अवेळी केस पांढरे का होतात ? जाणून घ्या…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

काळे, चमकदार केस हे सर्वांनाच हवे असतात. पण सर्वच एवढे नशीबवान नसतात. आजकालच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात तर अवेळी केस पांढरे होणे हे आता सामान्य झाले आहे. कारण आता ६० नाही तर ३० वय असतानाचा लोकांचे केस पांढरे होतात.

पण तुम्हाला माहित आहे की, असे अवेळी केस का पांढरे होतात ते? तर ह्यामागे अनेक कारण असतात. अवेळी केस पांढरे होणे ह्यामागे अनेक वैज्ञानिक कारणे आहेत, तेच आपण आज जाणून घेणार आहोत.

 

Grey hair problem-inmarathi
webhealthexpert.com

अवेळी केस पांढरे होणे ह्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे तणाव. ब्रिटीश वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार वैज्ञानिकांनी ह्याचा शोध लावला आहे की, तणाव आपल्याला वेळेआधीच वृद्धत्वाकडे घेऊन जातो.

मेलानिन हे एक असं तत्व आहे जे आपल्या केसांना काळं ठेवण्याचं काम करत. जेव्हा मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करणे थांबवतं तेव्हा आपले केस हे पांढरे होऊ लागतात.

 

Grey hair problem-inmarathi01
mohsingapore.sg

जसं शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या विटामिन्सची गरज असते तसचं केसांना काळे ठेवण्यासाठी विटामिन बी -१२ महत्वाचे असते. ह्याच्या कमतरतेमुळे मेलानिन नवीन पेशींची निर्मिती करू शकत नाही.

ज्या लोकांना नेहेमी डोकेदुखीचा त्रास असतो किंवा सायनस हा आजार असतो त्या लोकांचे केस देखील वेळेआधीच पांढरे होतात.

 

Grey hair problem-inmarathi02
dailyhunt.in

आजकाल केसांना सिल्की शाईनी बनविण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू आणि कंडिशनर उपलब्ध आहेत. त्याच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्या बघून आपल्या सारखे लोक ते केमिकल युक्त शाम्पू वापरतात. ह्यामुळे देखील केस पांढरे होतात.

आजकाल फक्त वृधांनाच नाही, तर लहान मुलांना तसेच तरुणांना देखील मधुमेह हा आजार होतो आहे. केस पांढरे होण्याचं हे देखील एक महत्वाचं कारण आहे.

 

Grey hair problem-inmarathi03
health.com.kh

जर तुम्ही मद्यपान, धुम्रपान, ड्रग्स इत्यादी गोष्टींच्या आहारी गेले असाल, तर हे देखील तुमचे केस पांढरे होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

अवेळी केस पांढरे होण्याचं एक कारण अॅनिमिया हे देखील असू शकतं. ह्यात शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे केसांना योग्य ते पोषण मिळत नाही, ह्यामुळे देखील केस पांढरे होऊ शकतात.

रात्री उशिरापर्यंत जागणे आणि दिवसभर काम करणे हे अत्यंत चुकीचे आहे. कारण शरीरासाठी झोपं ही खूप महत्वाची आहे. असं अवेळी झोपणे किंवा झोपं पूर्ण न घेणे ह्याने देखील केस पांढरे होऊ शकतात.

 

Grey hair problem-inmarathi04
lactoval.com.do

कधी कधी हे अनुवांशिक देखील असतं. जर तुमच्या कुटुंबातील कुणाचे म्हणजेच आजी-आजोबा, आई-वडील ह्यांचे केस जर अवेळी पांढरे झाले असतील, तर तुमचे केस देखील अवेळी पांढरे होऊ शकतात. आपले केस पांढरे व्हायला लागले की, आपण लगेच त्याला डाय करायला लागतो. पण जास्त डाय केल्याने केस आणखी पांढरे होण्याची शक्यता असते. कारण ह्यात वापरण्यात आलेले केमिकल्स केसांकरिता अत्यंत हानिकारक असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “अवेळी केस पांढरे का होतात ? जाणून घ्या…

  • March 15, 2019 at 11:15 pm
    Permalink

    17 varshiy muliche kes. Pandhare honya magche karan kay

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?