इंग्रजी नववर्ष १ जानेवारीलाच असण्यामागे “हे” कारण आहे…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

प्रत्येक संस्कृतीने आपापल्या हिशेबाने काही दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून ठरवून घेतलेत. नवं वर्ष “कधी” साजरं करायचं हायवर आजकाल वाद घडू लागलेत.

त्यामागची कारणं सर्वश्रुत आहेत, तेव्हा त्यावर चर्चा नको करायला. पण प्रत्येक संस्कृतीत नेमक्या कोणत्या दिवसावरून नव्या वर्षाची सुरुवात करायची ह्या मागे काही ना कथा, कारण, आख्यायिका आहेतच.

“गुढीपाडवा” हा आपल्याकडील नव्या वर्षाचा पहिला दिवस. तो तसा का मानतात ह्यामागील सांस्कृतिक कारण आपण एका लेखात फार सविस्तरपणे समजावून सांगितलं आहे.

 

Gudi-Padwa-inmarathi
india.com

(आवर्जून वाचावा असा हा लेख आहे : गुढीपाडवा : आपल्या “पहिल्या” स्वातंत्र्योत्सवाचा महत्वपूर्ण पण अज्ञात इतिहास) असो.

पण तुम्ही हा विचार केला आहे का की, इंग्रजी वर्ष हे १ जानेवारीलाच का सुरु होते? म्हणजे वर्षात १२ महिने असतात त्यापैकी जानेवारी हाच महिना का म्हणून निवडला असावा?

नवीन वर्ष हे १ नोव्हेंबर, १ डिसेंबर किंवा १ फेब्रुवारीला का नाही सुरु होत? कधी तुम्हाला असे प्रश्न पडले आहेत का?

जर हो तर आज आम्ही तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर घेऊन आलो आहोत.

 

1st january-inmarathi

 

१ जानेवारीलाच नवीन वर्षाची सुरवात का होते, यामागे अनेक मान्यता आहेत.

असे मानले जाते की जानेवारी महिन्याचे नाव हे भगवान ‘जानुस’ यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. रोमन कॅलेंडर नुसार, ‘जानुस’ यांचे दोन मुख होते, एक समोरच्या दिशेने आणि दुसरे मागच्या दिशेने.

असे मानल्या जाते की दोन मुख असल्याने भगवान ‘जानुस’ यांना गेलेला काळ आणि येणारा काळ या दोघांचीही माहिती राहायची.

म्हणूनच जानेवारी हा नववर्षातील पहिला महिना असतो कारण जानेवारीच्या आधी गेलेला काळ म्हणजेच जुन्या वर्षातील डिसेंबर असतो तर नंतर फेब्रुवारी म्हणजेच येणारा काळ असतो.

 

new year-inmarathi

 

या कॅलेंडरच्या स्थापनेच्या आधी पर्यंत लोकांना १ जानेवारी ला नवीन वर्ष असण्यामागे कुठलं खगोलीय कारण देखील आहे हे माहित नव्हते.

या काळादरम्यान पृथ्वी आपल्या कक्षेच्या जवळपास प्रदक्षिणा घालत असते ज्यामुळे ती सूर्याच्या खूप जवळ असते.

या घटनेला ग्रहांक म्हटल्या जाते. म्हणून या काळात नवीन वर्षाची सुरवात होते.

 

new year-inmarathi01

 

१ जानेवारीलाच नवीन वर्षाचे स्वागत का केले जाते यामागे आणखी एक शास्त्रशुद्ध कारण आहे.

डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस एका कारणामुळे विशेष आहे. ३१ डिसेम्बर रोजी होणारा सूर्योदय वर्षभरातील सूर्योदयांपैकी सर्वात उशिरा होणारा सूर्योदय असतो. म्हणून हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस आणि १ जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो.

 

1st january-inmarathi02

 

पहिल्यांदा नवीन वर्षाच सेलिब्रेशन २३ मार्च २००० BC मध्ये करण्यात आलं होत.

जगात अनेक असे देश आहेत जे नवीन वर्षाची सुरवात १ जानेवारीला नाही तर २० मार्च ला करतात. तर Egyptians, Phoenicians आणि Persians हे लोकं २० संप्टेंबरच्या जवळपास नवीन वर्ष साजर करतात.

भारतात जुलियर कॅलेंडर फॉलो केले जाते, पण भारत हा एक सांस्कृतिक देश आहे ज्याच्या वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या प्रसंगांवर नवीन वर्षाची सुरवात होते.

जसे की महाराष्ट्र आणि गोवा हे राज्य गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे करतात. तेलुगु लोकं उगाडी ला नवीन वर्ष साजरे करतात, तर उत्तरी राज्यांत वैशाखीला नवीन वर्ष साजरे केले जाते.

आम्हाला आशा आहे की १ जानेवारीलाच नवीन वर्ष का असत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “इंग्रजी नववर्ष १ जानेवारीलाच असण्यामागे “हे” कारण आहे…!

 • December 29, 2018 at 7:18 pm
  Permalink

  Good information

  Reply
 • December 29, 2018 at 7:19 pm
  Permalink

  but this information is true

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?