दरवर्षी मकरसंक्रात १४ किंवा १५ जानेवारीलाच का येते ? ह्यादिवशी पतंग का उडवतात? – जाणून घ्या त्याची रंजक कारणं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मकरसंक्रांत ! इंग्रजी वर्षाच्याऐन सुरुवातीला येणारा सण.

वर्षभरात सणांची मांदियाळी असली तरी त्याचा शुभारंभ संक्रांतीपासून होतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नव्या वर्षाचं कॅलेंडर उघडलं की यंदाची संक्रांत कोणत्या दिवशी येते हे पाहंण उत्सुकतेचं ठरतं. कारण 14 जानेवारी म्हणजे संक्रांत हा अनेकांचा समज काही वर्षी चुकीचा ठरतो,

आता आजचं उदाहरण बघा ना?

पतंगबाजी, गुळपोळी यांच्यासाठी प्रसिद्ध असणारा सण नव्या वर्षाचे जंगी स्वागत करतो.

विशेष म्हणजे वर्षभरातील इतर सर्व भारतीय सण पहा. इंग्रजी दिनदर्शिकेतील त्यांच्या तारखा हिंदू दिनदर्शिकेच्या संदर्भाने दरवर्षी बदलेल्या असतात. पण मकरसंक्रांतीच्या तारखेत मात्र फारसा बदल होत नाही.. हे जरा कोड्यात टाकणारं आहे.

संक्रांतीच्या तारखेबाबत असलेल्या या कोड्यावर केवळ चर्चा करण्यापेक्षा त्यामागचं कारण जाणून घेऊयात.

आणि त्याचबरोबर पाहूयात – मकर संक्रांतीच्या बाबतीत काही माहित नसणाऱ्या काही रंजक गोष्टी…

 

makar-sankranti-inmarathi
khabarindiatv.com

मकर संक्रांत १४ जानेवारीलाच का येते?

सर्व हिंदू सण लुनार दिनदर्शिका म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येतात. पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते. संक्रांतीचे तसे नाही.

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका (सोलर कॅलेंडर) म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकाच असतो.

 

zodiac-calender-big-image-inmarathi
indiatimes.in

 

तो दिवस म्हणजे १ जानेवारी.

पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही, दार आठ वर्षांतून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दिवसाने पुढे ढकलला जातोय. म्हणजे काही वर्षी संक्रांती १५ तारखेला येते.

याचाच अर्थ आजचा दिवसही मोजक्या खास दिवसांपैकी एक आहे. सुर्याच्या गतीनुसार यंदाही आपण 15 जानेवारीला संक्रांत साजरी करतोय.

याचंच आणखी एक रंजक उदाहरण म्हणजे,

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण २०५० पासून मकरसंक्रांती दरवर्षी १५ तारखेला येईल.

मकरसंक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र यांची वेळ सारखी असते.

मकरसंक्रांतीच्या आधीचा काल म्हणजे हिवाळा, आणि नंतरचा म्हणजे उन्हाळा. हिवाळ्यात दिवस लहान होतो आणि उन्हाळ्यात तो मोठा होतो असे आपण बरेचदा ऐकले असेल.

असे का होते? याचे कारण म्हणजे या दिवशी आधी चालू असलेल्या दक्षिनायानातून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो.

 

uttarayan_and_dakshianayan_inmarathi
bp.blogspot.com

 

आणि प्रवेश करतेवेळी म्हणजे १४ जानेवारी या दिवशी तो बरोबर विषुववृत्तावर असतो. इथून पुढे तो हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. म्हणून या दिवशी  रात्र आणि दिवस यांच्या वेळा एकसारख्या असतात.

मकरसंक्रांतीची भारतात कितीतरी नावे आहेत.

भारतात सांस्कृतिक विविधता अनन्यसाधारण आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक निकषानुसार, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार सण साजरे केले जातात. मकरसंक्रांती या एकाच दिवशी भारतभरात साजरा होणाऱ्या सणाची प्रत्येक ठिकाणी वेगळी नावे आहेत.

 

pongal_inmarathi
pinimg.com

 

दक्षिणेत हाच दिवस ‘पोंगल’ या नावाने साजरा करतात. तर उत्तर भारतात यालाच ‘लोहरी’ असं नाव आहे्. उत्तरायण, माघी, खिचडी अशी विविध नावे अनेक भागात आहेत.

मकरसंक्रांतीला पतंग का उडवला जातो?

पतंग उडवायला, प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापायला आवडतो का ?

पण पतंगाच्या या स्पर्धेत उतरण्यापुर्वी याच सणाला नेमका पतंग का उडविला जातो याचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे..

जुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा.

सूर्याची कोवळी किरणे म्हणजे ड जीवनसत्वाचा स्त्रोत! पतंग उडवताना सण साजरा करत आरोग्य राखले जावे म्हणून ही पद्धत आहे.

 

makar-sankranti-kite-inmarathi
indiatimes.in

 

हिवाळ्याच्या गार हवेत त्वचेला अनेक इन्फेक्शन्स होतात. हे विषाणू सूर्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या उष्णतेमुळे जास्त काल जगू शकत नाहीत. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.

तर पतंग उडवा आणि फीट रहा…

नवीन वर्षाची सुरुवात गोड बोलून करायला शिकवणारा आणि एकतेचा संदेश देणारा असा हा भारतीय सण.

इन मराठी टीमच्या वतीने आमच्या तमाम वाचकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?