आपल्याकडे पॉर्न मुव्हीजला “ब्लू फिल्म्स” का म्हणत असतील?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


अडल्ट मूव्हीज, पॉर्न हे असे व्हिडीओज असतात जे सर्व बघतात पण सांगत कोणी नाही. रीसर्चनुसार ह्या प्रकारचे व्हिडिओ बघणाऱ्यांत भारतीयांचा तिसरा क्रमांक लागतो.

पण आपल्याकडे ह्याला अडल्ट मूव्हीज किंवा पॉर्न नाही, तर “ब्लू फिल्म” म्हणतात. ज्या ब्लू फिल्मला तुम्ही एवढ्या उत्कटेने, सर्वांपासून लपवून एकांतात बघता, त्याला ब्लू फिल्म का बर म्हटल्या जात असेल ह्याचा कधी विचार केला आहे का?

 

porn-blue-films-inmarathi01
newstracklive.com

आपला देश हा एक संस्कृतीप्रिय देश आहे, जिथे ह्याप्रकारचे व्हिडिओज बघणे हा संस्कृतीचा अनादर करणे आहे. आणि आता आपल्याकडे ह्याप्रकारचे काही साईट्स बॅन करण्यात आल्या आहेत. लोक ह्याबद्दल सार्वजनिक बोलायला देखील टाळतात.

पण तरी बघतात… आपल्या देशात ह्या प्रकारच्या फिल्म्सना ‘ब्लू फिल्म्स’ म्हटले जाते. ह्यामागे ३ वेगवेगळ्या थेअरीज सांगितल्या जातात.

आधीच्या काळी पॉर्न फिल्म इंडस्ट्रीमधील चित्रपटांच बजेट खुप कमी असायचं. म्हणून पॉर्न चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी ब्लॅक अॅण्ड व्हाईट रीलला स्वस्त दरात कलर करण्याचा विचार केला.

 

porn-blue-films-inmarathi
satyagrah.scroll.in

ह्या स्वस्त बजेटच्या कामामुळे जेव्हाही ‘ब्लू फिल्म’ बघितले जाते तेव्हा त्यात येणारे ‘ब्लू टिंट’ नोटीस केले जाते. म्हणूनच ह्या चित्रपटांना ‘ब्लू फिल्म’ म्हटले जाऊ लागले.


ज्या चित्रपटगृहात ह्या ‘ब्लू फिल्म्स’ दाखवल्या जायच्या तिथे लावण्यात आलेले पोस्टर्स हे नेहेमी ब्लू कलरचे असतात. असे करण्यामागे कारण म्हणजे, ब्लू म्हणजेच निळा रंग हा लोकांना स्वतःकडे आकर्षून घेतो. ह्या कारणामुळे देखील ह्या चित्रपटांना ‘ब्लू फिल्म्स’ म्हटल्या जाऊ लागले.

 

porn-blue-films-inmarathi04
aajkafunda.com

आधीच्या काळी जेव्हा इंटरनेट, स्मार्टफोन्स नव्हते तेव्हा वीसीआरचा ट्रेंड होता. ज्यामध्ये डीव्हीडी लावून चित्रपट बघितले जायचे. तेव्हा इतर चित्रपटांच्या डीव्हीडीला एका प्लास्टिकच्या रॅपरमध्ये बंद करून ठेवण्यात यायचे. तर ह्या पॉर्न चित्रपटांच्या डीव्हीडीचे वेगळे रॅपर असायचे. ते निळ्या रंगाचे असायचे.

त्या निळ्या रंगाच्या पॉलीथीन मध्येच दिल्या जात असत. जेणेकरून डीव्हीडींची अदलाबदल होऊ नये. म्हणून ह्या चित्रपटांना ‘ब्लू फिल्म’ म्हटल्या जाऊ लागले.

 

porn-blue-films-inmarathi02
thehook.news

ह्या चित्रपटांना ब्लू फिल्म हे नाव का मिळालं असावं ह्याचं अचूक कारण ‘ब्लू लॉ’ हे असू शकतं. जवळपास एका शतकाआधी पश्चिमी देशांत ‘ब्लू लॉ’ हा एक धार्मिक कायदा होता. चर्चच्या आदेशानुसार रविवारी काही विशेष गोष्टींवर बंदी घालण्यात आली होती.

 

porn-blue-films-inmarathi03
khabridost.in

ज्यानुसार काही विशिष्ट वस्तूंचा व्यापार, नाच-गाणे तसेच ती सर्व कामे जी चर्चशी संबंधित नाही, अश्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते, त्यामुळे आपल्या देशात देखील हे लादण्यात आले होते.

ह्या नियमानुसार जे कुठले काम वर्जित होते त्याला ब्लू अॅक्टीव्हिटी म्हटले जायचे. पॉर्नोग्राफी पण वर्जित होती. त्यामुळे कदाचित ह्या चित्रपटांना ब्लू फिल्म्स म्हटल्या जाऊ लागले.

 


porn-blue-films-inmarathi05
thehook.news

तर आता तुम्हाला कळाले असणारच की ह्या पॉर्न चित्रपटांना आपल्याकडे ‘ब्लू फिल्म्स’ का म्हटले  जाते…

===

हे पण वाचा:

सेक्समधील परमोच्च सुखाला मुकण्यास भाग पाडणारा – लैंगिक दुय्यमतेचा भाव

स्त्रीला प्रचंड शारीरिक सुख देणारा सेक्स चॅम्पियन व्हायचंय? बस्स फक्त ह्या ८ गोष्टी करा!

‘सेक्स थेरेपिस्ट’ना सर्वात जास्त वेळा विचारले गेलेले हे प्रश्न तुम्हालाही पडतात का?


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
2 thoughts on “आपल्याकडे पॉर्न मुव्हीजला “ब्लू फिल्म्स” का म्हणत असतील?

 • February 14, 2018 at 8:06 am
  Permalink

  There is no censorship for blue films ! They are releasing as films original blue print. In other words film project blue print executive without cut. It’s blue print.
  And for us it’s blue film ,

  Reply
  • February 14, 2018 at 8:08 am
   Permalink

   Executive to execute pls change

   Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?