धोनीच्या अंगावर एकही टॅटू का नाही? उत्तर ऐकून तुम्हाला देखील हसू येईल!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजकाल टॅटू अंगावर गोंदवून घेणं म्हणजे फॅशन आहे. त्याला आपले भारतीय खेळाडूही अपवाद नाहीत. विराट कोहलीकडे पहा त्याच्या अंगावर तर भरमसाठ टॅटू असल्याचे दिसून येतात.

ViratKohli-marathipizza
mid-day.com

पण दुसरीकडे त्याच्यापेक्षा किंवा काही जास्त प्रसिद्ध असलेला माझी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या अंगावर मात्र कुठेच टॅटू दिसत नाही. कॅप्टन कुल धोनी ने क्रिकेटच्या मैदानात पाउल ठेवल्यापासून अवघ्या भारतीय क्रिकेटविश्वाला आपलं वेड लावलं आहे. आज संपूर्ण जगामध्ये असा भारतीय माणूस सापडणे कठीण ज्याला महेंद्रसिंग धोनी माहित नसेल.


ms-dhoni-marathipizza
more-sky.com

तुम्हालाही माहित असले कि सगळ्यांच्या गळ्याचा ताईत असणाऱ्या या खेळाडूच्या अंगावर एकही टॅटू नाही. धोनीच्या निस्सीम चाहत्यांनी आजवर अनेकवेळा आपल्या शरीरावर धोनीचे टॅटू गोंदवून त्याच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. पण धोनीने मात्र आजवर कधीही आपल्या अंगावर साधा ठिपका ही गोंदवलेला नाही आता तुम्हाला ही उत्सुकता असेलच की असे का? तर आज याचंच उत्तर आम्ही तुम्हाला देत आहोत.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, काहीसं हसू देखील येईल पण हे खुद्द धोनीने मान्य केलंय की त्याला सुई अंगात टोचवून घेण्याची फार भीती वाटते. अगदी लहानपणापासून हि भीती त्याच्या मनात घर करून बसली आहे. ही सुई डॉक्टरच्या हातात असो वा टॅटू आर्टिस्टच्या हातात असो, त्याला अंगात ती टोचवून घेणे फार भीतीदायक वाटते.

ms-dhoni-marathipizza01
zeenews.india.com

मैदानात भल्या भल्या बोलर्सच्या वेगवान चेंडूला सहज फटकावणारा किंवा विकेटच्या मागे उभे राहून वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या चेंडूला अडवणाऱ्या धोनीचं धैर्य मात्र सुई पाहिल्यावर कुठल्या कुठे पळून जातं.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?