इतर प्राण्यांप्रमाणे माणसाचाही “मेटिंग सिझन” (प्रणयकाळ) का नसतो?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पावसाळा सुरू झाला की आपल्याला नाचणारा मोर दिसतो , त्याचा सुंदर पिसारा दिसतो. त्याचा तो नाच पावसाळ्यातच बघायला मिळतो असं नाही. पण पावसाळ्यात मात्र इतरवेळी पेक्षा तो ते जास्त करत असतो, आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं असं का होतं?

कुत्री एका विशिष्ट ऋतुतच का प्रणय करतांना आढळतात ? त्याचं कारण आहे ‘प्रणय काळ’.

वर्षभरात एक अशी वेळ येते जेव्हा पशु-पक्षी घरटं बांधू लागतात. तो काळ त्यांचा प्रजनन काळ अथवा प्रणय काळ असतो. वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळा प्रणय काळ असतो. कोकिळा उन्हाळ्यात कुहू कुहू का करते याचं कारण देखील हेच आहे.

 

animal-love.inmarathi
unexplained-mysteries.com

मग आपल्याला प्रश्न पडतो की, माणसाला असा प्रजनन काळ का नसतो? माणूस केव्हाही प्रजनन कसे करू शकतो? तर तसे नाही. माणसाला देखील प्रजनन काळ असतो असं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

माणसाकडे वर्षात केव्हाही सामान्य पद्धतीने प्रजनन करण्याचं उत्क्रांतीतून आलेलं वरदान आहे. परंतु जर आपण लोकांच्या जन्मतारखा बघितल्या तर आपल्याला लक्षात येईल की वर्षाच्या एका विशिष्ट कालावधीत जन्म घेणाऱ्या लोकांचे प्रमाण पण जास्त आहे.

अनेक स्तनधारी प्राण्यांमध्ये, ज्यांच्यात एक विशिष्ट प्रजनन काळ नसतो, त्यांच्यात बऱ्यापैकी जन्मदर हा जुलै सप्टेंबरच्या दरम्यान अधिक असतो.

९ सप्टेंबर ही जन्म घेण्याची एक खूप कॉमन डेट अमेरिकेत आहे असं हार्वर्ड संस्थेने केलेल्या अभ्यासात स्पष्ट झालं आहे. जर तुम्ही नीट मोजणी केली तर या बाळांसाठीचा प्रणय हा सुट्टीच्या काळात केला आहे हे स्पष्ट होते.

काही लोक याला मेटिंग सिझन म्हणतात. परंतु वसंत ऋतूच्या काळात आणि हिवाळ्याच्या शेवटी हे प्रमाण जास्त असतं. हे त्याकाळात झालेल्या लैंगिक रोगांचे निदान, कंडोमचा वाढलेला वापर यावरून स्पष्ट होते. तसेच याच्यापुढील सहा महिन्यांच्या काळातच गर्भपाताचे प्रमाण जास्त असते.

 

group_of_pregnant_women_inmarathi
G.cz.com

२००१ साली केलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे की, हिवाळ्याच्या सुरुवातीचा व शरद ऋतूच्या शेवटचा काळ हा वीर्य उत्पादनासाठी पोषक असतो. तेव्हा विर्याचं प्रमाण शरीरात अधिक असतं. ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान मात्र ते खूप कमी असतं.

अर्थातच वरील आकडेवारी ही अमेरिकन हवामान चक्रावर आधारित असल्यामुळे हे भारताशी तंतोतंत जुळणारं नाही. तरी बऱ्याचदा आपल्याकडे हिवाळ्यात प्रणय क्रिया जास्त प्रमाणात केली जाते असं लक्षात येतं.

त्या काळात प्रणय करण्याची इच्छा ही नेहमीपेक्षा जास्त असते.

वर्षाच्या एका विशिष्ट कालावधीतच वाढलेला जन्मदर आणि वर्षाच्या एका विशिष्ट कालावधीतच वाढलेलं प्रणय संबंधित गोष्टींचा गुगल संशोधनाचं प्रमाण आणि पॉर्न साईट्स बघण्याचं प्रमाण यावरून शास्त्रज्ञांनी मनुष्याचा एक स्पेसिफिक प्रजनन काळ असावा असा अनुमान लावला आहे.

