शर्टची बटणे स्त्रियांची डाव्या आणि पुरुषांची उजव्या बाजूला का असतात ?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्याच्या काळामध्ये मुलगा आणि मुलगी यांमध्ये बरेच साम्य निर्माण झाले आहे. मग ते काही वेगळे करण्यामध्ये असो किंवा कपड्याच्या फॅशनमध्ये असो. आताची तरुणपिढी सारख्याच स्टाईलचे कपडे वापरतात. कपड्यांमध्ये आजकाल शर्टची खूप क्रेज वाढली आहे. शर्ट घालणे हे कधीही सोईस्कर असते. तुम्ही शर्ट ऑफिसमध्ये, कॉलेजला जाताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाताना वापरू शकता आणि कोणत्याही पॅन्टवर किंवा जीन्सवर शर्ट हा खूप चांगला दिसतो. त्यामुळे तरुणांना शर्ट वापरणे खूप पसंत आहे. पण तुम्ही कधी शर्टाची बटणे बघितली आहेत का, ती बटणे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शर्टमध्ये वेगवेगळ्या बाजूला असतात. यामध्ये स्त्रियांच्या शर्टची बटणे ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला असतात. तुम्ही देखील ही गोष्ट पाहिली असल्यास तुमच्यादेखील ही गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल आणि तुम्हालाही असा फरक का असतो असा प्रश्न पडला असेल. चला तर मग यामागे नक्की काय कारण आहे, ते जाणून घेऊया.

Men and Women shirt button.marathipizza
boldsky.com

यामागचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला फ्रांसच्या इतिहासात डोकावं लागेल. नेपोलियनला आपला उजवा हात शर्टमध्ये टाकून वावरण्याची सवय होती. काही काळाने फ्रांसमधील स्त्रियांनी त्याचे अनुकरण करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुद्धा एक हात आपल्या शर्टमध्ये टाकून वावरणे सुरू केले. त्यामुळे नेपोलियन आदेश दिला की, सर्व स्त्रियांनी शर्टच्या उलट्या बाजूला बटणे लावावीत. नेपोलियनच्या या आदेशाचे कडेकोट पालन करण्यात आले.

Men and Women shirt button.marathipizza1
ninjanews.it

जुन्या काळामध्ये श्रीमंत स्त्रियांना त्यांच्या दासी कपडे घालत असत, त्या स्वतः कोणतेही कपडे घालत नसत, त्यामुळे उजव्या हाताने काम करणाऱ्या नोकर माणसांसाठी सोप्पे व्हावे यासाठी ही बटणे डाव्या बाजूला लावण्यात येत असत. त्याचप्रमाणे त्या काळातील पुरुष मंडळी स्वतःचे वस्त्र स्वतःच परिधान करत असत म्हणून त्यांच्या शर्टची बटणे उजव्या बाजूला लावली जात असत.

Men and Women shirt button.marathipizza2
timesofindia.indiatimes

पुरुष घोडेस्वारी करत असताना डाव्या बाजूला तलवार ठेवत असत, त्यामुळे त्यांना उजव्या बाजूला बटणे असणे सोईस्कर होत असे. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या शर्टची बटणे डाव्या बाजूला असल्याने घोडेस्वारी करताना त्यांच्या कपड्यामध्ये हवा जात नसे.

त्याचप्रमाणे आता वापरण्यात येणाऱ्या शर्टमध्ये देखील अशीच बटणांची मांडणी करण्यात आलेली आहे. हे स्त्री आणि पुरुषांना एक वेगळे स्वतःचे महत्त्व निर्माण करून देते. ही बटणांची रचना दिसण्यासाठी सुद्धा खूप चांगली दिसते आणि ती लोकांना पसंत सुद्धा पडते. स्त्री आणि पुरुषांच्या सोयीसाठीच अशी मांडणी करण्यात आली आहे आणि नेपोलियनने दिलेल्या आदेशामुळेच ती प्रसिद्ध झाली होती आणि आजही प्रसिद्ध आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?