भारतीय सेलिब्रिटी कॅन्सरच्या आणि इतर आजारांच्या उपचारासाठी परदेशीच का जातात? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


भारतातील प्रसिद्धी माध्यमांना नेहमी पडला पाहिजे असा प्रश्न म्हणजे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती कॅन्सरवरील उपचारांसाठी नेहमी परदेशीच का जातात? असं काय आहे जे भारतात नाही पण परदेशात सापडतं. आज आपण म्हणतो की तंत्रज्ञानामुळे भारत पुढे गेला.

अनेक प्रकारचे तंत्रज्ञान भारतात उपलब्ध आहे, विकसित केलं जातंय. भारतातील इस्रो ही संस्था जागतिक उच्चांक मोडत अनेक प्रकारचे विश्वविक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे.

त्याकडे वाटचाल करताना दिसत आहे भारताचे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प तंत्रज्ञानाच्या बाबतीत विकसित होत आहेत. एवढे सगळे असताना अशी काय वेळ भारतातील प्रसिद्ध व्यक्तींवर येते की कॅन्सर झाल्यानंतर त्यांना परदेशच आठवतो.

उदाहरणच जर बघायचे झाले तर पहिलं उदाहरण आहे प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग! ज्यावेळी त्याला कॅन्सरचं निदान करण्यात आलं त्यावेळी तो अमेरिकेत गेला.

 

yuvraj-inmarathi
facenfacts.com

त्याच्या आईने सांगितलं की भारतातील डॉक्टरांनी चुकीचे डायग्नोसिस केलं.

दुसर सर्वश्रुत उदाहरण म्हणजे जेव्हा राज कपूरची कन्या रितू नंदा हिला कॅन्सर झाला तेव्हा राज कपूर साहेबांनाही अमेरिकाच कशी अाठवली.

भारतातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती अनेक प्रकारच्या उपचारांसाठी परदेशात जातात. एवढं का सोयीस्कर वाटतं परदेशात जाणे.


अगदी सोनिया गांधी याही मध्यंतरी उपचारासाठी परदेशात गेल्या आहेत असं सांगण्यात आल. याबाबतीत भारतातील काही अग्रणी आणि प्रसिद्ध डॉक्टरांशी संवाद साधला असता त्यांचं याबाबतीत असलेल मत आपण खाली बघुयात.

भारतातीलच नव्हे तर जगातील अग्रणीचे कॅन्सर सर्जन डॉक्टर आर. बिडवे टाटा मेमोरिअल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर.. यावर ते म्हणाले की

“आम्ही भारतात त्या सर्व उपचार पद्धती अवलंबतो आहोत ज्या परदेशात वापरल्या जातात. आणी आज भारतातही अनेक प्रगत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे”.

डॉक्टर आशिष बक्षी जे एक प्रसिद्ध अपलॉजईस्ट आहेत त्यांनीही याचा पुनरुच्चार केला की

“भारतात त्याच सोयीसुविधा उपलब्ध आहेत ज्या सोयीसुविधा अमेरिकेत किंवा इतर परदेशात उपलब्ध आहेत.”

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांना २००४ मध्ये अॅक्युट लेऊकेमिया या आजाराचे निदान करण्यात आले होते, त्यांना असं सांगण्यात आलं होतं की त्यांच्याकडे फक्त दोनच महिने शिल्लक आहेत.

 

anurag-basu-inmarathi
india.com

त्यांनी संघर्ष करायचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी भारतातच यशस्वीपणे या आजाराशी संघर्ष केला. भारतात अशी अनेक यशस्वी उदाहरणे बघायला मिळु शकतात.

तसं पहायला गेलं तर परदेशातील ट्रीटमेंट आणि भारतातील ट्रीटमेंट यामध्ये खर्चिक फरक नक्कीच आहे. परदेशात जाऊन कॅन्सरचा उपचार घेणे हे भारतापेक्षा दहापट अधिक खर्चिक असू शकते.

परदेशामध्ये उपचार घेणे हे भारतीयासाठी कदाचित कमी सोयीस्कर ठरू शकते कारण ओळख आणि संघर्ष करण्यासाठी आपल्या परिवाराच्या लागणारा पाठिंबा या दोन गोष्टी पीडित व्यक्ती साठी अमृताचं काम करत असतात.

सध्याच्या काळात जग एवढे पुढे गेले, ग्लोबलाईज झाले आहे की जर एखादे औषध परदेशांमध्ये मध्ये लॉन्च झाले तर ते त्याच वेळेस भारतासह इतरही देशांमध्ये उपलब्ध असते.

