वडील जर्मन आणि आई बंगाली – तरी दिया तिच्या नावापुढे “मिर्ज़ा” हे आडनाव का लावते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

“दिया मिर्ज़ा” हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर येते ती प्रसन्न चेहेऱ्याची, पाणीदार, बोलक्या डोळ्यांची, बाहुलीसारखी नाजुक अशी एक लावण्यवती!

जिने २००० सालचा मिस् एशिया पॅसिफिक हा किताब जिंकला! त्याच कार्यक्रमात तिला मिस् ब्युटिफुल स्माइल आणि सोनी व्ह्युअर्स् हे देखील किताब देण्याते आले.

 

diya mirza inmarathi
new indian express

 

त्यावेळी ती जेमतेम १८ वर्षांची होती. हैदराबादच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या ऑफिसमधील फॅमिली फ्रेंड असलेल्या एका बाईचा फोन आला तेव्हा तिने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.

त्या ओळखीच्या बाईने दियाला काही फॅशन शो करताना पाहिले होते आणि तिने दियाला ऑडिशनबद्दल सांगितले आणि तिला आश्चर्य वाटले की.

तिने त्यापूर्वी कधीही विचार केला नव्हता. तिच्यासाठी सौंदर्य स्पर्धेला फारसे महत्त्व नव्हते. पण तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला यात सहभागी व्हायचं होतं, म्हणून दियानेही तिच्याबरोबर फॉर्म भरला.

 

diya mirza asia pacific inmarathi
india today

 

तिची उंची ५’६’’ असूनही ती जजेस् ना वयाने लहान वाटली पण, आश्चर्य असे की नंतर मला कॉल आला की तिची निवड झाली आहे आणि तिला मुंबईला बोलावण्यात आले.

त्या वेळी आम्हाला स्वतःच्या बोर्डिंग, लॉजिंग आणि प्रवासाची काळजी घ्यावी लागली. तिच्याकडे काही पैसे होते जे तिने वयाच्या १६ व्या व्या वर्षी एका मल्टीमीडिया कंपनीत काम करून कमावले होते.

नंतर तिने ‘रेहना है तेरे दिल में’ ह्या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. त्यात सर्वांनी तिची विशेष दखल घेतली, तिचा अभिनय लक्षात राहतो तो २००३ मध्ये आलेला ‘तहज़िब’ ह्या चित्रपटातला!

 

rehna hai tre dil mein inmarathi
hotstar

 

ह्यात तिने एका ‘स्पेशल चाइल्ड’ ची भूमिका केली होती. मग २००४ मधे विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘परिणिता’ आला. ह्यातही तिने उत्तम अभिनयाने सर्वांवर छाप पाडली.

दिया मिर्ज़ाचा जन्म हैदराबादमध्ये ९ डिसेंबर १९८१ मध्ये झाला. तिचे वडील फ्रॅंक हेंडरिक जर्मन तर तिची आई बंगाली आहे.

अशाच एका दिल्लीतील मॅक्सम्यूलर भवनाच्या भेटीत तिच्या आई वडिलांची भेट झाली.

विशेष म्हणजे दियाच्या आईने जर्मन भाषा शिकण्यासाठी परदेशी भाषा म्हणून घेतली होती, त्यामुळे ती अस्खलितपणे भाषा बोलू आणि वाचू शकली. ती नऊ वर्षांची असताना तिच्या वडीलांचं निधन झाले.

दिया आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. पण तरीही एकुलती एक मुलगी आहे म्हणून तिचे फालतू लाड झाले नाहीत.

 

diya mirza parent inmarathi
filmfare

 

दिया स्वावलंबी व्हावी ह्यासाठी प्रयत्न करताना तिच्या आईने तिच्यावर योग्य ते संस्कार केले. दिया सांगते, तिचे तिच्या आईशी खास संबंध आहेत. दियाची तिच्या आईशी असलेली नाळ तुटली नाही कधीच!

साहिल संघवी हा दिया मिर्ज़ा चा जीवनसाथी आहे, जो आधी तिचा बिझिनेस पार्टनर होता. दियाला सर्वात जास्त त्याचे मन, त्याची मूल्ये, त्याचा विचार करण्याची पद्धत आवडते.

साहिल लोकांशी आपुलकीने वागतो. दियासाठी ती सर्वात मोठी गोष्ट आहे. प्रत्येकाला महत्त्व देणे आणि प्रत्येकाशी सन्मानपूर्वक वागणे अशक्य आहे.

पण साहिल तसाच आहे असं दिया सांगते. साहिलच्या स्वभावाच्या प्रेमात असणारी दिया देवावर श्रद्धा असणारी आहे. देवानेच साहिलशी भेट घालून दिली असं ती मानते.

ऑक्टोबर २०१४ मध्ये दोघे विवाहबद्ध झाले.

