लावणे वगैरे. त्यामुळे इहराम बांधण्याआधी आपल्या शरीराची पूर्णपणे स्वच्छता केली जाते. इहराम बांधण्यानंतर कुराणचे आयत पठन करावे लागते.

२. काबाचा तवाफ :

haj-yatra-inmarathi02
prabhatkhabar.com

 

इहरामच्या नंतर काबाला जावे लागते. येथे नमाज पठन केले जाते. त्यानंतर काबाची परिक्रमा घालावी लागते. काबा सर्व मुसलमानांच्या एकतेचं प्रतिक आहे. जगात भलेही शिया-सुन्नी, बरेवली-देवबंदी चे वाद असो पण, काबा साठी सर्व एकत्र येतात.

३. सफा आणि मरवा :

 

haj-yatra-inmarathi03

 

सफा आणि मरवा ही दोन पहाडांची नावे आहेत. ज्यांच्यामध्ये चक्कर मारावे लागतात, आणि दुआ वाचाव्या लागतात. य दोन्ही पहाडांच्या मध्ये सात चकरा माराव्या लागतात. याच ठिकाणी हजरत इब्राहीमची पत्नी आपल्या मुलासाठी- इस्माईलसाठी पाण्याच्या शोधात गेली होती.

मक्का येथून जवळपास ५ किलोमीटरवर मीना नावाचे एक ठिकाण आहे. जिथे सर्व हाजी जमतात आणि सायंकाळी नमाजपठन करतात.

पुढच्या दिवशी अराफात नावाच्या ठिकाणी पोहोचतात आणि एक मोठ्या मैदानात उभं राहून अल्लाहकडे दुआ मागतात.

४. शैतानाला दगड मारणे :

 

haj-yatra-inmarathi04

सर्व हाजी मीना येथे परततात आणि तिथे शैतानाला दगड मारतात. शैतानाला दर्शविण्यासाठी येथे तीन स्तंभ आहेत. ज्यावर हाजी सात दगड मारतात. अरबीमध्ये ह्याला रमीजमारात म्हणतात.

असे म्हणतात की, हे तेच ठिकाण आहे जिथे शैतानाने हजरत इब्राहीम ह्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 

५. कुर्बानी :

 

haj-yatra-inmarathi05

 

शैतानाला दगड मारल्यानंतर जनावराच्या कुर्बानीची वेळ येते. ह्यात कुर्बानी मेंढी किंवा बकरीची दिली जाते. बऱ्याचदा उंटाची देखील कुर्बानी दिली जाते.

अल्लाहच्या मार्गात आपल्या मुलाला- इस्माईलला हजरत इब्राहीम ह्यांनी कुर्बान केले, ह्यांच्या कुर्बानीच्या स्मरणार्थ ही कुर्बानी दिली जाते.

पहिले हाजी स्वतः पशु खरेदी करून कुर्बानी द्यायचे. पण आता हाजींना बँकेतून एक टोकन विकत घ्यावे लागते, ज्याचा अर्थ आहे की, त्यांना पैसे देऊन जनावर खरेदी करून त्यांची कुर्बानी दिली जाईल आणि त्यांच्या वतीने ते मांस गरिबांत वाटले जाईल.

६. मुंडण करणे :

 

haj-yatra-inmarathi06
factly.in

 

सफा आणि मरवा नंतर डोक्यावरील केस काढावे लागतात. पुरुषांना डोक्यावरील सर्व केस काढावे लागतात तर महिलांना थोडे केस कापावे लागतात. असे करणे खूप गरजेचे समजले जाते. त्याशिवाय हज उमराह संपूर्ण होत नाही अशी श्रद्धा आहे.

ह्यानंतर परत एकदा काबाची परिक्रमा करून हज पूर्ण केले जाते.

असं काय झालं की हजमध्ये शैतानाला दगड मारले जातात?

जेव्ह हजरत इब्राहीम आपल्या मुलाला इस्माईलला कुर्बान करण्यासाठी घेऊन जात होते. तेव्हा रस्त्यात त्यांना एक व्यक्ती भेटली जिला इस्लाममध्ये शैतान म्हटले जाते.

हा शैतान जिथे भेटला होता ते ठिकाण म्हणजे जिथे हज दरम्यान तीन स्तंभांना दगड मारले जातात.

शैतान हजरत इब्राहीम यांना म्हटले की, ते ह्या वयात का आपल्या मुलाची कुर्बानी देत आहेत? वृद्धापकाळात तो तुमचा सांभाळ करेल आणि तुम्ही त्याचीच कुर्बानी देत आहात. ह्याच्या मृत्यू नंतर कोण तुमचा सांभाळ करेल?

 

women at hajj inmarathi

 

हजरत इब्राहीम हे ऐकून विचारात पडले. त्यांनी म्हटलं की,

“माझ्या नजरेसमोरून दूर हो, तू शैतान आहेस. जो अल्लाहच्या कामात व्यत्यय आणतो आहे.”

शैतानने त्यांच्या मुलाला म्हणजेच इस्माईलला देखील विचलित करण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील विचलित झाला नाही. ह्यामुळे आजही मुसलमान हज दरम्यान शैतानला दगड मारतात.

त्याने नबी करत असलेल्या अल्लाहच्या कामात व्यत्यय आणला होता, असे मुसलमान मानतात.

पण इस्लाम धर्मात मूर्ती पूजा हराम मानली जाते. मग हे तीन स्तंभ शैतान कसे झाले, जर दगड हा देव असू शकत नाही तर दगड शैतान कसा झाला – ह्यावर एक वेगळा वाद चर्चिला जातो.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “मूर्ती पूजा नं मानणाऱ्या धर्मातील दगडाच्या खांबाला सैतान समजून दगड मारण्याची “अशीही” लोकप्रिय प्रथा…

  • September 20, 2018 at 3:33 am
    Permalink

    excellent blog

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?