अमेरिकेतील पंख्यांना चार तर भारतातील पंख्यांना तीन पाती असतात, असे का? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पंखा हे घरातील सर्वात उपयोगी साधन असते असे म्हटले तर काही वावगे ठरणार नाही. कारण या काळामध्ये प्रत्येकालाच त्याची गरज भासते. तुम्ही काही घरांमध्ये लहान मुलांची यावरून भांडणे होताना देखील पहिली असतील, ती पण फक्त त्यांना स्वतःला हवा लागत नाही म्हणून.

तशी तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाची बाहेरून घरात आल्यावर आणि नेमकी घरातील लाईट गेल्यामुळे पंखा बंद असेल, तर चिडचिड होते – पण त्याच खोलीत आपण असू तर पंख्याशिवाय रहावत नाही. इतकं की एखाद्या खोलीत गेल्यावर नकळत पंख्याच्या बटनवर हात जातोच!

याच महत्त्वपूर्ण पंख्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या आपल्या कधी लक्षात आल्या नाहीत.

 

 

India Vs Usa fans.marathipizza
scoopwhoop.com

 

प्रत्येक गोष्टीला काही ना काही तर्क असतो. परंतु आपल्या सभोवती अश्या कितीतरी गोष्टी असतात, ज्यांच्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. आपल्या छताला लटकलेल्या पंख्याला आपण नेहमी पाहतो, पण त्याच्याविषयी कधी विचार करत नाही.

तुम्हाला असे कधी वाटले नाही का? की आपल्या छताला लटकवलेल्या त्या पंख्याला ३ पातीच का असतात? चार किंवा सहा का नसतात?

यामागे सुद्धा काही तर्क आहेत ते आपण जाणून घेऊया.

 

India Vs Usa fans.marathipizza1
ianirouk.com

 

आपल्या देशामध्ये तीन पात्यांचे पंखे खूप प्रसिद्ध आहेत. तर यूएसएमध्ये चार पात्यांचे पंखे प्रसिद्ध आहेत. यामध्ये सुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे.

अमेरिकेमध्ये छताला लावलेल्या पंख्याचा उपयोग एअर कंडीशनला पर्यायी वस्तू म्हणून वापरतात. चार पात्यांचे पंखे हे तीन पात्यांवाल्या पंख्यापेक्षा मंद गतीने फिरतात. अमेरिकेतील लोकांना पंख्याची जास्त गरज भासत नाही –

चार पात्यांचा पंखा हा खोलीमध्ये हवा खेळती ठेवण्यास मदत करतो. अश्या या चार पाती पंख्याचा विदेशामध्ये खूप उपयोग होतो.

भारतामध्ये चार पात्यांचे पंखे वापरले जात नाहीत, कारण भारतामधील लोक पंख्याच्या उपयोग हा फक्त पर्यायी उपाय म्हणून करत नाहीत.

भारतामधील लोकांचा पंखा लावायचा हेतू हा हवा मिळवणे हा असतो, कारण भारतातील सर्वच कुटुंब काही घरामध्ये ए.सी. लावू शकत नाही.

त्यामुळे हवा मिळवण्याचे पंखा हेच त्यांचे प्रमुख साधन असते. तीन पाती असलेला पंखा हा चार पाती असलेल्या पंख्यापेक्षा जलद गतीने फिरतो. त्यामुळे तो त्याच्यापेक्षा खूप चांगल्याप्रकारे आणि लवकर खोलीमध्ये हवा पसरवतो. तसेच हा पंखा खोली थंड ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे हे पंखे भारतामध्ये खूप वापरले जातात.

 

India Vs Usa fans.marathipizza2
sooziq.com

मग मंडळी तुमच्या मनामध्येही कधी हा प्रश्न येऊन गेला असेल, तर वरील माहिती वाचून तुम्हाला त्याचे उत्तर नक्की मिळाले असेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?