किस करताना मुली एक पाय वर का करत असतील? ही आहेत काही “संभाव्य” कारणं
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
किस…हा तसा तर एक आक्षेपार्ह विषय आहे. ज्यावर अनेकांची वेगवेगळी मतं आहेत. किस ही खूप वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, जसे की एस्किमो किस, फ्रेंच किस, स्पाइडरमॅन किस, लिजर्ड किस वगैरे वगैरे. हे सर्व आपण चित्रपटांमध्ये बघत असतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की, किस करताना मुलगी नेहेमी आपला एक पाय वर का करते?

आता ह्याच्यामागे कुठलं मानसशास्त्रीय कारण असू शकतं काय ते जाणून घेऊया. ज्यावरून मुलींची ही किसिंग स्टाइल कुठून आली हे ठरवता येईल.
कदाचित किस करतेवेळी स्त्रिया खूप आनंदी होतात आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांचा एक पाय वर जातो. आपल्यासोबत जे काही घडत असतं त्यावर आपलं शरीर प्रतिक्रिया देत असतं. स्त्रियांचं किस करतेवेळी पाय वर घेणे देखील अश्याच प्रकारची एक प्रतिक्रिया असू शकते.

ह्यामागे एक वेगळे कारण देखील असू शकते. गुरुत्वाकर्षण केंद्राच्या संकल्पनेनुसार किस करताना स्त्रिया जेव्हा मागे वाकतात तेव्हा यांच्या शरीराचा संपूर्ण भार हा एकाच पायावर येतो. त्यामुळे संतुलन राखण्यासाठी स्त्रिया एक पाय वर उचलतात. त्यामुळे ह्या किसिंगस्टाईलचे हे देखील एक कारण होऊ शकते.

अनेक देशांमध्ये चित्रपटांत किसिंग सीन दाखवला जात नाही, ते तिथे गैर मानले जाते. त्यामुळे असे कुठले सीन दाखवायचे असल्यास त्याचे प्रतिक म्हणून काही गोष्टी दाखविल्या जातात. जसे आपल्याकडे आधीच्या जुन्या चित्रपटांत दोन फुलं दाखविण्यात यायची. तसेच काही चित्रपटांत स्त्रियांचा एक पाय वर करून किसिंग सीन दाखवला जातो.

काही कपल्स आदर्श कपल बनण्यासाठी ते सर्व करून बघतात जे त्यांनी ऐकले असेल किंवा बघितले असेल. अश्यात मग किसची ही स्टाईल एवढी प्रसिद्ध असल्या कारणाने विनाकारण कपल्स ह्या स्टाईलला फॉलो करतात. स्वतःला बेस्ट दाखविण्यासाठी स्त्रिया ही किसिंग स्टाईल फॉलो करतात.

आता तुम्हाला टाईम्स स्क्वेअर किस बाबत तर माहितच असेल. असं म्हटलं जातं की, स्त्रियांची ही किसिंग स्टाईल ह्याच पोजची नक्कल आहे.
जर कुठल्या पुरुषाने किस करताना असा एक पाय वर केला तर ते कदाचित खूप विचित्र दिसेल. त्यामुळे केवळ स्त्रियाच असं करतात, कारण चित्रपटांत देखील केवळ हिरोईनच असं करतात. म्हणून स्त्रिया ही स्टाईल आजवर कॉपी करत येत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.