' ‘शिंक’ का येते? शिंकण्याने फायदा होतो का? गमतीशीर “शरीरशास्त्र”! – InMarathi

‘शिंक’ का येते? शिंकण्याने फायदा होतो का? गमतीशीर “शरीरशास्त्र”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

गेले काही दिवस राज्यभरात फार विचित्र हवामान अनुभवायला मिळतंय. मध्येच कधीतरी तापमान वाढतं तर मध्येच कधीतरी थंड वातावरण होतं. पाऊस तर कधीही पडतोय.

या सगळ्या विचित्र गोष्टींमुळे माणसाच्या शरीरावर सुद्धा परिणाम होतोय. सध्या सगळ्या जास्त त्रास आपल्याला होतोय तो म्हणजे सर्दीचा.

सर्दी म्हटलं की डोकेदुखी, सतत शिंका, या शिंकांमुळे आपण खूप त्रस्त होतो, फक्त सर्दीमुळेच नाही तर सध्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि धुळीमुळे सुद्धा शिंका येतात.

 

sneeze inmarathi

 

लागोपाठ शिंका आल्या की आपण घाबरून जातो. नक्की काय करावं हे सुचतं नाही, पण शिंका येण्यात तसं घाबरण्याचं काही कारण नाहीये, यामागचं शास्त्रीय कारण जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

  1.  

शिंका येणं तशी काही आपल्यासाठी अपरिचित क्रिया नाही. शिंका येणं हे अशुभ असतं असं देखील म्हटलं जातं, पण ह्या गोष्टी अंधश्रद्धेचा भाग असतात. परंतु कधी आपल्याला प्रश्न पडला आहे का आपल्याला शिंका का येतात? शिंका येते तेव्हा आपल्या अवयवांची हालचाल अचानक गतिमान कशी होते?

नेमका शिंका येणे म्हणजे काय असतं? तो कुठला बदल असतो? तर चला आपण जाणून घेऊयात आपल्याला शिंका का येतात..

शिंकणे ही नाक सफाई करण्याची एक प्रक्रिया आहे.

 

sneez-inmarathi

 

जेव्हा एखादा धूलिकण नाकाच्या आत जातो तेव्हा नाकात असलेल्या छोट्या बारीक केसांच्या जाळ्यात अडकतो आणि त्यामुळे अचानक नाकाच्या क्रियेत बदल होतो.

नाकाला त्या धुलिकणाच्या प्रवेशाने त्रास होतो, चुळबुळ निर्माण होते. अशावेळी मनुष्याला नाक साफ करावं लागतं नाही. हे काम “शिंका” करतात. यामुळे नाकाची सफाई होते.

शिंका येणे हा बाह्य हानिकारक बॅक्टेरिया आणि जंतूंचा तुमच्या शरीराने केलेला प्रतिकार असतो.

शिंका येताना नेमकं काय घडतं?

जेव्हा एखादं फॉरेन मटेरियल अर्थात धूलिकण ,जंतू नाकात प्रवेश करतात तेव्हा ते तिथल्या सूक्ष्म अश्या केसांच्या जाळ्यात अडकतात.

जेव्हा तुमच्या नाकातील अंतर्गत त्वचेला त्या बाह्यकणाचा आभास होतो तेव्हा नाकातील नर्व्हस सिस्टमच्या मदतीने मेंदूला एक इलेक्टरीक सिग्नल पाठवला जातो. त्या सिग्नल मुळे नाकाला साफ करायचं असल्याची सूचना तुमच्या मेंदूला मिळते. मग तुमचं शरीर त्याप्रमाणे प्रतिकार करण्याचा तयारीला लागतं.

अशावेळी डोळे आपोआप बंद होतात आणि जीभ टाळूला स्पर्श करते आणि मांस पेशी आकुंचन पावतात आणि एक जोरात श्वास बाहेर सोडला जातो ज्याला आपण शिंक येणे असं म्हणतो. ही सर्व प्रक्रिया अगदी काही क्षणात होत असते.

