महादेव वाघाचं कातडं का परिधान करतात? शिवपुराणातील एक रोचक कथा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

उद्या महाशिवरात्री… संपूर्ण विश्वाचे कर्ता-धर्ता, सर्वशक्तिमान, ब्रम्हांडाचे रचेता शिवशंकर, भोलेनाथ, महादेव ह्यांची मनोभावे आराधना करण्याचा दिवस. तसे तर महादेवाची आराधना रोजच केली जाते, पण महाशिवरात्री हा महादेवाचा विशेष दिवस असतो. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो.

शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

 

mahadev-inmarathi01
lokmatnews.in

संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मियांचा हा एक महत्वाचा सण आहे. ज्यादिवशी ते आपल्या महादेवाची मनोभावे पूजा करतात.

 

mahadev-inmarathi03
whoa.in

महादेव हे इतर देवांपेक्षा खूप वेगळे आहेत. त्यांना नाही सुरवात आहे नाही अंत, ते अनादी-अनंत असे आहेत. इतर देव हे स्वर्गात वास करतात, तर शिव हे हिमालयातील बर्फाच्या पहाडांमध्ये राहतात. हातात त्रिशूल, गळ्यात साप, डोक्यावर गंगा आणि अंगात वाघाचं कातड… अशी आहे शिवाची वेशभूषा.

 

mahadev-inmarathi07
itsevalicious.com

पण तुम्ही कधी विचार केला आहे की, महादेव हे नेहेमी वाघाचं कातड का घालत असतील. तर ह्यामागे देखील एक कहाणी आहे.

शिव पुराणानुसार एकदा महादेव दाट जंगलात नग्न अवस्थेत भटकत होते. फिरता फिरता ते जंगलात वसलेल्या एका गावात जाऊन पोहोचले. त्यांना असं नग्न अवस्थेत बघून गावातील सर्व स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागल्या. पण शंकरजी तर आहेतच भोळे. त्यांना ही गोष्ट कळाली नाही आणि ते गावात तसेच फिरत राहिले.

 

mahadev-inmarathi02
m4marathi.com

त्यांची अशी वागणूक त्या गावातील साधू-संतांना पटली नाही, ते शिवजी वर संतापले आणि त्यांनी शंकरजीला धडा शिकविण्याचा निश्चय केला. त्यांनी महादेवाच्या रस्त्यात एक खड्डा खणला, चालता चालता शिवजी त्यात पडले, त्यानंतर साधूंनी त्या खड्ड्यात एक वाघ सोडला. पण त्यांना नव्हते माहित की आपण ज्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांनीच ह्या सृष्टीचे निर्माण केले आहे. महादेवांनी काही क्षणातच त्या वाघाला मारले नी त्याचे कातडे परिधान केले.

 

mahadev-inmarathi
lokmatnews.in

शिवजीचे हे रूप बघून त्या साधू-संतांना कळून चुकले होते की आपण ज्या मान्युष्याला मारण्याचा प्रयत्न करत होतो. तो कुठला साधारण मनुष्य नसून साक्षात भगवान शिवशंकर आहे.

 

mahadev-inmarathi04
itsevalicious.com

वाघाच्या कातडीला अश्या प्रकारे परिधान करणे हे विजयाचे प्रतिक बनले आणि ते नेहमी करिता आपल्या शंकरजीसोबत जुळले.

महादेव, शिवशंकर ह्यांच्या संबंधी शिवपुराणात अनेक कथा-कहाण्या आहेत. त्यापैकीच ही एक…

इनमराठीच्या सर्व वाचकांना “महाशिवरात्री”च्या हार्दिक शुभेच्छा…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?