क्वचित वेळा त्यामध्ये फक्त तीन महिन्यांचा अवधी असू शकतो. एवढे सगळे असतानाही उपचारासाठी परदेशातच का त्याचं कारण असू शकतं एक म्हणजे भारतीय मानसिकता आणि दुसरे म्हणजे गोपनीयता.

 

irfan-khan-inmarathi
clicked.com

आपल्याकडील प्रसिद्ध व्यक्तींचे आयुष्य एवढं सामाजिक होऊन जातं की त्यांची छोटीशी कृती पण प्रसिद्धीमाध्यमांना ब्रेकिंग न्यूज वाटायला लागते आणि याच भीतीतून आपलं कॅन्सरचं दुखणे जगापुढे येऊ नये यासाठी कदाचित भारतीय प्रसिद्ध व्यक्ती या परदेशातून उपचार घेत असावेत.

तसं बघायला गेलं तर भारतात डॉक्टर आणि पेशंट यांच्या प्रमाणाची तुलनात्मक चिकित्सा जर केली तर आपल्याकडे असे लक्षात येईल की भारतात हे प्रमाण अत्यंत कमी आहे.

कॅन्सर पेशंट्स ची संख्या भरपूर आहे आणि ती प्रत्येक वर्षाला वाढत आहे. असं असताना कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची जबाबदारी आणि गरज हे दोन्ही घटक त्या प्रमाणात वाढताना दिसत नाहीयेत.

ज्या प्रमाणात भारतात कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत, कदाचित या घटकाचाही परिणाम आपण म्हणू शकतो ज्यामुळे भारतातील पेशंट बाहेर परदेशात जाऊन कॅन्सरवर उपचार घेत आहेत.

तसं पाहिलं गेलं तर भारतापेक्षा परदेशात कॅन्सर हा जास्त प्रमाणात आढळतो आणि त्यामुळे कदाचित तेथील डॉक्टरांना कॅन्सरवर उपचार करण्याचे हातखंडे चांगल्या प्रमाणात माहिती झालेले असू शकतात.

 

chemotherapy-inmarathi02
cancer.gov

एका सर्वेक्षणात असे लक्षात आले आहे की परदेशात नवनवीन प्रकारचे उपक्रम आणि प्रात्यक्षिक राबवले जातात जेणेकरून कॅन्सरवरील उपचारासाठी मदत होईल आणि उपचार जलदरित्या होतील.

हे सर्व घटक परत परत एकच गोष्ट अधोरेखित करतात ती म्हणजे गोपनीयता आणि भारतात कॅन्सर बद्दल असणाऱ्या गैरसमजामुळे भारतातील प्रसिद्ध व्यक्ती हे कॅन्सरवरील उपचारासाठी परदेशात जातात.


पण खरंच भारतातील सामान्य व्यक्तीला परदेशात जाऊन तिथे राहून उपचार घेणे खरंच शक्य होईल का हा प्रश्न प्रत्येक सामान्य भारतीय व्यक्तीच्या मनात एकदा तरी डोकावून गेलास असेलच की?

खरं म्हनजे वास्तविकता पाहता सामान्य व्यक्तीच्या आवाक्यात न येणारा असाच हा खर्च आहे.

आताच्या काळात मेडिकल टुरिझमकडे व्यापक अर्थाने वाढणारा उद्योग म्हणूनही बघण्यात येत आहे. भारतातही वैद्यकीय मदतीची कमी नाहीये. भारत खऱ्या अर्थाने वैद्यकीय उपलब्ध उपचारांचे केंद्र बनत चाललेला आहे.

 

medicaltourism_Pakistan_inmarathi
tribune.com.pk

आज भारतात कितीही किचकट शस्त्रक्रिया लीलया केली जाते, याउलट परदेशातूनच काही परदेशी नागरिक भारतात उपचारासाठी येताना दिसतात पण भारतीय प्रसारमाध्यमी मात्र या घटकांना हवा तेवढ्या प्रकाश झोतात आणताना दिसत नाहीत.

परदेशी नागरीक भारतात उपचार घेतात याचे कारण भारतात तुलनेने स्वस्त आणि जलद उपचार केले जातात असा त्यांचा मानस आहे.

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींकडे जास्त करून विमा संरक्षण असते मग अशा वेळेस या विमा संरक्षणाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ उचलता यावा यासाठी कदाचित भारतातील प्रसिद्ध व्यक्ती परदेशात उपचारासाठी जात असावेत.

आणि तसेही मेडिकल टुरिझमच्या नावाखाली या सेलिब्रिटिजना विमान तिकीट हॉटेल उपचार या सर्व गोष्टींना जोडून एक चांगल्या प्रकारचे पॅकेज डील प्रस्तावित केले जातात मग कोण कशाला भारतात उपचार करून घेईल.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?