 

diya mirza marriage inmarathi
bollywoodhshaadis.com

 

वडिल जर्मन असूनही दिया का लावते ‘मिर्ज़ा’ आडनाव?

दिया मिर्ज़ा सांगते, “माझ्या दुसर्‍या वडिलांना “सावत्र” म्हणून संबोधणे मला आवडत नाही कारण ते माझे जन्मदाते वडील नसले तरी एक उत्कृष्ट पालक होते!

ज्यांनी माझ्या वडिलांचे स्थान बळकावून घेतलेले नाही तर त्यांच्या प्रेमळ वागण्याने, पालकत्त्वाने ते वडील बनले माझे.

ते हैदराबादचे मुस्लिम होते. तिच्या वडिलांचा मृत्यू सगळ्यात वाईट गोष्ट मानते दिया. त्यांची पहिली पत्नी गरोदर असताना मरण पावली, मग त्यांनी दियाच्या आईशी – दीपा ह्यांच्याशी लग्न केले.

ह्या सावत्र वडिलांनी खूप माया लावली, त्यामुळे दियाचे नव्या वडिलांशी सूर लवकर जुळले. त्यांनी दियावर प्रेमाची जबरदस्ती कधीच केली नाही. दिया सांगते,

 

diya mirza inmarathi 2
bollywoodshaadis.com

 

“आम्ही एकत्र असताना वडिलांच्या प्रेमाची जाणीव झाली नाही मला कधीच. मी घर सोडल्यानंतर मात्र खरोखरच त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली आणि जेव्हा मी मुंबईत गेले तेव्हाच माझ्या लक्षात आले,

की त्यांनी माझ्या आयुष्यात काय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि वडील म्हणून माझेही त्यांच्यावर किती प्रेम आहे!

त्यांच्याबरोबर राहायला मी हैदराबादला परत जाऊ शकले नाही, परंतु शेवटच्या काही वर्षांत त्यांच्यावरील माझे प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.

मुंबईत येऊन मी खरेदी केलेल्या घरात वडिलांनी प्रवेश केला तेव्हाचा दिवस मी कधीही विसरणार नाही, माझ्या घराबाहेरच्या नेम प्लेटमध्ये ‘मिर्ज़ा’ नाव आहे.

त्यांना ते लक्षात येईल की नाही हे मला माहित नव्हते. पण ते लिफ्टमधून बाहेर आले, त्यांच्या हे लगेचच लक्षात आले, ते तिथेच थांबले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी मला मिठी मारली.

आणि ते म्हणाले, ‘तू मेरी बेटी नहीं, तू मेरा बेटा है।’ त्यानंतर जवळपास एक वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला.”

 

diya mirza emotional inmarathi
iDiva

 

“मी लंडनमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणात होते आणि आई माझ्याबरोबर होती. सहसा, ती माझ्याबरोबर कधीच प्रवास करीत नव्हती, जेव्हा मी लांबलचक शूट म्हणून तिला बरोबर येण्याची विनंती केली तेव्हा असेच झाले.

रात्री, माझ्या चुलतभावाचा आम्हाला फोन आला की माझे सावत्र वडील रुग्णालयात दाखल झाले आहेत आणि कोमामध्ये आहे. ती परत धावत गेली.

तिने ऐकले आहे की जेव्हा एखादी व्यक्ती कोमामध्ये असते तेव्हा देखील आपण आपल्यास काय सांगितले जात आहे हे ती ऐकू शकते म्हणून ती वडिलांशी बोलू लागली.

तिने मला फोन केला आणि म्हणाली, ‘तुला त्यांच्याशी बोलायचे आहे काय?’ आणि मी म्हणाले, ‘होय.’ तिने वडिलांच्या कानाला फोन लावला आणि मी म्हणाले,

‘आप्पा, तू मला माझं लग्न लावशील असे वचन दिले होतेस. ते झाल्याशिवाय तू कुठेही जाऊ शकत नाहिस. तुला माझी वाट पाहावी लागेल.’

 

diya mirza mom inmarathi
twitter

 

आणि तिकडची लोकं सांगतात, त्यांनी कोमामध्ये असतानाही डोळे मिचकावले आणि मी त्यांना सांगितलेली ही शेवटची गोष्ट आहे.”

वडिलांचा मृत्यु ही आयुष्यातील सगळ्यात वाईट गोष्ट मानते ती! आणि त्याहूनही वाईट म्हणजे त्यांच्या अखेरच्या क्षणी ती तिथे नव्हती.

आई-वडिल तिचे सर्वस्व होते असं ती सांगते. वडिलांनी तिला माया लावली. त्यांच्या मृत्युवर दियाचा विश्वासच नव्हता बसत, ती परदेशात असल्याने तिच्यासाठी न थांबता बाकीच्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

दिया आणि तिची आई दियाच्या वडिलांच्या स्मरणार्थ अल्कोहोलिक आणि ड्रग्ज ऍडिक्ट लोकांसाठी काम करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?