सिग्नल मध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंगच का असतो? जाणून घ्या या मागचं रंजक कारण!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

वाहतुकीचे सिग्नल नियम तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहेत. लाल सिग्नल म्हणजे गाडी थांबवणे, पिवळा सिग्नल म्हणजे आजूबाजूला पाहत हळूहळू गाडी पुढे नेणे आणि हिरवा सिग्नल म्हणजे गाडी पुढे जाण्यासाठी दिलेली परवानगी जणू! पण कधी तुम्ही विचार केलाय का, सिग्नल मध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन रंगच का असतात? इतर कोणते रंग का वापरले जात नाही? त्या मागे काही खास कारण आहे का? तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत.

TrafficSignal-marathipizza01
livebinders.com

सिग्नल मध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंग असण्यामागे आहे वैज्ञानिक कारण!


लाल, हिरवा आणि पिवळा रंग आपण सकाळच्या प्रकाशात सहज पाहू शकतो, याच जागी जर एखादा गडद रंग वापरला तर डोळ्यांना तो ओळखण्यात त्रास होतो.

लाल रंगाची Wavelength कोणत्याही गडद रंगापेक्षा भरपूर जास्त असते. 740-620 NM Wavelength ची लाल रंगाची लाईट आपण खूप दूरवरूनही पाहू शकतो.

TrafficSignal-marathipizza02
thestar.com

असंच काहीसं आहे हिरव्या रंगाच्या आणि पिवळ्या रंगाच्या बाबतीत. हिरव्या रंगाची Wavelength 620-585 NM इतकी असते, तर पिवळ्या रंगाची Wavelength 400 – 700 NM एवढी असते


TrafficSignal-marathipizza03
shutterstock.com

आणि लाल रंगाप्रमाणे हिरव्या आणि पिवळ्या रंगाची लाईट देखील दिवसाच्या सूर्यप्रकाशात दूर अंतरावरूनही डोळ्यांना सहज दिसते.

TrafficSignal-marathipizza04
portallivramento.com.br

हे तीन रंग काही अचानक ठरवले गेलेले नाहीत, तर पूर्वीच्या रेल्वे सिग्नलमध्ये देखील याच रंगांचा वापर केला जायचा, हळू हळू रस्त्याच्या सिग्नल मध्ये देखील हाच रंगाचा पॅटर्न वापरला जाऊ लागला आणि आज आपण पहातोयाच की आपले सगळे रस्ते या तीन रंगाच्या सिग्नलने सजलेले आहेत.


लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?