' नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला? त्यामागचं कारण काय? – InMarathi

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काश्मीरमधील हिंसाचार अचानक कसा थांबला? त्यामागचं कारण काय?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी आपल्याला वर्तमानपत्रात किंवा टी.व्ही. वर नेहमीच काश्मीरमधल्या हिंसाचाराच्या बातम्या पाहायला मिळायच्या.नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला आणि अचानक या बातम्याच येण बंद झालं. नोटाबंदीच्या ५० दिवसांच्या काळात काश्मीरमधील हिंसाचाराची एकही बातमी कोणत्याही प्रसारमाध्यमांनी दाखवली नाही किंवा कोणत्या वृत्तपत्रात छापून आली नाही. हे झालं ते चांगलेच झाले म्हणा ! या अश्या हिंसक कारवायांना आळा बसायलाच हवा होता आणि त्याला नोटाबंदीचा निर्णय निमित्तमात्र ठरलं. पण अचानक असं काय झालं की नोटाबंदी जाहीर झाली आणि काश्मीरमधील हिंसाचार जणू गायबच झाला? अचानक काश्मीरमधील हिंसक प्रवृत्ती सुधारल्या कश्या?

kashmiri-youth-violence-marathipizza01

स्रोत

काश्मीरमधला तरुण वर्ग हा अशिक्षित आणि बेरोजगारीने ग्रासलेला आहे. याचाच फायदा फुटीरतावादी आणि देशविद्रोही संघटनांकडून घेतला जातो. या तरुणांना “काश्मीरसाठी लढणारे स्वातंत्र्यसेनानी” असं लेबल लावून हिसंक कृत्ये करण्यासाठी भरीस पाडलं जातं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा हिंसाचार करण्यासाठी त्यांना पैसे मिळतात. हेच कारण आहे की काश्मीरमधला तरुण या समाजविरोधी संघटनांच्या कचाट्यात पूर्णत: अडकला आहे. आधीच अशिक्षित त्यात बेरोजगारपणाची भर यामुळे हा तरुणवर्ग पैश्याच्या लालसेने या मार्गावर अगदी डोळे बंद करून चालण्यासाठी तयार असतो. यामध्ये त्यांच्या जीवालाही धोका असतो, पण प्राणापेक्षा त्यांना पैसा प्रिय वाटतो.

kashmiri-youth-violence-marathipizza02

स्रोत

काश्मीरमधल्या तरुणांना प्रत्येक हिंसक कृत्य करण्यासाठी एक ठराविक रक्कम दिली जाते. त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या भारतीय जवानांवर दगड फेकण्यासाठी या तरुणांना दिवसाला १०० ते ५०० रुपये मिळतात. जवानांची शस्त्रे चोरली तर प्रत्येक शस्त्राला ५०० रुपये दिले जातात. ग्रेनेड चोरले तर प्रत्येक ग्रेनेडसाठी १००० ते २००० रुपये दिले जातात. हे सर्व पैसे या तरुणांना दर दिवसाला दिले जायचे. ते देखील ५०० आणि १००० च्या नोटांमध्ये, परंतु नरेंद्र मोदींनी एका ऐतिहासिक निर्णयाची चाल खेळली आणि हे सगळे धंदे एका रात्रीत बंद झाले. हे तरुण जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा घेऊन काम करण्यास तयार नाहीत त्यामुळे सय्यद गिलानी सारख्या पाकिस्तानी गुलामांच्या मनसुब्यांना चांगलाच चाप बसला आहे. या नोटाबंदीच्या निर्णयामुळे पाकिस्तानामधून हिंसाचारासाठी येणारा पैसा देखील थांबला आहे. म्हणजे अश्याप्रकारे या नोटाबंदीच्या निर्णयामुळे या हिंसाचारच्या मुळावरच घाव बसला आणि सारा खेळ बंद पडला.

kashmiri-youth-violence-marathipizza04

स्रोत

एकाच दगडात अनके पक्षी मारणाऱ्या सरकारच्या या निर्णयाच कौतुक करावं तेवढ थोडंच आहे !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?