 

sneezing-inmarathi

 

शिंका येण्याला स्टर्नयुएशन देखील म्हटले जाते. यात नाकातील द्रव्य, पाणी आणि हवा अत्यंत वेगाने बाहेर फेकले जातात. त्याचा दबाव इतका असतो की अडकलेला धूलिकण, जिवाणू, फुलांतील मोहर आपोआप बाहेर पडतात. यामुळे फ्लू सारख्या आजारापासून संरक्षण होते.

शिंका येण्याने आजून एक महत्वपूर्ण क्रिया घडते. २०१२ मध्ये केल्या गेलेल्या एका संशोधनाच्या दाव्यानुसार शिंकणे ही नाकाची स्वतःला स्थिर करण्याची एक नैसर्गिक पद्धत आहे.

अर्थात नाकातील सिलियाच्या केलेल्या अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की शिंका आल्याने नाकातील सिलिया पुनरुज्जीवित होतात. नाकाची क्रिया आजून वधारते.

शिंकताना डोळे का मिटतात?

आपल्या शरीरात जेव्हा बाह्यकण प्रवेश करतो तेव्हा आपलं शरीर त्या कणाला बाहेर फेकण्यासाठी शिंकतो तेव्हा आपले डोळे आपोआप मिटले जातात याच कारण आहे शरीरातील रिफ्लेक्स, जर शिंकताना डोळे उघडे ठेवले तर ते बाहेर पडतात अशी एक अफवा आहे पण मुळात तसं काहीच नाही , तो एक नैसर्गिक रिस्पॉन्स आहे.

 

sneeze-inmarathi

सूर्याकडे बघतांना आपल्याला शिंक का येते?

जर तुम्ही भर सूर्य प्रकाशात बाहेर चालत असाल आणि तुम्हाला वारंवार शिंका येत असेल तर असं होणारे तुम्ही एकटे नाही. सूर्यप्रकाशात शिंका येण्याचे प्रमाण वाढते असं एका संशोधनातून निष्पन्न झालं आहे. याला सोलर स्निझ रिफ्लेक्स देखील म्हटलं जातं.

आपल्याला वारंवार शिंका का येतात?

संशोधक अजूनही खात्रिलायकपणे सांगू शकत नाहित की एकाच वेळी एखाद्या वक्तीला वारंवार शिंका का येत असतात. बहुतेक त्या व्यक्तीत एकदाच शिंकणाऱ्या व्यक्ती इतकी शक्ती नसते. ते तुमच्या नाकाला असलेल्या ऍलर्जीचे लक्षण देखील असू शकते.

शिंका येणं ही एक नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. बऱ्याचदा ती ऍलर्जी, इन्फेक्शन मुळे देखील वारंवार होत असते. याला नाकाचं इरिटेशन जबाबदार आहे.

शिंकण्यामागे कुठलाही आजार नसतो. शिंकणे हे तुमच्या नर्व्हस सिस्टमच्या व न्यूरॉन्स च्या प्रगल्भतेवर अवलंबून असते. जर ते जास्त सेन्सेटीव्ह असतील तर तुम्हाला थोड्याशा धुळीत देखील शिंका येतील आणि जर ते खूप कमी सेन्सेटिव्ह असतील तर तुम्हाला अगदी फुलांचा वास घेतल्यावर देखील शिंक येणार नाही.

 

sneezing-inmarathi

 

शिंक येण्यात घाबरायचं कारण नाही. जर वारंवार शिंक येत असेल तर ते ऍलर्जी किंवा इन्फेक्शनचं लक्षण आहे. अश्यावेळी डॉक्टरांना जाऊन एकदा विचारून घेणे सोयीचे आहे.

शिंकताना तुम्ही टिशू किंवा हातरुमाल वापरला पाहिजे. यामुळे जर तुम्हाला कुठलं इन्फेक्शन असेल तर ते दुसऱ्या व्यक्तीला होत नाही . सार्वजनिक स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी आपण स्वतःहून घेतली पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. InMarathi.com |च्या वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून ,डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. |

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?