९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा ‘विजय दिवस’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

==

१६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की हा दिवस का साजरा केला जातो? त्या मागची शौर्यगाथा काय? हे बऱ्याच जणांना माहीत नाही.

InMarathi Android App

पाकिस्तानी सेनेचे जनरल ए.के. नियाजी ९६००० सैन्याच्या प्रचंड तुकडीसह चालून आले आणि १९७१ च्या भीषण युद्धाला सुरुवात झाली. युद्ध सुरु झाल्यानंतर ११ दिवसांनी १६ डिसेंबर हा दिवस उगवलाचं तो मुळात विजयाचा शंखनाद करत ! या युद्धात भारताची सरशी झाली आणि भारताच्या इतिहासात हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. पाकिस्तानने भारतीय सैन्यासमोर अक्षरश: गुडघे टेकले. या युद्धात बांगलादेशी सैन्याने देखील मोलाची साथ दिली. पाकिस्तानच्या अधिपत्यातून मुक्त होण्यासाठी चाललेल्या त्यांच्या धडपडीचा अखेर गोड शेवट झाला आणि त्यांना स्वतंत्र देशाचा दर्जा प्राप्त झाला.

1971-war-vijay-day-marathipizza01

स्रोत

जवळपास १२ दिवसांच्या युद्धानंतर १६ डिसेंबर १९७१ रोजी बांगलादेशातील ढाका येथे ९६००० पाकिस्तानी सैन्याने भारतीय आणि बांगलादेशी सैन्यासमोर शरणागती पत्करली. या युद्धात भारताचे ३९०० वीर धारातीर्थी पडले, तर ९८५१ वीर जखमी देखील झाले.

1971-war-vijay-day-marathipizza

स्रोत

देशाच्या रक्षणार्थ या सर्व वीरांनी दाखवलेल्या शौर्याची आठवण म्हणून १६ डिसेंबर हा दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

===

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा ‘विजय दिवस’

  • Pingback: .....आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली! | मराठी pizza

  • December 5, 2017 at 10:07 pm
    Permalink

    सर ,
    आपण वर लिहिले आहे की “जनरल नियाझी 96000 च्या सैन्यासह चालुन आला होता” हे विधान थोड़े चुकीचे आहे.
    जनरल नियाझी हा तत्कालीन पूर्व पाकिस्तान (बांग्लादेश) येथे लष्कर प्रमुख होता व ते सैन्य (96000)पश्चिम पाकिस्तानचा तत्कालीन जनरल टिक्काखान याने बांगलादेशात नरसंहार व ढाक्का शहर आपल्या भारतीय सैन्यापासून वाचवण्यासाठी तैनात केले होते .
    मी आपले प्रत्येक लेख वाचतो , फार अप्रतिम असतात . परंतु मला या लेखात थोड़ी चूक आढळल्याने ती तुमच्या निदर्शनास आणून दिली .
    काही चूकले असल्यास क्षमस्व
    सलाम त्या आपल्या भारतीय वीरांना
    जय हिन्द जय महाराष्ट्र

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *