मकरसंक्रांत दरवर्षी १४ जानेवारीलाच का येते? ह्यादिवशी पतंग का उडवतात? – जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

मकरसंक्रांती! इंग्रजी वर्षाच्याऐन सुरुवातीला येणारा सण. आणि तोही न चुकता १४ जानेवारी किना एखाद्या वर्षी क्वचितच १५ जानेवारीला. पतंगबाजी, गुळपोळी यांच्यासाठी प्रसिद्ध असणारा सण. विशेष म्हणजे वर्षभरातील इतर सर्व भारतीय सण पहा. इंग्रजी दिनदर्शिकेतील त्यांच्या तारखा हिंदू दिनदर्शिकेच्या संदर्भाने दरवर्षी बदलेल्या असतात. पण मकरसंक्रांतीची तारीख बदलत नाही. हे जरा कोड्यात टाकणारं आहे.

काय आहे या गोष्टीमागचे कारण?

जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर पाहूयात – मकर संक्रांतीच्या बाबतीत काही माहित नसणाऱ्या इंट्रेस्टिंग गोष्टी…!

 

makar-sankranti-inmarathi
khabarindiatv.com


मकर संक्रांत १४ जानेवारीलाच का येते?

सर्व हिंदू सण लुनार दिनदर्शिका म्हणजेच चंद्राच्या गतीवर अवलंबून असणाऱ्या दिनदर्शिकेनुसार येतात. पण चंद्राच्या अनियमित गतीमुळे त्यांची इंग्रजी वर्षातील तारीख सातत्याने बदलत असते. संक्रांतीचे तसे नाही.

मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा मकर राशीत प्रवेश. सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस सूर्य दिनदर्शिका (सोलर कॅलेंडर) म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेत प्रत्येक वर्षी एकाच असतो.

 

zodiac-calender-big-image-inmarathi
indiatimes.in

तो दिवस म्हणजे १ जानेवारी. पण यातील आणखी एक रंजक गोष्ट ही, दार आठ वर्षांतून एकदा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस एका दिवसाने पुढे ढकलला जातोय. म्हणजे काही वर्षी संक्रांती १५ तारखेला येते.

शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, साधारण २०५० पासून मकरसंक्रांती दरवर्षी १५ तारखेला येईल.

मकरसंक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र यांची वेळ सारखी असते.

मकरसंक्रांतीच्या आधीचा काल म्हणजे हिवाळा, आणि नंतरचा म्हणजे उन्हाळा. हिवाळ्यात दिवस लहान होतो आणि उन्हाळ्यात तो मोठा होतो असे आपण बरेचदा ऐकले असेल. असे का होते? याचे कारण म्हणजे या दिवशी आधी चालू असलेल्या दक्षिनायानातून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो.

 

uttarayan_and_dakshianayan_inmarathi
bp.blogspot.com

आणि प्रवेश करतेवेळी म्हणजे १४ जानेवारी या दिवशी तो बरोबर विषुववृत्तावर असतो. इथून पुढे तो हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. म्हणून या दिवशी  रात्र आणि दिवस यांच्या वेळा एकसारख्या असतात.

मकरसंक्रांतीची भारतात कितीतरी नावे आहेत.

भारतात सांस्कृतिक विविधता अनन्यसाधारण आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक निकषानुसार, तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार सण साजरे केले जातात. मकरसंक्रांती या एकाच दिवशी भारतभरात साजरा होणाऱ्या सणाची प्रत्येक ठिकाणी वेगळी नावे आहेत.

 

pongal_inmarathi
pinimg.com

दक्षिणेत हाच दिवस ‘पोंगल’ या नावाने साजरा करतात. तर उत्तर भारतात यालाच ‘लोहरी’ असे नाव आहे. उत्तरायण, माघी, खिचडी अशी विविध नावे अनेक भागात आहेत.

मकरसंक्रांतीला पतंग का उडवला जातो?

मकर संक्रांतीला पतंग उडवण्यामागे एक रंजक कारण आहे.

जुन्या काळी सकाळच्या वेळी अंघोळ वगैरे करून पतंग उडवण्याची पद्धत होती. जेणेकरून त्वचेशी कोवळ्या सूर्यकिरणांचा संपर्क यावा. सूर्याची कोवळी किरणे म्हणजे ड जीवनसत्वाचा स्त्रोत! पतंग उडवताना सण साजरा करत आरोग्य राखले जावे म्हणून ही पद्धत आहे.

 

makar-sankranti-kite-inmarathi
indiatimes.in

हिवाळ्याच्या गार हवेत त्वचेला अनेक इन्फेक्शन्स होतात. हे विषाणू सूर्याच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या उष्णतेमुळे जास्त काल जगू शकत नाहीत. मकरसंक्रांतीला पतंग उडवण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे.

नवीन वर्षाची सुरुवात गोड बोलून करायला शिकवणारा आणि एकतेचा संदेश देणारा असा हा भारतीय सण. इन मराठी टीमच्या वतीने आमच्या तमाम वाचकांना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *