' कपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते? जाणून घ्या.. – InMarathi

कपडे ओलसर राहिले तर त्यांना दुर्गंधी का येते? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पावसाळा हा आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. त्यापैकीच एक मोठी समस्या म्हणजे कपडे नीट न सुकल्याने त्यातून येणारी दुर्गंधी. ह्याने आपण सर्वच त्रस्त असतो. आपण स्वच्छ राहावे म्हणून आपण अंघोळ करतो, तसेच आपले कपडे देखील स्वच्छ राहावेआपण कपडे धुतो. हा कपडे धुण्यामागील एक साधे कारण असते.

पण पावसाळ्यात वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात ओलावा असतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी देखील कपडे पूर्णपणे सुकल्या जात नाही. त्यामुळे त्यांची म्हणून दुर्गंधी येऊ लागते.

 

stinky-clothes-inmarathi01
thriftyfun.com

पण ह्या ओलसर कपड्यांना दुर्गंधी का येते. आपण तर कपडे धुतांना कपड्यांची साबण, नानाप्रकारचे डिटर्जंट वापरतो तरी देखील आपल्या कपड्यांना ही दुर्गंधी हा येत असेल? ह्यामागील कारण आज आपण उलगडणार आहोत.

दिवसभर जे कपडे आपण घालतो त्यांच्यातून देखील दुर्गंधी येते आणि ह्याचं कारण म्हणजे आपल्याला येणारा घाम. दुर्गंधीच सर्वात मोठं कारण हे म्हणजे बॅक्टेरिया.

बॅक्टेरिया घामासोबत आणि त्वचेसोबत रिअॅक्ट होतात, त्यातून काही असे कम्पाऊंड तयार होतात ज्यामुळे दुर्गंधी येते. हे कम्पाऊंड आपल्या कपड्यांवर देखील लागतात ज्यामुळे कपड्यांची देखील दुर्गंधी येऊ लागते.

 

stinky-clothes-inmarathi05
neverhomemaker.com

ओलसर कपडे ह्या बॅक्टेरियाज ला वाढण्यासाठी हवं असलेलं वातावरण देतात. त्यामुळे त्यांची वाढ होत जाते आणि त्यासोबतच कपड्यांची दुर्गंधी देखील वाढू लागते. पण जेव्हा आपण कपडे धुतो तेव्हा हे बॅक्टेरियाज नष्ट होतात. कारण अश्या कंडीशनमध्ये बॅक्टेरियाजची वाढ होत नाही. पण हे वातावरण बुरशीसाठी अगदी सहज असते.

त्यामुळे ओलसर कपड्यांमधून जी दुर्गंधी येते त्याचं कारण बॅक्टेरिया नसून बुरशी हे असते, ज्याला mildew असे म्हणतात.

 

stinky-clothes-inmarathi
experiencelife.com

ह्याचं बुरशीतून ती दुर्गंधी येते, आणि ही बुरशी खाते, वाढते आणि त्याचे प्रमाण वाढत जाते, त्यातून मग काही असे कम्पाऊंड बाहेर पडतात ज्यातून ही दुर्गंधी पसरते. Mildew ही बुरशी कपडे, चामडे आणि कागद ह्यांना देखील लागू शकते. पण ही बुरशी तेव्हाच लागते जेव्हा कपड्यांमध्ये किंवा चामड्यामध्ये ओलावा असेल. ओलाव्या व्यतिरिक्त ही कमी कमी तापमानात जास्त वाढते. म्हणूनच जेव्हा आपण कपडे थंड पाण्याने धुतो त्यांना दुर्गंधी येते.

ह्या दुर्गंधीपासून सुटका मिळविण्याचे काही उपाय :

 

stinky-clothes-inmarathi04
wikihow.it

सर्वात आधी नेहमी हे लक्षात ठेवा की कधीही जराही ओलावा असलेले कपडे कपाटात घडी करून ठेवू नये. कारण कमी तापमानात ह्या ओलाव्यामुळे कपड्यांमधील दुर्गंधी आणखी वाढते.

कपडे धुतांना त्यांना असा ओलाव्यामुळे दुर्गंधी लागू नये म्हणून कपडे धुतांना पाण्यात जरासा विनेगर घालावा. तसेच कपड्यांचे कंडीशनर वापरावे त्याने कपड्यांची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.

 

stinky-clothes-inmarathi02
rd.com

जर शक्य असेल तर कपडे गरम पाण्याने धुवा. जेणेकरून त्याला बुरशी लगण्याची शक्यता कमी होईल. तसेच गरम पाण्याने कपडे धुण्याचे अनेक फायदे देखील आहेस, जसे की, ह्यामुळे किटाणू आणि बुरशी दोन्ही नष्ट होतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?