आपल्याकडे प्रत्येक चित्रपट शुक्रवारीच का रिलीज होतो?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शुक्रवार म्हटलं की या दिवशी हमखास किमान एक तरी चित्रपट रिलीज होणार हे मात्र नक्की ! तुम्हाला देखील कधीतरी प्रश्न पडला असेल की आठवड्यातील इतर वार सोडून केवळ शुक्रवारीचं चित्रपट का रिलीज होतात? इतर दिवशी यांचं काय एवढं नुकसान होतं? रविवार सारखा सुट्टीचा दिवस पडलेला असताना अगदी आठवड्याच्या मधलाच सुट्टी नसलेला दिवस चित्रपट रिलीज करण्यासाठी का बरं निवडला जातो?

तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही तुमच्यासमोर उलगडत आहोत.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza01

स्रोत

अनेक लोकांना हे वाटते की शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची प्रथा ही हॉलीवूड मधून आली आहे.

१५ डिसेंबर १९३९ रोजी हॉलीवूडची प्रसिद्ध फिल्म ’Gone With The Wind’ रिलीज झाली होती आणि त्या दिवशी होता शुक्रवार ! आणि तेव्हापासून हॉलीवूडमध्ये प्रत्येक फिल्म शुक्रवारीचं रिलीज करण्याचा पायंडा पडला. परंतु फिल्मचा प्रीमियर मात्र एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी होतो.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza02

स्रोत

भारतीय सिनेसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा ‘नील कमल’ हा चित्रपट सोमवार दिनांक २४ मार्च १९४७ रोजी रिलीज करण्यात आला होता. मात्र भारतात चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची प्रथा १९५० सालच्या शेवटी सुरु झाली.

क्लासिक चित्रपट मुगल-ए-आजम ५ ऑगस्ट १९६० रोजी शुक्रवारी रिलीज झाला. त्या चित्रपटाला मिळालेलं भरघोस यश पाहता इतर निर्मात्यांनी देखील आपले चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्यास सुरुवात केली आणि इथून सुरु झाली प्रत्येक चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची प्रथा!

 

why-movie-releases-on-friday-marathipizza03

स्रोत

या शिवाय चित्रपट निर्मात्यांची यामागे एक श्रद्धा देखील आहे. शुक्रवार म्हणजे लक्ष्मीचा दिवस. या दिवशी चित्रपट रिलीज केल्यास लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांचा चित्रपट भरघोस कमाई करेल असे ते मानतात.

इतकंच नाही तर चित्रपटाची शुटींग सुरु करण्याचा मुहूर्त देखील शुक्रवार बघूनच निश्चित केला जातो, जेणेकरून चित्रपटाचं शुटींग निर्विघ्नपणे पार पडावं आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करावी.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza04

स्रोत

तसेच यामागे एक व्यावसायिक कारण देखील आहे की मल्टीप्लेक्समध्ये फिल्म स्क्रीनिंगची फी शुक्रवार वगळता इतर दिवशी जास्त असते. त्यामुळे साहजिक आपला व्यावसायिक फायदा लक्षात घेऊन चित्रपट निर्माते शुक्रवारीचं चित्रपट रिलीज करतात.

 

why-movie-releases-on-friday-marathipizza05

स्रोत

भले हे निर्माते स्वत:च्या फायद्यासाठी चित्रपट शुक्रवारी रिलीज करत असतील, पण शेवटी फायदा मात्र त्याच निर्मात्याला होतो ज्याचा चित्रपट बघायला आपण लोक गर्दी करतो !!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c)  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?