मानसशास्त्रानुसार सुट्टीच्या काळात (अमेरिकेत) जेव्हा वातावरण थंड होऊ लागतं. तेव्हा आपल्याला थंडी पासून बचावाची गरज भासू लागते. आपण आपल्या पार्टनरची ऊब घेण्यासाठी तिच्या जवळ जातो.

खासकरून महिलांचं शरीर हे पुरुषांच्या मानाने अधिक थंड असतं. त्यांना नेहमी उबेची गरज असते.

 

yjhd-inmarathi
youtube.com

अशावेळी पुरुषांच्या शरीराची ऊब घेण्यासाठी त्या त्यांचा जवळ जातात अथवा त्यांना घट्ट पकडून झोपतात. मग या जवळिकीतूनच पुढे प्रणयाला चालना मिळते आणि स्त्री पुरुष प्रणय करतात. अनेक प्रेम कथा व त्यातील प्रेम प्रसंग हे हिवाळ्याचा पार्श्वभूमीवरच चित्रित केले जातात. अगदी भारतातसुद्धा हेच बघायला मिळतं.

हिवाळ्याला प्रेमाचा ऋतू म्हणतात. या काळात वातावरण आपोआपच रोमँटिक होतं.

आपली आपल्या जवळच्या व्यक्तीशी जवळीक वाढते. स्पर्श वाढतो. मग मैत्रीण असो , बायको असो अथवा प्रेयसी असो. ह्या सर्वात एक वेगळा बंध निर्माण होतो. ती जवळीक घट्ट बनत जाते. प्रणय करण्याची उत्कंठा वाढत जाते.

तसेच या काळात अनेक सण असतात. जसे दिवाळी, ख्रिसमस, न्यू इयर इ. त्यामुळे अशात सोबत एक जोडीदार असावा ही गरज निर्माण होऊ लागते.

 

diwali-inmarathi
getty-images.com

पुढे या गरजेतून नातं व प्रणय खुलत असतो. एकटा माणूसदेखील या काळात अधिक हस्तमैथुन करतो असं देखील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

काही अभ्यासानुसार एका विशिष्ट ऋतूत जास्त जन्मदर असण्यामागे वातावरणातील बदल आहेत. अधिक सूर्यप्रकाश व तेवढया प्रमाणातच शीतलता वीर्य उत्पादनाला चालना देणारे ठरते.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार शरीरातील हार्मोनल आणि पाळी मुळे होणारे बदल हे स्त्रीला त्या विशिष्ट ऋतूत प्रणयासाठी जास्त उत्तेजित करत असतात.

 

 

परंतु हा अभ्यास निरीक्षणाधारीत आहे याचा कुठलाच शास्त्रीय सिद्ध पुरावा नाही. कारण कृत्रिम ऋतू तयार करणं अशक्य आहे.

एकीकडे जेव्हा मनुष्य वर्षभर प्रणय करू शकतो, दुसरीकडे इतर प्राणी मात्र एका विशिष्ट ऋतुतच प्रणय करतात. कारण त्यांच्यात हिट चेंज होत असतात. ते फक्त वर्षातून एकदाच होत असतात.

जेव्हा हिवाळ्यात तापमान घसरतंं तेव्हा, लोक घरातच राहतात. जास्त बाहेर पडत नाहीत. त्यामुळे खूप जोडपी एकमेकांना गोंजारतात, जवळ घेऊन चुंबन घेतात, एकमेकांची ऊब अनुभवतात. यातूनच त्यांच्या प्रणयाला चालना मिळते. हिवाळ्यात थकवा देखील कमी जाणवतो. त्यामुळे तो आपला परफेक्ट प्रजनन काळ असू शकतो.

थोडक्यात हिवाळ्याला ‘प्रजनन काळ’ मानण्यामागे जैविक, मानसशास्त्रीय, सामाजिक अशी विविध कारणे आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?